कलाकारांनी आत्महत्या केल्याची बातमी वाचली की, काळजात एकदम धस्स होऊन जातं. आता कोण? आणि कशाला असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. असंच काहीस पुन्हा एकदा या क्षेत्रात घडले आहे. कपिल शर्मा फेम एका अभिनेत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आता कोण? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. कारण गेल्या दोन वर्षात धक्कादायक अशा घटना घडल्या आहेत. कपिल शर्मा शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता खासगी आयुष्यात मात्र सुखात नाही. या कारणासाठी त्याने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. हा कलाकार कोण? आणि तो या विषयी काय म्हणाला या विषयी जाणून घेऊया.
भारती सिंहला वाटतेय सी-सेक्शनची भीती, नॉर्मल प्रसूतीसाठी बदलली जीवनशैली
नाना पाटेकरांची करायचा मिमिक्री
जर तुम्ही कपिल शर्मा शो अगदी निरखून पाहात असाल तर तुम्ही या कलाकाराला नक्कीच पाहिले असेल. नाना पाटेकर यांची मिमिक्री करणारा हा अभिनेता म्हणजे तीर्थानंद. त्याने आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. इतरांना हसवणारा हा कलाकार असे का करेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याने कारणही सांगितले आहे. गेल्या दोन वर्षात कलाकारांवर उपासमारीची वेळ आली. खूप जणांकडे काम नव्हते. मुळात मालिका आणि शूटिंग बंद असल्यामुळे त्याला कोणतेही काम मिळाले नाही. त्याच्यावर कर्ज आहे. त्याला कर्ज फेडणे आणि आपले जीवन चालवणे कठीण होऊन गेले होते. त्यामुळेच त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याच्या शेजाऱ्यांना त्याची ही गोष्ट लक्षात आल्यामुळे त्यांनी लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केले. ही घटना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घडली. सध्या तीर्थानंद याची प्रकृती स्थिर असून त्याने या मागील सांगितलेली कारणं अधिक धक्कादायक आहेत.
कुटुंबाने दिली नाही साथ
कर्जामध्ये तीर्थानंद बुडालेला आहे. हाती कोणतेही काम नसल्यामुळे काढलेले कर्ज ही फेडणे अशक्य झाले आहे. शिवाय कुटुंबाची साथ नसल्यामुळे देखील त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचे कुटुंब एकाच इमारतीत राहते. पण तरीदेखील त्यांनी तीर्थानंदशी कोणताही संपर्क साधला नाही. साधी विचारपूसही केली नाही. गेली कित्येक वर्ष एकत्र एकाच ठिकाणी राहून देखील त्याच्या कुटुंबाला त्याची अजिबात काळजी नाही. त्यामुळे असे आयुष्य जगून करायचे तरी काय? असा प्रश्न त्याला पडला. कुटुबांचे नसलेले पाठबळ आणि आर्थिक संकंट यातून मार्ग म्हणून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असे त्याने सांगितले
अनेक कलाकार तणावाखाली
तीर्थानंद सारखे अनेक लहान कलाकार इंडस्ट्रीमध्ये आहे. ज्यांचे पोट हे काही काळासाठी मिळणाऱ्या रोल्सवर चालते. काम मिळाल्यावर त्यांचे घर चालते. अशांचे हाल कोरोनामध्ये झाले. कोणतेही काम हाती नाही. शूटींग बंद यामुळे त्यांना खूपच जास्त फटका बसला. त्यामुळे अनेकांनी आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. तीर्थानंद बचावला. पण काहींचे प्राण वाचवण्यात यशही मिळाले नाही.
तीर्थानंदच्या आत्यमहत्येच्या प्रयत्नामुळे खूप जणांना धक्काच बसला आहे, हे नक्की!