लोकांना हसून त्यांचे मनोरंजन करणारा कपिल शर्मा आणि त्याचा शो. अल्पावधीतच चांगला प्रसिद्ध झाला. पण प्रसिद्धीसोबतच त्याच्या वाट्याला त्याच्याचमुळे अनेक अडचणी देखील आल्या. अनेकदा चुकीच्या कमेंट्स आणि विनोदाने त्याला आतापर्यंत चांगलंच रडवलं आहे. आता पुन्हा एकदा शो दरम्यान विनोद करणे कपिलला भारी पडणार असे दिसत आहे. या शोची जज आणि ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पूरणसिंहवर कपिलने असा काही विनोद केला की, भर शो मध्ये तिने कपिलला त्याचे उत्तरही दिले आहे. या शाब्दिक चकमकीमुळे कपिलचा शो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात तर सापडणार नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे.
अर्चनावर केली ही कमेंट
जर तुम्ही कपिलच्या शोचे चाहते असाल तर तुम्हाला हे माहीत असेलच की, कपिल अनेकदा अर्चना पूरणसिंहवर विनोद करतो. हे विनोद अनेकदा तिच्या पुरुषी वागण्यावरुन असतात किंवा तिने साकारलेल्या काही भूमिकांवरुन. कपिल आणि अर्चनाची शाब्दिक चकमक ( भांडणाशिवाय) सुरु असते. तो कार्यक्रमाचा फॉर्मेट असल्यासारखे वाटते. पण यावेळी कपिल थोडं जास्तच बरळला आहे. येत्या काही काळात कपिलची टीम ही अमेरिका दौरा करणार आहे. या दौऱ्याची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. यासंदर्भातच कपिल काहीतरी बोलत होता. त्यावेळी त्याने अचानक आम्ही अर्चनाशिवायच अमेरिकेला जाणार आहोत. यावेळी जजच्या खूर्चीत असलेली अर्चना म्हणाली की, मी माझ्या पैशाने तिकिट काढून अमेरिकेला येईन. मला प्रोड्युसर किंवा स्पॉन्सर यांनी दिलेल्या पैशांची काहीही गरज नाही. अर्चनाचा रोष पाहता तिला राग आला असावा असे या शोदरम्यान आलेल्या पाहुण्या कलाकारांनाही वाटले. म्हणूनच त्यांनी लगेचच आवरते घेतले.
कपिल आणि त्याचे विनोद
कपिल आणि त्याचे विनोद हे निव्वळ मनोरंजन करणारे असले तरी ते अनेकदा अपमानजनकदेखील असतात. खूप वेळा तो एखाद्याच्या दिसण्यावरुन, असण्यावरुन विनोद करते असे दिसते. विशेषत: त्याच्या चाहत्यांचा तो अनेकदा अपमान विनोदातून करतो असे जाणवते. पण ते तात्पुरते असल्यामुळे इतके जाणवत नाही. पण आता कपिलचा हा विनोद अर्चनाने फारच मनावर घेतलेला दिसत आहे. या आधीही अनेकांनी कपिलचे विनोद मनावर घेतले आहेत. इतकेच नाही तर त्याच्या याच विनोदामुळे खूप जणांनी त्याच्यापासून दूर राहणेच पसंत केले आहे.
कपिलला बसलाय झटका
कपिल शर्मा शोला ही कॉन्ट्राव्हर्सीज जोडलेल्या आहेत. या आधीही त्याने कमेंट थेट पंतप्रधानांना निशाण्यावर घेत काही ट्विट केले होते. या ट्विटमुळेही त्याला चांगलाच फटका बसला होता. सर्वस्तरावरुन त्याची निंदा झाली होती. त्याने या सगळ्या प्रकरणानंतर माफी देखील मागितली पण तरीसुद्धा त्याला याचा आर्थिक फटका बसला होता. शो हा काही काळासाठी बंद देखील झाला होता. आता या नव्या कमेंटमुळे पुन्हा एकदा त्याच्या शोला फटका बसेल की ते सगळे विसरले जाईल हे पाहावे लागणार आहे.
कपिल शर्माच्या या विनोदबुद्धीबद्दल तुम्हाला काय वाटते?