बॉलीवूडचं नवे लव्ह बर्ड्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे सूत जुळल्याने ते लवकरच लग्नबंधनात बांधले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे विकी आणि कतरिनाने गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा आहे. दोघांनी अगदी साधेपणाने रोका म्हणजेच रिंग सेरमनी केल्याचे यात दिसत आहे. मात्र विकी आणि कतरिनाकडून मात्र याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मग काय आहे या फोटोमागचे सत्य
खरंच झाला का विकी आणि कतरिनाचा साखरपुडा
विकी कौशल आणि कतरिना कैफ एकमेकांच्या प्रेमात आहेत हे खरं आहे. कारण सध्या हे लव्ह कपल बऱ्याचदा एकत्र दिसतं. मात्र त्यांचा साखरपुडा झाल्याची अफवा मात्र सध्या वाऱ्यासारखी पसरली आहे. विकी आणि कतरिनाने हे खरं नाही असं सूत्रांमार्फत कळवलं आहे. वास्तविक चाहत्यांना आता विकी आणि कतरिनाच्या लग्नाची घाई झाली आहे. त्यामुळे कधी त्यांच्या साखरपुड्याच्या तर कधी लग्नाच्या तयारीच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. काही दिवसांपू्र्वी कतरिना विकीच्या घराबाहेर दिसली होती. एका कार्यक्रमात ते दोघं एकत्र गेले होते. त्यामुळे चाहत्यांनी त्यांचा साखरपुडा झाला असा अंदाज बांधला असावा.
आता राखीचा नवा ड्रामा, बनली स्पायडर वुमन
विकी आणि कतरिनाचे आगामी चित्रपट
वास्तविक सध्या विकी आणि कतरिनाकडे लग्नासाठी मुळीच वेळ नाही. शिवाय त्यांनी त्यांचे नाते अजून अधिकृतपणे लोकांसमोर जाहीर केलेले नाही. एकदा झूमवर हर्षवर्धन कपूरने ते दोघं रिलेशनमध्ये असल्याचं जाहीर केल होतं. त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. मात्र कतरिनाकडे सध्या चित्रपटांची रांग आहे. त्यामुळे तिने अजून लग्नाचा विचार केलेला नसावा. तिचा बहुचर्चित आणि रखडलेला चित्रपट सूर्यवंशी प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार असेल. शिवाय ती या वर्षी फोनभूतमधूनही प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटात ती सिदधांत चतुर्वेदी, इशान खट्टर यांच्यासोबत मुख्य भूमिकेत असेल. सलमान खानसोबत ती टायगर 3 मध्ये पुन्हा झळकणार आहे. विकीकडे दोखील सध्या आदित्य धरचा दी इमोर्टल अश्वत्थामा हा चित्रपट आहे. या व्यतिरिक्त तो सरदार उधम सिंह, सैम बहादुर, दी ग्रेट इंडिअन फॅमिली, मिस्टर लेले मध्ये दिसेल. थोडक्यात या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे या दोघांच्या साखरपुड्याच्या अफवेला पूर्णविराम लागला आहे. मात्र चाहत्यांना लवकरच या दोघांना लग्नबंधनात अडकेलं पाहायला आवडेल हे यातून सिद्ध झालंय.
मन झालं बाजिंद मालिकेत प्रेमाचा रंग आहे पिवळा… सांगतेय श्वेता राजन
ईशा देओलचा खुलासा, इतके दिवस बॉलीवूडपासून का दूर ठेवलं स्वतःला