‘दी कपिल शर्मा शो’ बंद होणार ही बातमी ऐकून चाहते खूपच नाराज झाले होते. कारण या शोचे जगभरात अनेक चाहते आहेत. या शोमुळे अनेकांना त्यांच्या दिवसभराचा ताण, आयुष्यातील दुःख अथवा चिंता विसरण्याचं सामर्थ्य मिळतं. ज्यामुळे हा शो कायम सुरूच राहावा अशी चाहत्यांची इच्छा आहे. मात्र हा शो काही दिवसांसाठी बंद करून पुन्हा नवीन सीझनसह सुरू होणार आहे. अचानक हा सीझन बंद करण्याचं कारण मात्र कोणालाच माहीत नव्हतं. कारण या शोला टीअरपीचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. हा शो लॉकडाऊनमध्येही लोकप्रिय होता. मग हा शो काही काळासाठी बंद करण्यामागे काय कारण असेल यावर चर्चा रंगू लागल्या. मात्र आता काळजीचं काहीच कारण नाही कारण हा शो तात्पुरता बंद होणार आहे. स्वतः कपिलने या शोमधून छोटासा ब्रेक घेण्यामागचं कारण उघड केलं आहे.
यासाठी कपिल घेतोय शोमधून ब्रेक
‘दी कपिल शर्मा शो’चा मुख्य कॉमेडिअन कपिल शर्मा दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्याची पत्नी गिन्नी चतरथ गरोदर असून लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपासूनच कपिल बाबा होणार अशी चर्चा सुरू होती. भारती सिंहने करवा चौथच्या दिवशी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गिन्नी गरोदर असल्याचं दिसलं होतं. ज्यामुळे कपि पुन्हा बाबा होणार अशा बातम्या येऊ लागल्या. मात्र याबाबत कपिलने कोणताच खुलासा केला नव्हता. कदाचित ही गोड बातमी लवकरच कुणाला कळू नये असं कपिल आणि त्याच्या कुटुंबाला वाटत असावं. मात्र आता कपिलने स्वतःच या गोष्टीचा खुलासा केला आहे. झालं असं की दी कपिल शर्मा शो बंद होणार या बातमीने चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. ज्यामुळे काही चाहत्यांनी एका चॅट सेशन दरम्यान कपिलला थेट ट्विटरवर याबाबत विचारणा केली. एका चाहत्याने प्रश्न विचारला की, “दी कपिल शर्मा शो का ऑफएअर होत आहे ? सोबत त्याने कपिलला टॅग केलं होतं आणि भावनिक इमोजी शेअर केल्या होत्या. या प्रश्नाला उत्तर देत कपिलने शेअर केलं की, “कारण, मला माझ्या पत्नीसोबत घरी राहण्याची गरज आहे आमच्या दुसऱ्या बाळाल वेलकम करण्यासाठी” यावर आणखी एका चाहत्याने प्रतिप्रश्न केला की, “अनायराला भाऊ व्हावा की बहीण असं तुला वाटतं ? यावर कपिलने उत्तर दिलं की, “मुलगा असो वा मुलगी ती तंदरुस्त असावी एवढीच इच्छा आहे” या ट्विटवरून कपिल शर्मा लवकरच बाबा होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. गिन्नी आणि कपिलने 2018 मध्ये लग्न केलं होतं, त्यानंतर 2019 मध्ये त्यांना अनायरा नावाची गोड मुलगी झाली. आता त्यांचा दुसऱ्या बाळाचं स्वागत करण्यासाठी तो काही काळ घरात राहणार आहे. ज्यामुळे त्याने शोचा हा सीझन तात्पुरा बंद केला असून काहीच महिन्यात नव्या सीझनसह दी कपिल शर्माची टीम चाहत्यांसमोर हजर होईल.
Bcoz I need be there at home with my wife to welcome our second baby 😍🧿 https://t.co/wdy8Drv355
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) January 28, 2021
कपिल करणार डिजिटल डेब्यू
कपिल शर्मा लवकरच डिजिटल डेब्यू करणार अशीही चर्चा आहे. कारण कपिलने एक मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने लिहीलं होतं की, “एक आनंदाची बातमी आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, मी लवकरच नेटफ्लिक्सवर येत आहे” कदाचित बाबा होण्यासोबतच या कारणासाठीही कपिलने शोमधून ब्रेक घेतला असू शकतो. कारण कपिलला नेहमी निरनिराळ्या गोष्टी ट्राय करायला आवडतात. यापूर्वीदेखील त्याने चित्रपटात जम बसवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे त्याने काही दिवसांपासून स्वतःचा बिहाईंड दी जोक्स विथ कपिल असा एक शो युट्यूबवर सुरू केला आहे. अशी अनेक कारणं असू शकतात ज्यासाठी कपिलने शोमधून ब्रेक घेतला आहे. काही असलं तरी दी कपिल शर्मा शो कायमचा बंद न होता काही काळाने पुन्हा सुरू व्हावा अशीच चाहत्यांची इच्छा आहे.
फोटोसौैजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
आलियाच नाही स्ट्रेसमुळे बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रींचीही सेटवर बिघडली होती तब्येत
ह्रतिक रोशनने मुलांसोबत केलं ट्रेकिंग, शेअर केले रिहान आणि रिधानचे फोटो
वरूण धवननंतर आता श्रद्धा कपूर अडकणार लग्नाच्या बंधनात