करिना कपूर याच वर्षी दुसऱ्यांदा आई झाली आहे. गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यापर्यंत ती लाल सिंह चड्ढा, इतर शो आणि काही जाहिरातींचे शूटिंग करत होती. सध्या ती तिचा दुसऱ्यांदा आई होण्याचा प्रवास अनुभवत आहे. मात्र बाळंतपणानंतर तिने तिचा फिटनेस असा राखला आहे की ती कधीही पुन्हा कामाला सुरुवात करू शकते. करिना सध्या तख्त चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयार झाली आहे. हा चित्रपट करण जौहर बॅनरचा असल्यामुळे करण जौहरची प्रॉडक्शन टिम लगेच कामाला लागली आहे. करण जौहरच्या तख्तची चर्चा मागच्या दोन वर्षांपासून सुरू आहे. करिनाने शूटिंगसाठी होकार दिल्यामुळे या वर्षी या चित्रपटाच्या तयारीला नक्कीच सुरूवात होईल अशी आशा आहे.
करिनाचा थक्क करणारा फिटनेस
कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे अनेक कलाकारांनी सध्या अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे. तर काहींना नाईलाजास्तव घरी बसावं लागत आहे. अनलॉकनंतर आता पुन्हा एकदा हळूहळू बॉलीवूडमध्ये शूटिंग आणि चित्रपटांच्या तयारीला सुरूवात होताना दिसत आहे. ज्यामुळे कलाकारांना पुन्हा एकदा त्यांचे काम नव्याने सुरू करण्याची संधी मिळु शकते. या सर्वांमध्ये दुसऱ्यांदा आई होणारी करिना कपूरदेखील मागे नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करिना कपूर या वर्षी ऑक्टोबरमध्ये करण जौहरच्या तख्तचं शूटिंग सुरू करणार आहे. तख्त हा एक मल्टी स्टारर चित्रपट असणार आहे. ज्यात करिना कपूरसोबत रणवीर सिंह, भूमि पेडणेकर आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे. या सर्वांमध्ये करिनाचे कौतुक करावे तितके कमी आहे कारण तिने याच वर्षी तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. मात्र तरिही तिने व्यायाम, योगा, डाएटने असा फिटनेस राखला आहे की लवकरच ती तख्तच्या शूटिंगसाठी सज्ज झाली आहे. ज्यामुळे तिच्यासोबत असलेल्या इतर कलाकारांना शूटिंगसाठी थांबावे लागणार नाही. करिनाचा प्रोफेशनलिझम यातूनच दिसून येतो.
करणने तख्तच्या अफवांवर दिला पूर्णविराम
काही दिवसांपासून अशी चर्चा होती की करण जौहर तख्त आता कधीच होणार नाही. मात्र करण जौहरने या सर्व अफवांवर पूर्णविराम दिला आहे. त्याने जाहीर केलं होतं की तख्तचं प्रोजेक्ट बंद केलं नसून काही दिवसांसाठी पुढे ढकलं आहे. करणने तख्तसाठी सर्वात आधी करिनाची निवड केली होती. पण त्यानंतर लॉकडाऊन आणि करिनाची दुसरी प्रेगनन्सी यामुळे तख्तचं शूटिंग सुरू होणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र आता कोरोनामुळे निर्माण झालेले वातावरण निवळताच पुन्हा तख्तची तयारी सुरू झाली आहे. शिवाय तख्तचं शूटिंग करण्यासाठी करिना देखील वेळेत तयार झाली आहे. ज्यामुळे आता या चित्रपटाबद्दल आशेचा किरण सर्वांना दिसू लागला आहे. सहाजिकच यामुळे प्रेक्षकांना बाळंतपणानंतर पुन्हा एकदा करिनाला मोठ्या पडद्यावर पाहता येईल. करिनाचा बाळंतपणाआधीचा लाल सिंह चड्ढा आणि बाळंतपणानंतरचा तख्त पाहण्यासाठी आता चाहते उत्सुक झाले आहेत. एकाच वर्षात गरोदरपणासारखा मोठा प्रवास पार पाडत करिनाने या दोन चित्रपटांसाठी वेळ दिला हीच एक खूप मोठी गोष्ट आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
सारेगमप लिटिल चॅम्प मंचावर रंगणार लोकसंगीताचा जागर
Hot and Sexy: भूषण प्रधानचे फोटो व्हायरल, कमेंट्सचा वर्षाव
या कारणामुळे शहनाज गिल होऊ लागली आहे ट्रोल