शाहीर साबळे उर्फ कृष्णराव गणपतराव साबळे यांचे नाव माहिती नाही असा मराठी माणूस निदान महाराष्ट्रात तरी सापडणार नाही. मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहीर साबळेंचे महाराष्ट्र घडवण्यात मोठे योगदान आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. 2022 हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे थोर स्वातंत्र्यसेनानी शाहीर साबळे यांची जन्मशताब्दीचे वर्ष आहे. 3 सप्टेंबर 2022 रोजी म्हणजेच शाहीर साबळे यांच्या जन्मदिवशी त्यांची जन्मशताब्दी साजरी होणार आहे. त्यामुळे शाहीर साबळे यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे नातू व प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे त्यांच्या जीवनावर चित्रपट बनवणार आहेत. शाहीर साबळे आता आपल्यात नाहीत, पण त्यांची ‘जय जय महाराष्ट्र माझा’, ‘या गो दांड्यावरून…’, ‘जेजुरीच्या खंडेराया…’ ही गाणी आजही आपल्या स्मरणात ताजी आहेत.
शाहीर साबळे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योगदान
3 सप्टेंबर 1923 रोजी सातारा जिल्ह्यातील परसणी येथे जन्मलेले कृष्णराव साबळे हे 7 वी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर लवकरच वडिलांसोबत भजने गायला लागले. क्रांतीसिंह नाना पाटील, साने गुरुजी,सेनापती बापट , भाऊराव पाटील, या आणि इतर महाराष्ट्रातील दिग्गजांशी त्यांचा जवळून परिचय झाला. 1942 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या चले जाव आंदोलनात भाग घेतल्यानंतर, ते संयुक्त महाराष्ट्र, गोवा आणि हैदराबाद स्वातंत्र्य चळवळीशी देखील जोडले गेले. त्यांनीच महाराष्ट्र राज्याचे गीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत गायले आहे.
2023 मध्ये येणार महाराष्ट्र शाहीर
अगंबाई अरेच्चा, जत्रा, माझा नवरा तुझी बायको’, ‘इरादा पक्का’ यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले चित्रपट निर्माते केदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू आहेत. केदार शिंदे यांच्या मातोश्री या शाहीर साबळेंच्या कन्या होत. आणि आता आजोबांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांनी आता त्यांचे आजोबा आणि महाराष्ट्रीय लोकसंगीताचे दिग्गज, अभिनेते आणि नाटककार शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा केली होती. दिग्गज शाहीर साबळे यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त, मागच्या वर्षी केदार शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांचे आजोबा आणि दिग्गज कलाकार शाहीर साबळे यांचा एक छोटासा व्हिडिओ शेअर करून श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आगामी बायोपिक ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची माहिती दिली होती.हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे.
शाहीर साबळे यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे क्षण कव्हर करण्यासाठी प्रतिमा कुलकर्णी यांनी केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. या चित्रपटाविषयी बोलताना केदार शिंदे म्हणाले होते की , “मी या प्रोजेक्टवर खूप मेहनत घेत आहे. आजची नवीन पिढी आणि येणाऱ्या पिढ्यांना माझ्या आजोबांनी दिलेल्या मोठ्या योगदानाबद्दलची माहिती त्यांना कळेल अशा स्वरूपात मांडण्याचा माझा मानस आहे. असे काहीतरी अविस्मरणीय मी प्रेक्षकांना देऊ इच्छितो.”
महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली घोषणा
केदार शिंदे यांचे दिग्दर्शन असलेला , केदार शिंदे प्रोडक्शन्स प्रस्तुत, बेला केदार शिंदे यांची निर्मिती असलेल्या महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात अंकुश चौधरी लोकशाहीर शाहीर साबळे यांच्या भूमिकेत झळकणार आहे. आणि या चित्रपटाचे संगीत महाराष्ट्राचे लाडके संगीतकार अजय -अतुल यांचे असणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाविषयीची माहिती देण्यात आली.
महाराष्ट्रासाठी ज्यांनी रक्ताचे पाणी केले त्या मराठी मातीत जन्माला आलेल्या सुपुत्रांची माहिती या निमित्ताने नवीन पिढीला मिळेल ही खूप समाधानकारक बाब आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक