भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. भजी, भाजी, पराठा, सलाड अशा अनेक गोष्टींमध्ये कांदा वापरतात. त्यामुळे स्वंयपाकासाठी सतत घरात कांदे भरून ठेवले जातात. मात्र कांदा हा एक नाशिवंत पदार्थ असल्यामुळे तो लवकर खराब होतो. बऱ्याचदा पावसाळ्यानंतर कांदा महाग होतो यासाठी तो मोठ्या प्रमाणावर घरात साठवून ठेवतात. मात्र अशा मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेला कांदा व्यवस्थित ठेवला नाही तर तो लवकर खराब होतो अथवा सडतो. यासाठीच कांदा घरात कसा साठवून ठेवावा, कांदा खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे प्रत्येकाला माहीत असायला हवे. यासोबत वाचा कांद्याचे फायदे , आरोग्य आणि सौंदर्यासाठी (Kandyache Fayde)
कांदा खरेदी करताना काय काळजी घ्यावी –
कांदा जास्त काळ टिकण्यासाठी कांदे खरेदी करताना काही गोष्टींची तुम्ही खरेदी करतानाच काळजी घ्यायला हवी.
- कांद्याच्या वासाकडे लक्ष द्या. जर कांदा आतून सडला असेल तर अशा कांद्यामधून सडका, कुजकट वास येतो. असा कांदा जरी बाहेरून चांगला दिसत असला तरी आतून तो खराब असण्याची शक्यता असते. यासाठी कांदे खरेदी करताना त्याचा आधी वास घ्या.
- कांदे खरेदी करताना असे कांदे मुळीच खरेदी करू नका. ज्याचे वरचे आवरण निघाले असेल. कारण असा बिना सालींचा ओला कांदा जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही.
- कांदे खरेदी करण्यापूर्वी कांद्याचा खालील मुळाकडचा भाग आणि वरील टोक नीट बघून खरेदी करा. कारण जर कांद्याला मोड आले असतील तर असा कांदा आतून सडलेला असण्याची शक्यता असते. कांदा आणि बटाट्याला मोड येऊ नये यासाठी फॉलो करा या टिप्स
- कांदा नेहमी मध्यम आकाराचे खरेदी करा. कारण जर तुम्ही खूप लहान कांदे खरेदी केले आणि जर ते आतून खराब असतील किंवा वरची साले काढल्यावर ते खूप कमी आकाराचे होतील. यासाठी नेहमी स्वयंपाकासाठी मध्यम आकाराचे कांदे खरेदी करावेत. शिवाय जर मोठ्या आकाराचे कांदे घेतले तर ते वजनात कमी प्रमाणात बसतात. शिवाय जर एक कांदा खराब निघाला जर तुमचे खूप नुकसान होते.
- आजकाल कांदेदेखील केमिकलयुक्त असण्याची शक्यता असते. केमिकलमुळे कांदा लवकर तयार होतो. मात्र असे कांदे आतून काळे पडण्याची शक्यता असते. शिवाय केमिकलच्या मदतीने तयार झालेले कांदे आरोग्यासाठी चांगले नसतात. त्यामुळे रंगावरून कांदे ओळखा. नेहमी सफेद अथतवा नांरगी रंगाचे कांदेच खरेदी करा. जास्त गुलाबी, जांभळे कांदे खरेदी करू नका.
कांदे खरेदी करताना या सोप्या गोष्टी पाळल्या तर तुम्ही सहज कांदे घरात टिकवून ठेवू शकता. शिवाय कांदे टिकवून ठेवताना ते अधूनमधून चेक करा कारण जर एक कांदा खराब झाला तर तो सडका कांदा इतर चांगल्या कांद्यांना खराब करतो. कांदे खराब झाल्यावर त्यात विशिष्ठ प्रकारचे किडे तयार होतात. यासाठी कांदे निवडून पुन्हा जाळ्यात भरून ठेवा. या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या या आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.
पावसात असे स्टोअर करा कांदे, बटाटे आणि लसूण