Advertisement

बिग बॉस

Bigg Boss 15: या सीझनमध्ये मास्टरमाईंड ठरतोय करण कुंद्रा

Dipali NaphadeDipali Naphade  |  Oct 10, 2021
bigg boss 15 karan kundrra

Advertisement

बिग बॉस 15 सुरू होऊन एकच आठवडा झाला आहे आणि पहिल्याच आठवड्यात तुफान राडा आणि स्पर्धकांच्या कुरघोडी पाहायला मिळाल्या आहेत. यावर्षीच्या सीझनमध्ये सर्वांचे लक्ष होते ते करण कुंद्रावर (Karan Kundrra) आणि अगदी पहिल्याच आठवड्यापासून करणने प्रेक्षकांचा त्याच्यावरील विश्वास फोल ठरू दिलेला नाही. पहिल्याच आठवड्यापासून मास्टरमाईंड (Mastermind) आणि उत्तम खेळाडू अशी छाप करणने निर्माण केली आहे. करण कुंद्रा सध्या बराच चर्चेत आहे. अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर अनुषाने बरेच आरोप करूनही करणने कधीही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र करण नेहमीच नात्यात असताना चर्चेत राहिला आहे. तर आता बिग बॉसमध्ये आल्यानंतरही पहिल्या दिवसापासून करणची चर्चा सुरू झाली आहे. 

प्रतिक सहजपालसाठी ठरतोय डोकेदुखी 

बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) मध्ये प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal) च्या नावाची खूपच चर्चा झाली होती. मात्र सध्याच्या या सीझनमध्ये प्रतीकसाठी करण कुंद्रा अर्थातच डोकेदुखी ठरत आहे. राग आणि भांडणाने काहीच होत नाही तर डोक्याने खेळण्याचा हा खेळ आहे हे करण कुंद्राने पहिल्याच आठवड्यात दाखवून दिले आहे. डोकं वापरून समोरच्या व्यक्तींना कसं हैराण करता येतं याचा उत्तम प्रत्यय करण कुंद्राने या आठवड्यात निशांत भट, शमिता शेट्टी आणि विशेषतः प्रतीक सहजपालला दाखवून दिला आहे. याबाबत निवेदक सलमान खान (Salman Khan) यानेदेखील करणचे विशेष कौतुक विकेंड का वारमध्ये केले आहे. इतकंच नाही तर राखी सावंत (Rakhi Sawant) या भागात आली आणि तिनेही करण कुंद्रा हा विजेता होऊन बाहेर येईल अशीच इच्छा बोलून दाखवली आहे.

करणसाठी अनेक सेलिब्रिटींचे ट्विट आणि पाठिंबा 

करण कुंद्राने शमिता शेट्टीला (Shamita Shetty) आंटी म्हटल्यानंतर ट्विटर वॉर सुरू झाला होता. मात्र अनेक सेलिब्रिटींना करण कुंद्राची बाजू उचलून धरली आहे. कुशल टंडनने (Kushal Tondon) ट्विट करत करणला जनानी असं म्हटल्यानंतर या वादात अभिनेता प्रिन्स नरूलाने उडी घेत हे शब्द करणच्या तोंडावर बोलून दाखव असंही म्हटलं आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातही वेगळ्याच युद्धाला सुरूवात झाली आहे. पण या शाब्दिक चकमकीत करण कुंद्राला साथ देणार अनेक जण आहेत आणि करण कुंद्रा शेवटपर्यंत टिकून राहील आणि त्याच्यामध्ये विजेता होण्याचे सर्व गुण आहेत असंही आता म्हटलं जात आहे. 13 जणांचा एकप्रकारे करण आतमध्ये लीडरच झाला असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. करणने पूर्ण आठवडा गाजवला असून प्रतीकच्या नाकात दम आणून ठेवला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही प्रतीकचे चाहते विरूद्ध करणचे चाहते अशी खडाजंगी होत असलेली पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर स्टेजवरही सेलिब्रिटींमध्ये प्रतीक आणि जय, करण असे गट पडलेले पाहायला मिळाले आहेत. तर सलमान खानने प्रतीक पूर्ण चुकीचा असल्याचेही स्पष्ट केले आहे. 

आता पुढच्या आठवड्यांमध्ये नक्की काय होणार कोणाचे कसे इक्वेशन्स बदलत जाणार याचीदेखील आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक