वंध्यत्व हा आजार नसून ही एक प्रजननासंबंधित समस्या आहे जी ठराविक उपचार तसेच औषधांनी सुधारता येऊ शकते. अगदी बुटीक थेरपी म्हणून देखील त्याचा लाभ घेतला जातो. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार 15% जोडप्यांना काही प्रकारच्या प्रजनन क्षमतेसंबंधीच समस्या असतात आणि ते उपचार घेतात. हा एक प्रचंड लोकसंख्येचा गट आहे जो विशेष वैद्यकीय सेवा शोधात असतात. निवडक उपचारांची ही विशेष गरज पुरवण्यासाठी एकाधिक प्रजनन केंद्रे उपलब्ध करुन दिली आहेत. वैद्यकीय पैलूंवर सर्वच केंद्र पात्र आहेत असे नाही.आणीबाणीची किंवा जीवघेणी स्थिती नसल्यामुळे, सहसा जोडप्याकडे उपचाराची जागा निवडण्यासाठी पुरेसा वेळ आणि संसाधने असतात. याबाबत आम्हाला अधिक माहिती दिली आहे, डॉ. ऋचा जगताप, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, नोव्हा आयव्हीएफ फर्टीलिटी क्लिनिक, मुंबई यांनी.
प्रजनन केंद्राची निवड करताना…
आवश्यक गोष्टींना प्राधान्य देण्यास सक्षम असलेली जोडपी उपचार घेण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे शोधू शकतात का? उपलब्ध सुविधांच्या श्रेणीतून प्रजनन केंद्राची निवड करताना कोणत्या घटकांचा विचार करायला हवा? याबाबत या लेखाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
1. क्लिनिकमध्ये पूर्णवेळ सल्लागार आहे का ते पहा. जेव्हा तुम्हाला महत्त्वाच्या सल्ल्यांची तसेच उपचारांची गरज असते तेव्हा तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यात मदत होईल. त्यांचे लक्ष एका क्लिनिकवर असेल तर ते तुमच्या दृष्टीने अधिक चांगले राहील. क्लिनिकबद्दल सविस्तर माहिती गोळा करा.
2. पहिला सल्ला हा अतिशय मोलाचा आहे. जर तुमच्या डॉक्टरांनी तुमची समस्या नीट समजून घेतली, वैद्यकीय इतिहास पाहण्यासाठी वेळ दिला, तुम्हाला वंध्यत्वाची कारणे समजावून सांगितली आणि त्यातून मार्ग काढला तर तुम्ही निवडलेली जागा योग्य आहे. क्लिनिक कर्मचारी आणि डॉक्टर तुमचे प्रश्न कसे हाताळतात हेदेखील खूप महत्वाचे आहे. समुपदेशनाची ही प्रक्रिया विश्वासाच्या बळावर उभी राहते. स्पष्ट संवाद आणि शंका आणि प्रश्न विचारण्याची संधी मिळेल याची तुम्ही खात्री करुन घ्या. जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग समजावून सांगितला असेल आणि तुम्हाला नंतर वापरता यावे यासाठी त्या आवश्यक तपशीलांची नोंद केली असेल, तर हे एक पद्धतशीर आणि केंद्रित दृष्टीकोन असल्याचे दिसून येते.
3. क्लिनिकमध्ये पॅथॉलॉजी/ फार्मसी/ समुपदेशन/ एंड्रोलॉजिस्ट सुविधा आहे का हे तपासणे आणखी एक महत्त्वाची गोष्ट.एखाद्या जोडप्याला विविध गोष्टींसाठी धावपळ करण्याची गरज नाही हे सुनिश्चित करते आणि एकाच छताखाली सर्व पर्याय उपलब्ध होतात.
4. एक सर्वात महत्त्वाचा परंतु अनेकदा चर्चिला जात नाही तो मुद्दा म्हणजे भ्रूणशास्त्रज्ञ (Embryologist). क्लिनिकमध्ये भ्रूणशास्त्रज्ञांची टीम आहे किंवा त्यासाठी क्लिनिकला इतर तज्ज्ञांवर अवलंबून रहावे लागते. पूर्णवेळ भ्रूणशास्त्रज्ञ असणे म्हणजे तुमचे उपचार पुढे ढकलले जाणार नाही, प्रभावित होणार नाही किंवा भ्रूणशास्त्रज्ञांच्या वेळापत्रकानुसार समायोजित केले जाणार नाही. भ्रूणविज्ञान संघाची क्रेडेन्शियल्स तपासण्याचा प्रयत्न करा आणि शक्य असल्यास, त्यांच्याशी चर्चा करुन पहा. शेवटी हे भ्रूणशास्त्रज्ञ आहेत जे प्रयोगशाळेत तुमचे भ्रूण बनवतात.
आयव्हीएफ हा एक सांघिक प्रयत्न आहे. परिचारिका, समुपदेशक तसेच त्याठिकाणी कार्यरत असलेली संपूर्ण टिम विश्वासू आणि खात्रीशीर असल्यास तुम्हाला उपचार करणे सुलभ होईल.
5. आर्थिक बाजू तसेच त्याबाबत असलेली पारदर्शकता. जे क्लिनिक तुम्हाला खर्चाचा अचूक अंदाज देऊ शकत नाही ते आश्वासक नाही. उपचार सुरू होण्यापूर्वी आर्थिक बाबी स्पष्ट करणे योग्य ठरते. हे निश्चितपणे आपल्याला उपचारांची योजना आखण्यात मदत करेल. जसे आपण सर्व जाणतो की आयव्हीएफ ही एक महागडी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत प्रयोगशाळेत एक जीव निर्माण होतो त्याकरिता आर्थिक योजना असलेले क्लिनिक निवडणे महत्त्वाचे आहे. बर्याच सवलतींमुळे तुमची उपचार योजना कुठेतरी कमी खर्चाची होईल. केवळ ऑफर्सची भुरळ पाडून केंद्राची निवड करु नका.
6. पहिल्या भेटीतच तुम्हाला केंद्राविषयी पारदर्शकता येईल. जर क्लिनिकने तुम्हाला उपचारांची योजना आणि आर्थिक अंदाजासह एक मूल्यमापन पत्रक दिले, तर तुम्हाला आर्थिक नियोजन करणे देखील सोपे होईल. यामध्ये आयव्हीएफ तपशील सामायिक केले आहेत तसेच प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती प्रदान करत असल्याची खात्री करा.जेव्हा या प्रक्रियेसंदर्भात सर्व काही सांगितले जाते तेव्हा ज्या काही समस्या असतील त्याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करा. उपचार करणार्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक