करिना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) पुन्हा एकदा आई वडील होणार आहेत. तैमूरला (Taimur) नक्की आता बहीण मिळणार की भाऊ ही उत्सुकता त्यांच्या चाहत्याना लागून राहिली आहे. पुढच्या आठवड्यातच करिना बाळाला जन्म देणार असल्याचं करिनाने सांगितलं आहे. त्यापूर्वी करिना आणि सैफने सर्व व्यावसायिक काम आटपून घेतली असून दोघांनीही आता कामातून सुट्टी घेतली आहे. करिना आणि सैफने या बाळाच्या आगमनाची तयारी काही महिन्यांपूर्वीच सुरू केली होती. घरामध्ये नव्या गोष्टी केल्या असून तैमूरही बाळाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे करिनाने सांगितले होते. दरम्यान करिनाने पहिल्या गरोदरपणातही ज्याप्रमाणे व्यावसायिक कामं केली त्याचप्रमाणे या बाळाच्या वेळीही तिने अगदी शेवटच्या आठवड्यापर्यंत कामं केल्याचे दिसून येत आहे.
Bigg Boss 14: राहुल वैद्य आणि दिशा करणार या महिन्यात लग्न, आईने केला खुलासा
नव्या घरात झाले शिफ्ट
करिना कपूरने आपल्या या बाळाच्या आगमनापूर्वी नव्या घरात शिफ्टिंग केले असून घर आपल्या आवडीप्रमाणे सजवले आहे. तैमूर आणि नव्या बाळासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी करिनाने या घरामध्ये उपलब्ध करून घेतल्या आहेत. तर दोन्ही मुलांसाठी दोन वेगवेगळ्या रूम्स या नव्या घरामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सैफ अली खाननेही आपली सर्व व्यावसायिक कामं संपवून पॅटर्निटी लिव्ह घेतली आहे. कारण आपल्या मुलांना वेळ देता येणे हे आपले पहिले प्राधान्य आहे असं सैफने सांगितले. एका मुलाखतीमध्ये मुलांना वेळ देणं किती गरजेचे आहे हेदेखील सैफने स्पष्ट केले आहे. आपल्यासाठी मुलांना वेळ देणे ही गोष्ट सर्वात महत्त्वाची असल्याचा खुलासा सैफने केला. तर करिना आणि सैफ नेहमीच तैमूरबरोबर वेळ घालवत असल्याचे आतापर्यंत आपण व्हायरल झालेल्या फोटवरून पाहिले आहे. दरम्यान तैमूरच्या जन्मानंतर सर्वात जास्त फोटो व्हायरल झालेला सेलिब्रिटी मुलगा म्हणून तैमूरकडे पाहण्यात येतं. कारण त्यापूर्वी कोणत्याही लहान मुलाचे फोटो इतके व्हायरल झाले नव्हते. तर तैमूर जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याचे फोटो काढण्यात येत होते. पण आता तैमूरबरोबरच येणाऱ्या नव्या बाळाचे फोटोही व्हायरल होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
लांबलेल्या मालिकांचा प्रेक्षकांनाही आलाय कंटाळा
करिनाने एन्जॉय केला गरोदरपणातील काळ
करिनाने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, तैमुरच्या जन्माच्या वेळी तिला अधिक काळजी होती. पण आता दुसऱ्या गरोदरपणाचा काळ तिने अधिक आनंदात आणि मजेत घालवला आहे. तैमुरच्या वेळी पहिलीच वेळ असल्याने तिला जास्त काळजी होती. मात्र आता दुसऱ्या बाळाच्या वेळी आपण अधिक बिनधास्त असून सगळ्या गोष्टी खूपच एन्जॉय केल्या असल्याचंही तिने स्पष्ट केलं. करिनाने यावेळीही अनेक पार्टीजना हजेरी लावली. तर वेगवेगळ्या ठिकाणी करिना चित्रीकरणासाठीही गेली. तिने ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटाचं चित्रीकरणंही या काळात पूर्ण केले. त्यामुळे गरोदरपणातही तिने अगदी शेवटच्या आठवड्यापर्यंत काम केलेले दिसून येत आहे. आता करिना आणि सैफ आपल्या बाळाच्या आगमनासाठी तयार झाले असून पुढच्याच आठवड्यात ही खुषखबर आपल्या चाहत्यांना देतील. चाहतेही त्यांच्या नव्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दुबईत नाही ‘या’ ठिकाणी होणार सलमानच्या टायगर 3 चं शूटिंग
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक