बॉलीवूड अभिनेत्री आणि नवाब सैफ अली खानची मुलगी सारा ही नेहमीच चर्चेचा विषय असते. पण तेदेखील तिच्या चांगल्या गोष्टींसाठी. मीडियामध्येही ती सर्वांची आवडती आहे. आपल्या आदरपूर्वक आणि नम्र वागण्याने साराने नेहमीच सगळ्यांचं मन जिंकून घेतलं आहे. इतकंच नाही आपली सावत्र आई करिनाशीदेखील तिचं नातं एका मैत्रिणीप्रमाणे आहे. करिना साराला खूप आवडते. सध्या ‘लव आज कल’ या चित्रपटात कार्तिक आर्यनबरोबर सारा दिसणार आहे. यांची जोडी सर्वांना आवडते. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सारा आणि कार्तिक दोघेही व्यस्त आहेत. सारा यासाठीच करिनाच्या रेडिओ शो वर आली होती. त्यावेळी आपल्या खासगी आयुष्यापासून सर्वच गोष्टी साराने करिनाबरोबर शेअर केल्या. आपल्या आयुष्यातील अनेक गुपितं यावेळी साराने उघड केली. करिना आणि साराची खूपच चांगली मैत्री आहे. त्यामुळे साराबरोबर रॅपिड फायर गेम खेळताना करिनालादेखील खूप मजा आली.
जेव्हा सारा आणि तारा एकच गाऊन घालतात तेव्हा
एका प्रश्नाने साराची उडवली झोप
करिनाच्या या शो मध्ये अनेक सेलिब्रिटी येत असतात. यावेळी सारा आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आली होती. यावेळी रॅपिड फायरमध्ये करिनाने साराला अनेक प्रश्न विचारले त्याची साराने खूप मजेशीर उत्तरंही दिली. मात्र एका प्रश्नाने साराचीही झोप उडवली. पण त्याचंही तिने खरं उत्तर दिलं. या प्रश्नाचं उत्तर देताना साराला थोडा संकोचही वाटला. करिनाने साराला ‘one night stand’ बद्दल प्रश्न विचारला. करिनाने साराला म्हटलं की मला हा प्रश्न तुला विचारायला हवा की नाही हे कळत नााही. कारण तू मॉडर्न कुटुंबातील आहेस, वन नाईट स्टँड? पण त्यावर साराने लगेच ‘नाही’ असं उत्तरं दिलं. आपण कधीही असं केलं नाही असंही साराने सांगितलं. यावर करिनाच्या पण जीवात जीव आला. करिना साराची सावत्र आई असली तरीही तिला नेहमीच साराची पण काळजी असते. तिने हे आपल्या अनेक मुलाखतींमध्येही सांगितलं आहे आणि ती नेहमीची साराची काळजी घेतानाही दिसते. त्याशिवाय करिनाने साराला अनेक प्रश्न विचारले. ‘कोणाला नॉटी टेक्स्ट पाठवले आहेस का?’ त्यावर साराने हो असं उत्तर दिलं. त्यावर करिनाने हे मी सैफला नक्की सांगणार असंही सांगितलं. हा खूपच मजेशीर गेम होता. करिना आणि सारा दोघीही खूप मजेत हा गेम खेळल्या आहेत.
अभिनेत्री सारा अली खान करतेय ‘एक नवी सुरूवात’
सारा आणि कार्तिक यांची केमिस्ट्री
सारा आणि कार्तिक यांची केमिस्ट्री या चित्रपटातून दिसून येत आहे. हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा आहे. इम्तियाज अलीच्या या चित्रपटामध्ये सारा कार्तिकशिवाय रणदीप हुडा आणि आरूषी शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट या व्हॅलेंटाईन डे ला प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय सारा अक्षय कुमार आणि धनुषबरोबर आनंद एल. राय यांच्या चित्रपटात दिसणार असून हा चित्रपट पुढच्या वर्षी व्हॅलेंटाईन डे ला प्रदर्शित होणार आहे. तसंच वरूण धवनबरोबर ‘कुली नं 1’ या चित्रपटातही सारा दिसणार आहे. सारा एकंदरीतच वेगवेगळ्या चित्रपटात सध्या काम करत आहे. याशिवाय आपली आई अमृता सिंगच्या ‘चमेली की शादी’ या चित्रपटाच्या रिमेकमध्येही सारा दिसण्याची शक्यता आहे. साराला या चित्रपटासाठी विचारण्यात आलं आहे मात्र अजूनही तिने या चित्रपटाला होकार दिलेला नाही.
सारा अली खानने केला ब्रायडल लुक शेअर, लग्नासाठी आले प्रपोजल्स
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.