ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
कार्तिक आर्यनला हवाय दाढी करण्यासाठी सल्ला, दिला फराहा खानला त्रास

कार्तिक आर्यनला हवाय दाढी करण्यासाठी सल्ला, दिला फराहा खानला त्रास

लॉकडाऊन होऊन आता जवळजवळ दीड महिना होत आला आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काही वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहे. काही बॉलीवूड अभिनेते लॉकडाऊनच्या काळात बरीच मदत करत आहेत.  त्यापैकी एक अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. कार्तिने पैशांची तर मदत केलीच आहे. पण त्याने ‘कोकी पूछेगा’ या सिरीजद्वारेही लोकांपर्यंत COVID – 19 ची अधिक माहिती पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. कार्तिक आर्यन हा नेहमीच चर्चेत असतो. अनेक मजेशीर व्हिडिओ आणि आपल्या मजेशीर उत्तराने तो आपल्या चाहत्यांचे मनही जिंकतो. पण त्याचा अजून एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. नृत्यदिग्दर्शिका आणि दिग्दर्शिका असणारी फराहा खान कुंदरला केलेला मजेशीर व्हिडिओ कॉल कार्तिकने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ‘बस इज्जत कमावली आहे भाईने, आमच्या आरोग्य विशेषज्ञांकडून माहितीपर असा कॅमिओ’ अशी कॅप्शन देत त्याने हा मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

अभिनेत्री इशा गुप्ताही चढणार लवकरच बोहल्यावर, नात्यात असल्याची कबुली

व्हिडिओ कॉल करून फराहाला दिला त्रास

कार्तिकने दिग्दर्शिका फराहा खान कुंदरला व्हिडिओ कॉल केला त्यावर फराहाने विचारलं, ‘का फोन केला आहेस तू मला..त्रास देण्यासाठी?’ त्यावर कार्तिकने उत्तरं दिलं, ‘खूपच महत्त्वपूर्ण प्रश्न विचारण्यासाठी फोन केलाय, मी दाढी करू की नको’ या त्याच्या प्रश्नावर फराहानेही नेहमीप्रमाणे मजेशीर उत्तर दिले, ‘थोडी तरी दाढी कर रे, कोणाचा तरी विग तरी तयार करता येईल, एखाद्या टकल्या व्यक्तीचं भलं तरी होईल’. कार्तिक तरीही थांबला नाही. त्यानंतर फराहाने विचारलं, ‘काय पाहिजे तुला आता?’ कार्तिकने उत्तर दिले, ‘ते तुम्ही पब्लिक सर्व्हिसची घोषणा केली होती ना, कोणी पण व्हिडिओ बनवू नका, कोणी वर्कआऊट करू नका. तर मला ‘कोकी पूछेगा’ या माझ्या कार्यक्रमात आरोग्य विशेषज्ज्ञांची गरज आहे’ त्यावर फराहाने त्याला म्हटले, ‘ही बकवास ऐकवण्यासाठी तू मला फोन केला आहेस ना, का केला आहे, बाय – बाय, टाटा’. फराहा आणि कार्तिकची ही नोकझोंक फारच मजेशीर असल्याने या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. कार्तिक नेहमीच आपल्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. शिवाय कार्तिक जितकी जमेल तितकी या काळात लोकांनाही मदत आहे. तसंच फराहादेखील मदत करत असून तिची मुलगी अन्याही सेलिब्रिटी अॅनिमल्सचे स्केच काढून पैसे गोळा करत आहे आणि हे पैसे दान करण्यात येत आहेत. 

जेव्हा जया बच्चन यांच्यामुळे ऐश्वर्याला कोसळलं होतं रडू

ADVERTISEMENT

कार्तिकने सुरू केली आहे नवी सिरीज

देशातील कोरोना व्हायरसच्या प्रकोपाबद्दल कार्तिक आर्यनने एक नवी सिरीज चालू केली आहे ज्याचे नाव आहे ‘कोकी पूछेगा’. यामध्ये कोरोना संक्रमणावर मात करणाऱ्या व्यक्ती आणि कोरोना वॉरियर्ससह कार्तिक स्वतः बोलतो आणि त्यांचे कौतुक करून अशा व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवायचा आणि प्रोत्साहन देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आतापर्यंत या सिरीजचे चार भाग कार्तिकने केले आहेत आणि त्याच्या या सिरीजलादेखील त्याचे चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत. कार्तिक लॉकडाऊनपूर्वी दोस्ताना 2 आणि भुलभुलैया 2 या दोन्ही चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त होता. मात्र लॉकडाऊनमुळे आता हे चित्रीकरण थांबलं आहे. मात्र कार्तिक सोशल मीडियाद्वारे सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. 

लॉकडाऊनमध्ये शिल्पा शेट्टीचे कुटुंब घरात राहून करत आहे धमाल

  

 

ADVERTISEMENT
29 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT