लॉकडाऊनच्या काळात फोन ही एकमेव अशी गोष्ट आहे जी अजूनही आपल्याला बोअर करत नाही. कारण इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मग इंटरनेटच्या जगात आपली सफर दिवसभर सुरुच असते. तुम्ही ही या काळात तुमच्या फोनवर असाल तर तुम्ही सगळ्यात जास्त काय सर्च करता (आता हा विषय थोडा वादाचाही आहे म्हणा) पण हल्ली सगळेच सोशल मीडियाच्या माध्यमातून हॉट आणि सिझलिंग शोधण्याच्या प्रयत्नात असतात. या हॉट आणि सिझलिंगच्या गटात सध्या गायिका कनिका कपूर आली आहे. Covid 19 होणारी ही पहिली सेलिब्रिटी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या लोकांना माहीत असेल. पण आता तिच्या नावाचा गजर घरोघरी होऊ लागला. तिच्याबद्दल आपण कितीही वाईट बोललो तरी तिचा फायदा कनिका कपूरला ‘छप्पर फाडके’ झाला आहे.
अंकिताशी लग्न करण्याआधी मिलिंद सोमणच्या आयुष्यात होत्या या हॉट अभिनेत्री
कनिका झाली स्टार
ज्यावेळी गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे कळले. त्याच्या दुसऱ्या मिनिटाला सगळ्या सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनलवर हि बातमी सर्च व्हायला सुरुवात झाली. ही कनिका कपूर आहे तरी कोण? असे म्हणत लोकांनी तिची माहिती काढायला घेतली. त्यातच कनिका कपूर आजारी असताना अनेकांच्या संपर्कात आली . त्यामुळे काही काळ परिस्थिती थोडी गंभीर ही झाली होती. अनेक न्यूज चॅनेल्सने तिची फोनवरुन मुलाखत घेतली. तिच्या संपर्कात आलेल्या सगळ्या लोकांची चाचणी करावी लागली. लखनऊमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. तिच्या या उपचारादरम्यान तिच्या संदर्भातील वेगवेगळ्या बातम्या कायमच येत होत्या. या बातम्यांमधून तिच्या वागण्यावर अनेकांनी टीका केली. तिच्या प्रकृतीबद्दल सांगायचे तर तिची प्रकृती सुरुवातीला गंभीर असल्याचे कळले होते. पण उपचाराअंती ती आता ठणठणीत बरी झाली आहे. तिच्या उरलेल्या सगळ्या टेस्ट कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे तिला घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तिचा हा 15 ते 20 दिवसांचा हा प्रवास लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इतका अनुभवला की, ती लॉकडाऊनच्या काळातील स्टार झाली. तिच्या शिवाय अन्य कोणालाही या काळात सोशल मीडियावर डिमांड नव्हता तेवढा कनिकाला होता. त्यामुळे तिच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे.
अभिनेता इरफान खानवर दुःखाचा डोंगर, आईचे अंतिम दर्शन घेणं झाले नाही शक्य
कनिका कपूर काय करते?
आता अजूनही तुम्ही बातम्या पाहिल्या नसतील किंवा तुम्हाला कनिका कपूर कोण हे माहीत नसेल तर कनिका कपूर ही गायिका असून तिने पंजाबी आणि हिंदी गाण्यांसाठी प्ले बॅक सिंगिग केलेल आहे.तिची अनेक गाणी प्रसिद्ध आहे. तिला गायक म्हणून जितकी ओळख मिळाली नाही तितकी तिला या कोरोनाला मिळवून दिली आहे. त्यामुळे साहजिकच तिने आतापर्यंत गायलेली गाणीसुद्धा अनेकांना पाहायला घेतली आहे. कनिका कपूर विवाहित असून तिची मुलं परदेशात शिकतात. त्यांनाच पाहण्यासाठी ती परदेशी गेली होती. पण तिथून परतल्यानंतर तिला काही दिवसांनी लक्षणं जाणवू लागली.आता ती बरी असून कुटुंबासोबत आपला वेळ घालवत आहे.
या कारणामुळे तोडावा लागणार आहे ‘ गंगुबाई काठियावाडी’चा सेट
रामायण होतयं हिट
आता मालिकांचा विचार कराल तर मालिकांमध्ये सध्या डीडी सुरु असलेल्या ‘रामायण’ या मालिकेने बाजी मारली आहे. रामायणच्या निमित्ताने अनेक कलाकारांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यामुळेत रामायणही फुलफॉर्ममध्ये इतक्या वर्षानंतरही सुरु आहे. त्याचा टीआरपी सध्या खूपच चांगला आहे.
एकूणच काय लॉकडाऊनचा फायदा कनिका कपूरला एकदम बेस्ट झाला असे म्हणावे लागेल.