त्वचेची काळजी (Skin care) घेण्यासाठी सध्या फेस सीरम (Face serum) खूपच प्रसिद्ध आहे. विशेषतः हिवाळ्याच्या दिवसात महिलांना त्वचेची खास काळजी घ्यावी लागते आणि त्यासाठी फेस सीरमचा खूपच फायदा होतो. फेस सीरम त्वचेला हायड्रेट करण्यासाठी फायदेशीर ठरते. तुम्हालादेखील फेस सीरम वापरायचे असेल आणि याआधी कधी वापरात आले नसेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे आणि काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला या लेखातून या काही महत्त्वाच्या बाबी सांगत आहोत. त्या फेस सीरमचा वापर करताना नक्की लक्षात ठेवा. त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
ऑल इन वन सीरमचा करा वापर
तुमची त्वचा नॉर्मल असेल अथवा कोरडी असेल तर तुम्ही ऑल इन वन प्रॉडक्ट सीरमचा (All in one product serum) वापर करू शकता. ऑल इन वन उत्पादनामध्ये ह्यालुरोनिक असिड, ग्लायकोलिक असिड, रेटिनॉल आणि विटामिन सी यांचा समावेश असतो. ऑल इन वन प्रॉडक्ट सीरमचा वापर करण्यामुळे तुम्ही त्वचेच्या समस्यांना लांब ठेऊ शकता. सीरममध्ये आढळणारे विटामिन हे त्वचेला अधिक उजळविण्यासाठी फायदेशीर ठरते.
त्वचेच्या समस्यांनुसार निवडा फेस सीरम
सीरम हे अत्यंत पातळ असतात जे तुमच्या त्वचेमध्ये सहजपणाने शोषून घेतले जातात. फेस सीरम त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात. फेस सीरम हा तुम्ही तुमच्या त्वचेची जी समस्या आहे त्याप्रमाणे वापरणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला जर त्वचेवर काळे डाग असतील तर तुम्ही विटामिन बी3 सीरमचा वापर करायला हवा. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील काळे डाग निघून जाण्यास मदत मिळते आणि त्यासह तुमची त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होते.
सीरमची पॅच टेस्ट करा
कोणतेही त्वचेसाठी उत्पादन खरेदी करताना पॅच टेस्ट (Patch Test) करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण प्रत्येक उत्पादन हे तुमच्या त्वचेसाठी योग्य असेलच असं नाही. बऱ्याचदा ब्रँडेड उत्पादनही त्वचेला चांगला परिणाम मिळवून देत नाहीत आणि काहींच्या त्वचेसाठी ते उपयोगी ठरत नाही. त्यामुळे पॅच टेस्ट केल्याशिवाय कोणतेही उत्पादन तसंच सीरमही तुम्ही घेऊ नये. याशिवाय तुम्ही सीरमची किती किंमत आहे याचा नीट अंदाज घ्या. बऱ्याचदा महाग उत्पादन अधिक चांगले असते असा लोकांचा समज असतो. पण असं अजिबातच नाही. त्यामुळे सीरमचे उत्पादन महाग असो वा स्वस्त तुम्ही त्याची पॅच टेस्ट नक्की करून पाहायला हवी. जेणेकरून तुमच्या त्वचेला योग्य परिणाम मिळेल.
संवेदनशील त्वचेसाठी घ्या तज्ज्ञांकडून सल्ला
संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींना सर्वात जास्त त्रास असतो. विशिष्ट उत्पादनच त्यांना वापरता येतात. तुमचीही त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही तुमच्या त्वचारोगतज्ज्ञांकडून योग्य सल्ला घ्या आणि त्यानंतरच सीरमचा वापर करावा. जेणेकरून तुमच्या त्वचेला कोणतीही हानी पोहचणार नाही.
सीरमचा कसा करावा वापर
सीरम त्वचेची काळजी घेण्यासाठी एक उत्तम उत्पादन आहे. चमकदार आणि तरूण त्वचेसाठी सीरम अत्यंत फायदेशीर ठरते. फेस सीरम त्वचेवर टोनर लावल्यानंतर लावावे. फेस टोनर (Face toner) लावल्यानंतर फेस सीरमचे काही थेंब हाताच्या बोटावर घ्या आणि रगडून हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहऱ्याला मॉईस्चराईजर लावा. यामुळे तुमचा चेहरा अधिक चांगला आणि चमकदार दिसेल. सनस्क्रिन लावण्यापूर्वी चेहऱ्याला सीरम लावा. सनस्क्रिन लावण्यापूर्वी सीरम लावल्याने त्वचा चांगली राहते आणि त्वचेला हानी पोहचत नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक