ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘सारे तुझ्याच साठी’ मध्ये साजरी होणार श्रुती आणि कार्तिकची पहिली मकर संक्रांत

‘सारे तुझ्याच साठी’ मध्ये साजरी होणार श्रुती आणि कार्तिकची पहिली मकर संक्रांत

मराठी मालिका आणि मराठी सण यांचं एक अनोखं नातं आहे. लग्नानंतर होणारे प्रत्येक सण साधारणतः मराठी मालिकांमध्येही दाखवले जातात. त्यामुळे आता प्रेक्षकांना वेगवेगळ्या मालिकांमध्ये मकर संक्रांतीचा सणही अनुभवायला मिळणार आहे. सोनी मराठीवरील ‘सारे तुझ्याच साठी’ मालिकेला प्रेक्षकांनी पहिल्या एपिसोडपासून ते आताच्या एपिसोडपर्यंत भरभरुन प्रेम दिलं आहे. फारच कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांना ही मालिका आवडायला लागली असून या मालिकेतील श्रुती आणि कार्तिकची जोडी, त्यांचा मैत्री ते लग्नापर्यंतचा प्रवास, दिवसेंदिवस त्यांचे एकमेकांवरचे वाढणारे प्रेम, विश्वास, कडू-गोड आठवणी, चढउतार येऊनदेखील अशा परिस्थितीत पण एकमेकांची असणारी सोबत या सर्व गोष्टींचा साक्षीदार बनलेल्या प्रेक्षकांनी या मालिकेला नेहमीच पसंती दर्शवली आहे.

sankrant
लग्नसोहळ्याचा प्रेक्षकांनी घेतला आनंद

श्रुती आणि कार्तिकच्या लग्नसोहळ्याचा खास आनंद प्रेक्षकांनी घेतला. लग्नानंतर श्रुती आणि कार्तिकची जुळलेली केमिस्ट्री प्रेक्षकांची या मालिकेप्रती उत्सुकता वाढवत होती. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. या सणाच्या निमित्ताने ‘सारे तुझ्याच साठी’मध्ये कार्तिक आणि श्रुतीची पहिली संक्रांत नक्की कशी असणार याची नक्कीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. श्रुती आणि कार्तिक ही मकर संक्रांत कशी साजरी करणार? काय विशेष गोष्टी अनुभवायला मिळणार आणि यातून आपल्याला आपली झालेली मकर संक्रांतही पुन्हा एकदा उजाळा देता येईल का? असे सर्वच प्रश्न अगदी महिला प्रेक्षकांनाही पडले असतील. त्याचसाठी खास श्रुतीची पहिली मकर संक्रांत साजरी करण्यात येणार आहे. श्रुती आणि कार्तिकची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. संक्रांत म्हटली की, वर्षाचा सुरुवातीचा सण आणि लग्न झाल्यानंतरची पहिली संक्रांत म्हटल्यानंतर प्रत्येक घरामध्ये एक उत्साहाचं वातावरण असतं. अगदी नव्या नवरीला सजवू तितकं कमी. तिच्यासाठी खास काळ्या साडीचं गिफ्ट, हलव्याचे दागिने आणि तिला आवडणाऱ्या सर्व गोष्टी पुरवण्यासाठी सासरच्या लोकांची चाललेली लगबग हे सर्वच अगदी हवंहवंसं वाटणारं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नव्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरील तेज. 

shruti
संक्रांत म्हणजे तिळगूळ

ADVERTISEMENT

मकर संक्रांत म्हटलं की पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे तीळगुळाचे लाडू. ‘तीळगूळ घ्या गोड गोड बोला’ हे प्रत्येकजण तीळगूळ देताना बोलतो… आता या सणाच्या निमित्ताने ‘सारे तुझ्याच साठी’ च्या कुटुंबातील गोडवा आणि प्रेम अजून वाढणार असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. तिळगुळाची तयारी तर जोरात सुरु झालीच आहे. तिळगूळ करायचे म्हटलं की, त्याची तयारी अगदी सर्वांनी मिळून भाजलेले तीळ, केलेलं शेंगदाण्याचं कूट, गरम गरम तयार झालेलं तिळाचं गुळाच्या पाकातील मिश्रण आणि मग गरम सारणाचे बनवलेले तीळ हे सर्वच कसं अगदी डोळ्यासमोर पटकन तरळतं. तसेच या वर्षाची मकर संक्रात ही श्रुती आणि कार्तिकच्या लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आहे. या सणाला अजून प्रेमळ बनवण्यासाठी कार्तिक श्रुतीला ‘काळ्या रंगाची साडी’ गिफ्ट म्हणून देणार आहे. हलव्याच्या दागिन्याने नटलेली आणि काळ्या रंगाची साडी नेसलेली आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन श्रुतीला पाहिल्यावर कार्तिक तर पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडणार का हेदेखील नक्कीच प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडेल.

हेदेखील वाचा – 

मकर सक्रांत स्पेशल: संक्रातीला नेसण्यासाठी काळ्या रंगाच्या साड्यांचे ‘18’ प्रकार

म्हणून संक्रांतीच्या काळात लहान मुलांना घातले जाते ‘बोरन्हाण’

ADVERTISEMENT

म्हणून मकर संक्रांतीला असतं तिळाचं महत्त्व…

14 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT