अभिनयाच्या क्षेत्रातील झगमगाट सगळ्यांना दिसतो. पण यांनादेखील काही दुःख असतात हे काही जणांनाच जाणवतं. अभिनेते अथवा अभिनेत्रींच्या आयुष्यातही अशा काही घडामोडी घडत असतात ज्यामुळे त्यांना त्रास होत असतो. त्यापैकीच अशी अभिनेत्री आणि अभिनेता आहेत करण पटले आणि अंकिता भार्गवा. या दोघांनाही गेल्या वर्षी बाळ होणार होतं. पण काही कारणामुळे अंकिताचं miscarriage झालं आणि या दोघांना आपलं बाळ गमवावं लागलं. त्यानंतर करणने अंकिताला पुन्हा सावरलं. पुन्हा एकदा टीव्ही अभिनेता करण पटेल आणि त्याची पत्नी अभिनेत्री अंकिता भार्गव पालक अर्थात आई – वडील होणार आहेत. पहिल्यांदाच हे दोघेही आई – वडील होणार असून अंकिता येत्या डिसेंबरमध्ये बाळाला जन्म देईल असं सांगण्यात येत आहे. वास्तविक या दोघांपैकीही कोणीही या गोष्टीबद्दल वाच्यता केली नसून कोणत्याही प्रकारचं अटेन्शन या दोघांना नको आहे. पहिल्यांदा झालेल्या दुःखामुळे यासंदर्भात दोघेही यावेळी अतिशय जपत आहेत.
करण आणि अंकिताच्या जवळच्या माणसांकडून मिळाली बातमी
करण आणि अंकिताच्या जवळच्या एका मित्राकडून ही गोड बातमी आली असून ते दोघंही अत्यंत आनंदी असल्याचंही सांगण्यात येत आहे. पहिल्यांदा जेव्हा ही गोड बातमी आली होती तेव्हा करण आणि अंकिताने दोघांनीही ही बातमी स्वतः सांगितली होती. पण पहिल्यांदा बाळ गमावल्यानंतर आता मात्र कोणत्याही प्रकारची जोखीम या दोघांनाही घ्यायची नाही. त्यामुळे आतापर्यंत दोघांनीही यासंदर्भात कोणतीही वाच्यता केलेली नाही. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून अंकितानेदेखील कोणत्याही शो अथवा कार्यक्रमांना हजेरी लावलेली नाही. त्यामुळे ही गोष्ट नक्कीच खरी असणार. तसंच ही आनंदाची बातमी असून सध्या करण आणि अंकिताचे चाहते नक्कीच आनंदी झाले असतील. या दोघांचंही 2015 मध्ये अरेंज मॅरेज झालं होतं. करणला पहिल्याच भेटीत अंकिता आवडली आणि अंकितालाही करण आवडला त्यामुळे दोघांनी लगेचच लग्न केलं होतं.
रोमँटिक चित्रपटात पुन्हा दिसणार ‘हे’ Ex-Couple, लवकरच करणार घोषणा
करण पटेलने सोडली ‘ये है मोहब्बतें’ मालिका
करण पटेलने काही महिन्यांपूर्वीच ‘ये है मोहब्बतें’ ही त्याची लोकप्रिय मालिका सोडली. गेले पाच वर्ष तो या मालिकेत रमण भल्लाची भूमिका साकारत होता. करण पटेल आणि दिव्यांका त्रिपाठी यांची जोडी ही तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरली होती. पण ‘खतरों के खिलाडी’ या रियालिटी शो मध्ये भाग घेण्यासाठी करणने ही मालिका सोडली असल्याचं म्हटलं जात आहे. हा शो रोहित शेट्टी होस्ट करत असून याचा नवा भाग जानेवारीपासून सुरू होणार आहे. याचं चित्रीकरण झालं असून आता यामध्ये करणने कशा प्रकारे टास्क केले आहेत हे बघण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.
स्मिता पाटील यांची ‘ही’ गोष्ट अमृतासाठी आहे खास
अंकिता लग्न झाल्यापासून टीव्हीपासून दूर
अंकिता भार्गवादेखील अभिनेत्री असून करणशी लग्न केल्यापासून मात्र ती टीव्हीपासून दूर आहे. त्यानंतर तिने सहसा कोणत्याही मालिकेत काम केलेलं नाही. मात्र अनेक कार्यक्रमांना ती करणबरोबर दिसून येत होती. मात्र सध्या काही महिने ती कुठेही दिसत नाहीये. त्यामुळे ती गरोदर असल्याच्या बातम्यांना सध्या ऊत आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरमध्येच करण आणि अंकिता आई – वडील होणार आहेत.
आता ‘हेरा फेरी 3’ मध्येही अक्षयला रिप्लेस करणार कार्तिक आर्यन
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.