विनोदाच्या माध्यमातून सर्वांना पोट धरून हसायला लावणारा कपिल शर्मा त्यांच्या विनोदी शैलीतून बऱ्याचदा प्रबोधनात्मक सल्लेही देत असतो. हसत हसत तो बऱ्याचदा असं काही सांगून जातो की जे लोकांना सहज पटू शकतं. त्याची विनोदी ही शैलीच चाहत्यांना खूप आवडते. हसता हसता अचानक एखाद्या गंभीर विषयाला हात घातल्यामुळे त्या विषयाचं महत्व पटकन समजतं. शिवाय यातून कोणी दुखावलंही जात नाही. विनोदातून मनोरंजन होतं आणि सामाजिक प्रश्नावर भाष्य केल्याने लोकांमध्ये जनजागृती केली जाते. कपिल शर्मा सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह आहे. जेव्हा तो कार्यक्रमाचं शूटिंगमध्ये नसतो तेव्हा सोशल मीडियामधून लोकांचं मनोरंजन करतो. नुकतंच कपिल शर्माने त्याच्या चाहत्यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून एक मार्मिक सल्ला दिला आहे. जाणून घ्या कपिलने असा कोणता व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यात काय सल्ला दिला आहे.
काय आहे हा मजेशीर व्हिडिओ
कपिल शर्मा कोरोनाच्या काळात स्वतःची योग्य ती काळजी घेत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनीदेखील स्वतःची अशीच काळजी घ्यावी असं त्याला वाटतं. सर्वांनाच माहीत आहे की कोरोनाची भिती न बाळगता आजही अनेकजण फक्त नावापूरता मास्क लावत असतात. मास्क लावल्यावरही त्याने नाक आणि तोंड पूर्ण झाकेल याचीदेएखील ही माणसे काळजी घेत नाहीत. म्हणूनच अशा चाहत्यांसाठी त्याने हा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये एक महिला एका हंस पक्षाचे लाड करण्यासाठी त्याच्या जवळ जाते. मात्र तिने मास्क अशाच चुकीच्या पद्धतीने लावलेला आहे. या महिलेने मास्क काढून तो तिच्या गळ्याजवळ अडकवला होता. मग हंसपक्ष्यानेही मजेत तो ओढून खेचला ज्यामुळे ती महिला गडबडीत खाली पडली. या प्रसंगानंतर त्या महिलेने तिचे नाक आणि तोंड कव्हर होईल असा मास्क लावला. या व्हिडिओमधून जणू हा पक्षी या महिलेला मास्क कसा लावायचा हेच सांगत आहे असं वाटत आहे. हा विनोदी व्हिडिओ शेअर करत कपिलने शेअर केलं आहे की, ‘समजलं का ? स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षा राखण्यासाठी नेहमी योग्य पद्धतीने मास्क लावा’ कपिलने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. ज्यामुळे कपिल शर्मा शोमधूनच नाही तर सोशल मीडियावरही लोकांना पोट धरून हसवत आहे. हा व्हिडिओ कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीत शेअर केलेला आहे.
कपिल शर्माची टीम शूटिंग दरम्यान घेते अशी काळजी
कपिल शर्मा शोचं शूटिंग पुन्हा सुरू झालं आहे. मात्र या शूटिंग दरम्यान कपिल स्वतःची आणि त्याच्या टीमची खूप काळजी घेताना दिसत असतो. शोमध्ये सुरक्षेचे नियम पाळण्यासाठी कोणत्याही प्रेक्षकांना आमंत्रित केलं जात नाही. काही टीम मेंबर्स आणि कलाकार यांच्या मदतीने शूटिंग केलं जात आहे. कपिल कधी कधी ऑनलाईन लाईव्हच्या माध्यमातून काही प्रेक्षकांशी संपर्क साधतो. जेव्हा सर्व परिस्थिती पूर्ण आटोक्यात येईल तेव्हाच या शोमध्ये प्रेक्षकांना आमंत्रित केलं जाईल. सर्वांनी सुरक्षेचे नियम काटोकोरपणे पाळावेत आणि कोरोना नामक महामारी लवकर जगभरातून नष्ट व्हावी हिच अपेक्षा यातून व्यक्त केली जात आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
पूनम पांडेच्या पतीला झाली गोव्यात अटक, शोषणाचा आरोप
ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोण निशाण्यावर, वायरल झाले चॅट
अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ अडचणीत, तेलंगणा हायकोर्टाची स्थगिती