ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Karishma Tannas wedding festivities begin in marathi

मौनी रॉयनंतर एकता कपूरची आणखी एक ‘नागिन’ अडकतेय लग्नाच्या बंधनात

एकता कपूरच्या नागिन शोमधून लोकप्रिय झालेल्या एक नाही दोन अभिनेत्री लग्नाच्या बोहल्यावर चढल्या आहेत. नुकताच अभिनेत्री मौनी रॉयचा विवाह सोहळा संपन्न झाला. आता तिच्या पाठोपाठ अभिनेत्री करिश्मा तन्नादेखील लग्न करत आहे. करिश्मा तिचा बॉयफ्रेंड वरूण बंगेरासोबत विवाह करत असून तिच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना जोरदार सुरूवातदेखील झाली. नुकतेच करिश्मा आणि वरूणच्या हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

देवोलिना भट्टाचार्जीने केली साखरपुड्याची अधिकृत घोषणा

करिश्मा आणि वरूणच्या लग्नाचे विधी

करिश्मा तन्ना आणि वरूण बंगेरा दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यांनी त्यांच्या नात्याचा गवगवा होऊ दिला नाही. वरूण बंगेरा एक उद्योगपती आहे. त्यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. एका पार्टीत दोघं एकमेकांना भेटले. त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मागच्या वर्षी दुबईत गुपचूप साखरपुडा केल्यानंतर आता दोघं लग्नाच्या बेडीत अडकत आहेत.  त्यांच्या घरी लग्नाच्या विधींना सुरूवातदेखील झाली आहे. सोशल मीडियावर लग्नाच्या विधींचे फोटो पोस्ट होत आहेत. हळदी समारंभात दोघंही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत होते. करिश्माने पांढऱ्या रंगाचा लेंगा परिधान केला होता, करिश्माने पांढऱ्या रंगाचे मोती आणि सफेद फुलांचे अलंकार घातले होते तर वरूणने सफेद पॅंटवर गुलाबी रंगाचा दुपट्टा घेतला होता. पांरपरिक पद्धतीने हळदी विधी संपन्न झाला. हळदीचा विधी सुरु असताना म्हणजेच हळदीच्या रंगात माखल्यावरही त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. 

पांघरूण’ च्या निमित्ताने रंगणार सांगितिक मैफल

ADVERTISEMENT

कसा असणार करिश्मा आणि वरूणचा लग्नसोहळा

करिश्मा तन्ना आणि वरूण बंगेरा यांचा लग्नसोहळा गोव्यात होणार आहे. लग्नाच्या विधींसाठी करिश्मा आणि वरूण यांनी एक फाईव्हस्टार हॉटेल बूक केलं आहे. हळदी समारंभानंतर नुकताच पार पडला असून आज थाटामाटात मेंदीचा कार्यक्रम केला जाईल. त्यानंतर पाच फेब्रुवारीला धुमधडाक्यात करिश्मा आणि वरूण विवाह बद्ध होतील. या लग्नात नेमके कोणकोणते सेलिब्रेटी सहभागी होणार याबद्दल अजून काहीच माहिती समोर आलेली नाही. मात्र कोविडमुळे फक्त नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात येण्याची चर्चा आहे. त्यामुळे साखरपुड्याप्रमाणेच लग्नसोहळादेखील पारंपरिक मात्र साध्या पद्धतीने केला जाण्याची शक्यता आहे.

विकी कौशल आणि कतरिनाच्या व्हॅलेन्टाईन्स डेमध्ये टायगर-३ च्या शूटिंगचा अडथळा!

04 Feb 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT