ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
rocky aur rani ki prem kahani

करण जोहरने जाहीर केली रॉकी और रानी की प्रेम कहानीची रिलीज डेट

चित्रपट निर्माता करण जोहर सध्या त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात एक अनोखी प्रेमकहाणी दाखवण्यात येणार आहे. म्हणूनच प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणून न धरता करण जोहरने सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. पण ही घोषणा करण्यासाठी करणने एक अनोखी स्टाइल वापरली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.  रविवारी दुपारी, करणने इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली.

करणने शेअर केली एक कविता 

चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक नवीन क्रिएटिव्ह मार्ग शोधला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करणने सोशल मीडियावर एक मजेशीर कविता शेअर केली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचा प्रमुख अभिनेता रणवीर सिंग आणि मुख्य अभिनेत्री आलिया भट्टसोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे  आणि त्याबरोबर एक कविता टाकली आहे. त्याने जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यासह चित्रपटातील इतर सर्व कलाकारांचाही त्याच्या कवितेत उल्लेख केला आहे. यासोबतच हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा त्याने केली आहे. शेअर केलेल्या सेल्फीमध्ये करण लाल रंगाचे सनग्लासेस आणि ब्लॅक जॅकेटमध्ये दिसतोय तर रणवीर पांढऱ्या टी-शर्टमध्ये आणि आलियाने काळ्या रंगाच्या टी-शर्ट परिधान केला आहे. तिघेही कॅमेऱ्याकडे बघत हसत आहेत. फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “इतना जोश और जज्बाती जवानी, प्रीतम की धमाकेदार धुन भी सुनानी”. धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना त्याने लिहिले, “गरम धरम का स्वॅग तो देखो.”

करणने जयाजींची कवितेतून घेतली फिरकी 

या कवितेत करणने जयाजींच्या संमतीविना त्यांची छायाचित्रे क्लिक केल्याबद्दल पापाराझींसोबतच्या सततच्या भांडणाचीही गंमत केली. त्याने लिहिले की, “अब उनकी बेशुमार तारीफ करनी है लाजमी, एक और केवल शबाना आजमी और फिर गुच्ची में लिपटा रॉकी के रूप में रणवीर, एक आशिक जॉकी की तरह इश्क के घोड़े पे सवार, बॉक्स ऑफिस की महारानी हमारी आलिया रानी, क्या फिर इस कहानी में बनेगी दुल्हनिया ? सबका करे आप इंतजार, हम जल्द ही आ रहे हैं जीतने आपका इश्क वाला प्यार! रॉकी और रानी की प्रेम कहानी….10 फरवरी 2023 को”. चित्रपटात जया बच्चन आणि धर्मेंद्र यांनी रणवीरच्या आई-वडिलांची भूमिका केली आहे, तर शबाना आझमी या आलियाच्या आईची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग नवी दिल्ली आणि राजस्थानमध्ये झाले आहे. नुकतेच या या चित्रपटाच्या शूटिंगचे फोटोही लीक झाले होते.

रणवीरने शेअर केला चित्रीकरणाचा अनुभव 

एका मुलाखतीदरम्यान रणवीरने करण जोहरसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगितले. तो म्हणाला, “करण जोहरच्या चित्रपटात प्रमुख भूमिका करायला मिळणे हा मला सन्मान वाटतो. त्याने असे कल्ट चित्रपट बनवले आहेत जे बघत आपण लहानाचे मोठे झालो आहोत. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट करण जोहरचा रोमँटिक फॅमिली ड्रामा आहे. या चित्रपटासाठी त्याने एकापेक्षा एक अशा उत्कृष्ट कलाकारांची टीम तयार केली आहे आणि मला या सर्व उत्तम कलाकारांबरोबर काम करताना खूप मजा आली. आलिया व  रणवीर याआधी झोया अख्तरच्या गली बॉय मध्ये एकत्र झळकले होते. त्या चित्रपटात त्यांची केमिस्ट्री उत्तम जुळून आली होती. त्यामुळे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये या दोघांना पुन्हा एकत्र बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

24 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT