ADVERTISEMENT
home / मनोरंजन
भारती सिंहच्या बाळासाठी करण जोहर आणि परिणितीने सुचवले युनिक नाव

भारती सिंहच्या बाळासाठी करण जोहर आणि परिणितीने सुचवले युनिक नाव

भारती सिंह गरोदर असून ती कधीही आई होऊ शकते. मात्र गरोदरपणातही तिच्या कामाबद्दल खूप प्रामाणिक आहे. सध्या ती तिचा पती हर्ष निंबाचियासोबत हुनरबाज हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहे. या शोच्या शूटिंग दरम्यान घडलेला एक मजेशीर किस्सा भारतीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात चक्क जज असलेला करण जोहर आणि परिणिती भारती आणि हर्षच्या बाळासाठी युनिक नावं सुचवत आहेत.

करणला काय ठेवायचं आहे भारतीच्या बाळाचं नाव

भारतीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करण जोहरला भारती सेटवर कधीही बाळाला जन्म देऊ शकते अशी भीती वाटत आहे. यावर भारती देखील डॉक्टरने बाळाचा जन्म कधीही होऊ शकतो असं सांगते. पुढे करण आणि परिणितीच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते. ते म्हणतात की जर असं झालं तर तू तुझ्या बाळाचं नाव काय ठेवशील ? यावर भारती म्हणते काय ठेवू ? करण आणि परिणिती पंजाबीमध्ये एकत्र सांगतात की, जर मुलगा झाला कर ‘हुनर’ आणि मुलगी झाली तर ‘बाज’ यावरून मग सेटवर चांगलाच हास्य कल्लोळ होतो.

भारतीच्या बाळासाठी गोंडस नावाची लिस्ट

भारती सिंहची मस्करी करत पुढे मात्र करण जोहर खरंच तिच्या बाळांसाठी सुंदर नावे सूचवतो.कारण भारती त्याला म्हणते की तू तुझ्या मुलांची नावं छान ठेवली आहेस मग माझ्या मुलांची नावं हुनर आणि बाज का, यावर करण तिला मुलगा झाला तर त्याचं नाव प्रबीर ठेव असं सांगतो कारण रणबीर, कबीर अशी भरपूर नावं आहेत मात्र प्रबीर युनिक असून ते कुणाचं नाही असं सांगतो. शिवाय प्रवीरचा अर्थ आहे राजा, सर्वांवर राज्य करणारा. पुढे तो भारतीला मुलगी झाली तर तिचं नाव इनायत ठेव असं सांगतो, त्याला नैना आणि हीर अशी नावे ही तिला सूचवण्याची इच्छा होते. यातील भारतीला प्रवीर, इनायत आणि हीर ही नावं आवडतात. मात्र यासाठी तिला तीन मुलांना जन्म द्यावा लागेल असं ती मजेत म्हणते. आता भारती आणि हर्षला मुलगा होणार की मुलगी आणि यातील कोणतं नाव ते त्यांच्या मुलाला देणार हे येत्या काळात लवकरच समजेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
27 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT