निर्माता-दिग्दर्शक करण जोहर हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. आताही तो चर्चेत आला ते बॉलीवूडच्या लोकप्रिय फिल्ममेकर्सच्या यादीत पहिल्या स्थानावर आल्यामुळे. स्कोर ट्रेंड्स इंडियाने गेल्या सहा महिन्यातील बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय फिल्ममेकर्सची नुकतीच एक लिस्ट काढली आहे. या लिस्टनुसार, करण जोहर लोकप्रियतेत अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे.
या लिस्टनुसार करण जोहर पहिल्या क्रमांकावर तर फिल्म ‘2.0’ चा दिग्दर्शक शंकर दूस-या स्थानी, फरहान अख्तर तिस-या क्रमांकावर, रोहित शेट्टी चौथ्या स्थानी आणि अनुराग कश्यप पाचव्या क्रमांकावर असल्याचे दिसून आलं आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.
सिंबा, केसरी, कलंक आणि स्टुडंट ऑफ दि इयर-2 या फिल्म्समुळे करण जोहर बॉलीवूडच्या फिल्ममेकर्समध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला. तसंच त्याचा कॉफी विथ करण सीजन 6 ही लोकप्रिय शो ठरला होता. स्कोर ट्रेंड्स इंडियानुसार, व्हायरल न्यूज, न्यूजप्रिंट, डिजीटल, सोशल प्लेटफॉर्म आणि वेबसाइट्स अशा लोकप्रियतेच्या सर्व श्रेणींमध्ये करण 100 गुणांसह पहिल्या पदावर आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले लोकप्रिय फिल्ममेकर शंकर 89.15 गुणांसह लोकप्रियतेत दुस-या स्थानावर आहेत. रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ चे दिग्दर्शक शंकर ह्यांना डिजीटल श्रेणीमध्ये 93.07 गुण, व्हायरल न्यूज श्रेणीमध्ये 17 गुण आणि न्यूजप्रिंट श्रेणीमध्ये 100 गुणांसह लोकप्रियतेत दुसरे पद मिळाले आहे.
लोकप्रियतेत फिल्ममेकर फरहान अख्तर तिस-या क्रमांकावर आहे. आपली फिल्म ‘गली बॉय’ आणि वेबसीरिज ‘मेड इन हेवन’ची लोकप्रियता तसंच, मॉडेल शिवानी दांडेकरसोबतच्या डेटिंगच्या न्यूजमुळे फरहान अख्तरला लोकप्रियतेत तिसरे स्थान मिळालं आहे.
फिल्ममेकर आणि टेलीव्हिजनचा लोकप्रिय होस्ट रोहित शेट्टी 30.24 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आपली ब्लॉकबस्टर फिल्म ‘सिंबा’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या रिएलिटी शोच्या सर्वाधिक टीआरपीमुळे रोहित शेट्टी चौथ्या पदावर आहे. तसंच गेल्या महिन्यापासून ‘सुर्यवंशी’ सिनेमाविषयी मीडियामधील बातम्यांमुळेही रोहित शेट्टी सतत चर्चेत राहिला आहे.
नेटफ्लिक्सची सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिज ‘सॅक्रेड गेम्स’चा निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आपल्या या वेबसीरिजच्या दूस-या पर्वाविषयी सध्या प्रेक्षकांच्या वाढलेल्या उत्कंठेमुळे सतत चर्चेत राहिला आहे. तसंच हृतिक रोशन स्टारर ‘सुपर 30’चा ही तो निर्माता आहे. या सिनेमाच्या सातत्याने होत असलेल्या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे आणि सोशल मीडियावर आपल्या बेधडक विधानांमुळे अनुराग मीडियाच्या मथळ्यांमध्ये यंदा सातत्याने राहिला आहे. तसंच अनुराग कश्यपची नुकतीच रिलीज झालेली फिल्म ‘गेम ओव्हर’ सुध्दा अनुरागला प्रकाशझोतात ठेवायला कारणीभूत ठरली.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल या स्कोरविषयी सांगतात की, “करण जोहर आता एक ब्रँड झाला आहे. फक्त आपल्या सिनेमांमुळेच नाही तर आपल्या सामाजिक जीवनामधल्या वावरामूळेही करण जोहरची चांगलीच फॅनफॉलोइंग आहे. मग ते करणचे डुडल्स असोत की एअरपोर्ट लुक्स. करण जवळजवळ रोजच कोणत्या ना कोणत्या वर्तमानपत्र किंवा फॅशनकॉलम्सचा भाग असतो. करणचा चाहतावर्ग मासेस आणि क्लासेस दोन्हींमध्ये आहे. म्हणूनच की काय, तो असा एकुलता एक फिल्ममेकर आहे, ज्याचं फॅन फॉलोइंग एखाद्या बॉलीवूड एक्टरला लाजवेल एवढं आहे.“
14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून या ट्रेंड्सचा डेटा गोळा केला जातो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजीटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश असतो. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममुळे या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि बॉलीवूड सेलिब्रिटीजच स्कोर आणि रँकिंग ठरवलं जातं.
हेही वाचा –
आलिया भट ही करण जोहरच्या हातातील बाहुली – कंगना राणौत
करण जोहरने करीना कपूरबाबत सांगितलं ‘हे’ गुपित