जागतिक योग दिन(International Yoga Day 2021) निमित्त जगभरात योगाचे महत्त्व आणि जागरूकता पसरवण्याचे काम केले जाते. योगासने केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. अभिनेत्री कंगना राणावतने खास योगा दिनानिमित्त एक खास स्टोरी तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या स्टोरीमधून तिने कसं तिच्या कुटुंबाला योगा करण्यास प्रवृत्त केलं हे शेअर केलं आहे. कंगनाचे संपूर्ण कुटुंब आता योगामय झालेलं दिसून येत आहे. कारण तिने या स्टोरीमध्ये तिचे आईवडील, भाऊ-वहिनी आणि बहिण रंगोलीचे कुटुंब कसे योगा करत आहेत हे शेअर केलं आहे.
योगामुळे कंगनाच्या आईची ठीक झाली तब्येत
योगादिनाच्या एक दिवस आधी कंगनाने यातील एका पोस्टमध्ये शेअर केलं आहे की, “उद्या जागतिक योगा दिन आहे. या निमित्ताने मी माझ्या योग स्टोरीज तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण प्रत्येकाला हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की मी कशी आणि कधी योगाला सुरूवात केली, शिवाय माझ्या कुटुंबाला योगा करण्यासाठी कसे प्रोत्साहित केले. कुटुंबातील काही लोकांनी याला आधी विरोध केला. काहींना थोडा वेळ लागला पण शेवटी सर्वांनी आता योगा जीवनशैली हळू हळू स्वीकारली आहे.” कंगनाच्या मते तिच्या आईला काही वर्षांपूर्वी मधुमेह, थायरॉईड आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास सुरु झाला. डॉक्टरांनी यासाठी तिच्या आईची ओपन हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. आईची बिघडलेली तब्येत पाहून कंगनाच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हते. पण तरिही तिने आईला तिच्या आयुष्याचे दोन महिने यासाठी द्यायला सांगितले. कारण तिला आईची सर्जरी करायची नव्हती. कंगनाच्या आईने तिच्यावर विश्वास ठेवला आणि प्रयत्न करण्यास सुरूवात केली. आज तिची आई या सर्व आजारपणातून मुक्त झाली आहे. शिवाय योगा जीवनशैलीमुळे तिचे संपूर्ण कुटुंब निरोगी आणि सुदृढ झाले आहे. वडिलांबाबत सांगताना तिने शेअर केलं की अती चालण्यामुळे तिच्या वडिलांचे गुडघे दुखत होते. त्यामुळे तिने त्यांनाही योगा करण्याची सवय लावली. आता तिचे वडील जॉगिंग देखील करतात. त्यामुळे कंगनाला यातच आनंद आहे की ती तिच्या कुटुंबाला योगा शिकवण्यात यशस्वी झाली.
कंगनाने कसं केलं कुटुंबाला योगासाठी प्रवृत्त
कंगनाच्या मते सुखी कुटुंब ही अशी एखादी गोष्ट नाही जी तुम्हाला सहज मिळेल. यासाठी तुम्हाला कठीण प्रयत्न करावे लागतात. आईवडील आणि इतर कुटुंबियांवरील प्रेम तुम्हाला असे प्रयत्न करताना आणखी बळ देतात. आईवडिलांना निरोगी ठेवण्यासारखं दुसरं आणखी कोणतंच महत्त्वाचं काम नाही. तिच्या मते ती दररोज सकाळी जेव्हा तिच्या कुटुंबातील लोकांना फोन करते तेव्हा पहिल्या प्रश्न हाच विचारते की तुम्ही योगसने केली का ? कारण योगामध्ये सातत्य खूप महत्त्वाचे आहे.आज जागतिक योग दिनानिमित्त हे फोटो आणि अनुभव शेअर करताना तिला तिच्या कुटुंबाचा खूपच अभिमान वाटत आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
तापसी पन्नूच्या मते या तीन अभिनेत्री आहेत बॉलीवूडच्या खऱ्या स्टार्स
‘इंडियन आयडॉल’12 मध्ये सायली कांबळेच्या वडिलांसाठी सुपरहीरो मोमेंट
कौटुंबिक वाद सुरु असतानाही निशा रावलने साजरा केला मुलाचा ग्रँड वाढदिवस