ADVERTISEMENT
home / मनोरंजन
कपिल शर्मा शो होणार बंद

पुन्हा एकदा कपिल शर्मा शो होणार का बंद, हे सांगितले जात आहे कारण

कपिल शर्मा ( Kapil Sharma) अनेक कारणांमुळे कायम चर्चेत असतो. मध्यंतरीच्या काळात काश्मिर फाईल्स ( Kashmir Files) या चित्रपटाच्या प्रमोशनवरुन तो प्रकाशझोतात आला होता. आता त्याचा हाच शो बंद होणार असल्यावरुन तो पुन्हा एकदा ट्रेंड होत आहे. आता असे काय झाले की, पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा शो ऑफ एअर होणार आहे. असा प्रश्नच खरंतर सगळ्यांना पडला आहे.  कपिल शर्मा शो काही कारणामुळे बंद होणार आहे ही बातमी खरी की खोटी हे अद्याप कळलेलं नाही. पण या संदर्भात कपिलनेच जे सांगितले ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कपिल शर्मा जाणार दौऱ्यावर

एका मुलाखती दरम्यान कपिल शर्माने त्याच्या काही दौऱ्यांबद्दलची माहिती दिली होती.कपिलला आणि त्याच्या संपूर्ण टीमला जुलै महिन्यात परदेश दौऱ्यावर जायचे आहे. इतकेच नाही तर त्याने या पूर्वी केलेल्या काही कमिटमेंट्स ही त्याला पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यातून वेळ काढणे हे त्याला शक्य होणार नाही. यासाठीच कदाचित हा शो ऑफ एअर करण्यात येणार आहे. पण आता शो कायमसाठी ऑफ एअर होणार आहे तर असे अजिबात नाही. हा शो त्यांच्या दौऱ्यानंतर पुन्हा एकदा सुरु होईल अशी अपेक्षा अनेकांना आहे. 

या कारणासाठी होणार का बंद

काश्मिर फाईल्स या चित्रपटाने अनेक नवे वाद उभे केले. कपिल शर्माने या चित्रपटाच्या प्रमोशनला नकार दिला होता. त्यामुळे अनेकांचा संताप झाला होता. अशा प्रकारे देशभक्तीवर आधारीत चित्रपटाला कपिल नकार कसा देऊ शकतो. यामुळे अनेकांनी त्याच्यावर रोष व्यक्त केला होता. हा शो त्याच कारणामुळे बंद होत असावा असा समज खूप जणांचा झाला होता. पण असे अजिबात नाही. यामागे चित्रपटाचे प्रमोशन हे कारण नाही हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता हा विषय शो बंद होण्यामागे नाही हे सगळ्यांनाच कळून चुकलेले आहे. 

कपिलवर असते कायम नजर

मध्यंतरीच्या काळात कपिल शर्माने जे काही कारनामे केले आहेत. त्यानंतर त्याच्यावर सगळ्यांची बारीक नजर असते. शो मध्ये हसवण्या व्यतिरिक्त कपिलने अनेक राजकीय वादांमध्येदेखील गुंतवून घेतलेले आहे. त्याचा परिणाम असा की, कपिल काय बोलतो? आणि काय करतो? यावर आता सगळ्यांचीच नजर असते. त्यामुळे आता कपिल शर्मा शो बंद होणार म्हटल्यावर खूप जणांना यामध्ये असाच काहीतरी वाद असेल असे खूप जणांना वाटले. पण आता असा काही वाद नाही हे ऐकून खूप जणांना समाधान मिळाले असेल.

ADVERTISEMENT

दौऱ्यादरम्यान करणार का नवा शो

कपिल शर्मा शो हा बंद होणार असला तरी देखील त्याची संपूर्ण टीम जर दौऱ्यावर जाणार असेल तर ते शूट करणार किंवा ते जे काही करतील त्याचा एखादा नवा शो येणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दौऱ्यादरम्यान विनोदाची काही नवी फोडणी पाहायला मिळणार आहे का? याची उत्सुकता अनेकांना आहे. 

पुन्हा एकदा कपिल शर्मा शो बंद होणार हे ऐकून तुम्हाला काय वाटले ते आम्हाला नक्की कळवा.

08 Apr 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT