ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
कपाटात कपडे कसेही कोंबण्यापेक्षा असे करा तुमचे कपाट ऑरगनाईज – How to Organize Your Closet in Marathi

कपाटात कपडे कसेही कोंबण्यापेक्षा असे करा तुमचे कपाट ऑरगनाईज – How to Organize Your Closet in Marathi

आम्हा महिलांना कपडे, ज्वेलरी कितीही आणि कोणत्याही प्रकाराचे घ्या कमीच असतात.प्रत्येक महिन्यातून एखादी तरी नवीन गोष्ट प्रत्येकीच्या कपाटाता जमा होत असते. कपाट सामानाने भरत असतं. पण आपण काही वस्तू घेण्याचे कमी करत नाही. एक एक वस्तू आणून ती कपाटामध्ये कोंबत जातो. कधीकधी हे कपाट इतके भरुन जाते की, त्याचा दरवाजा उघडल्यानंतर सगळे सामान बाहेर पडेल असे वाटते.घरातल्यांची बोलणी ऐकून आपण खूपवेळा कपाटही लावायला बसतो. पण सामानच इतकं असतं की, त्याला दिवस अपुरा पडतो. तुम्हालाही तुमचे कपाट ऑरगनाईज करायचे आहे. तर या टीप्स नक्की फॉलो करुन पाहा. किमान तुमच्या वस्तू इतरांना त्रास देणार नाही.

बेडरुमसाठी फॉलो करा या टीप्स

वस्तूंचे विभाजन (Clothes by Category)

ऑफिसवेअर (Office Wear)

ADVERTISEMENT

ज्वेलरी (Jewellery)

कपाटातील कप्पे – How to Organize Your Closet in Marathi

सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे कपाट उघडायचे आहे. तुम्हाला तुमचे सगळे सामान कपाटातून बाहेर काढायचे आहे. (अगदी काल- परवा तुम्ही कपाट आवरुन ठेवले असतील तरी तुम्हाला त्यातील सामान बाहेर काढायचे आहे) कपडे बाहेर काढल्यानंतर तुम्हाला तुमच्या कप्प्याचा आकार, कप्प्यात हँगर लावण्यासाठी स्टँड आहे का?,एखादा पर्सनल लॉकर आहे का? कपाटातील किती कप्पे तुमचे आहेत? हे सगळे पाहण्यासाठी म्हणून तुम्हाला तुमचा सगळा कप्पा रिकामा करायचा आहे.तुमच्या कप्प्यातील बारीक बारीक वस्तूतुम्हाला बाहेर काढायची आहे

messy wardrobe

वस्तूंचे विभाजन (Clothes by Category)

कपाटातील सगळ्या वस्तू बाहेर काढण्यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे तुम्हाला वस्तूंचे विभाजन करायचे आहे. कारण तुम्ही अशा अशा गोष्टी कपाटात ठेवता की, त्या काढून बघायलाच हव्यात. आता हे विभाजन कसे करायचे त्याची पण एक यादी आहे.ती एकादा वाचून घ्या आणि त्यानुसार त्यांचे विभाजन करायला घ्या. हे करण्यासाठी तुम्हाला बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे तुमच्या मनाची तयारी आधीच करुन ठेवा. शक्यतो तुम्हाला घरी काहीच काम नसेल अशावेळीच हे करायला घ्या. 

ADVERTISEMENT

डेलीवेअर (Daily Wear)

तुमचे रोजचे कपडे तुम्हाला सगळ्यात आधी वेगळे करायचे आहेत. कारण ते तुम्हाला रोज वापरायचे असतात. या मध्ये नाईटवेअर आणि डेवेअर असू शकतात. ते तुम्हाला वेगळे करायचे आहेत. उदा. तुमच्या नाईटी, शॉर्ट पँटस, टिशर्ट, पायजमा. त्यातही तुम्ही जीमला जाणारे असाल तर ते कपडेही वेगळे करुन घ्या.

fold your cloth

ऑफिसवेअर (Office Wear)

नोकरी करणाऱ्यांकडे फॉर्मल किंवा खास ऑफिसला जाण्यासाठी घेतलेले भरपूर कपडे असतात.काही जणांना ऑफिसमध्ये फॉर्मलच घातले जातात. त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे  फॉर्मलवेअर अधिक असतात. तर काहींना ऑफिसमध्ये कपड्यांचे काहीच बंधन नसल्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कपडे असू शकतात. त्यामुळे तुम्हाला ब्लाऊज आणि बॉटम असे विभाजन करायचे आहे. ब्लाऊजमध्ये शर्ट, टिशर्ट, स्वेटशर्ट, कुडती, जॅकेट यांचा समावेश असतो. तर बॉटममध्ये तुमच्या ट्राऊजर्स, जीन्स, स्कर्ट या सगळ्याचा समावेश होतो. जर तुम्हाला शक्य असेल तर पँट आणि स्कर्ट असेही वेगळे करा. या शिवाय आणखी विभाजन करायचे झाले तर इस्त्री करावे लागणारे कपडेही वेगळे काढा.

सणासुदीचे कपडे 

 असे कपडे जे तुम्ही रोज वापरत नाही. पण ते तुमच्या कपड्यात इकडे तिकडे नाचत असतात. पंजाबी ड्रेस असेल तर त्याचा पायजमा, ओढणी, कुडता इकडे तिकडे नाचत राहतो आणि ज्यावेळी तुम्हाला तो ड्रेस हवा असतो त्यावेळी नेमका तुमचा वेळ ते सगळे शोधण्यात जातो. त्यामुळे तुम्हाला तुमचे सणासुदीच्या दिवशी घातले जाणारे कपडे वेगळे करायचे आहेत.

ADVERTISEMENT

वाचा – कपड्यावरील डाग कसे काढावे, जाणून घ्या सोपे उपाय

लाँजरेज

बहुतेक मुलींना वेगवेगळ्या लाँजरेज घालायला आवडतात. त्याही कपाटात इकडे तिकडे लोळत असतात. त्या सगळ्या एकत्र करा तुमच्या गरजेनुसार त्यांची विभागणी करा. म्हणजे हल्ली कपड्यानुसार ब्रा आणि पँटीचे रंग असतात. त्यातही रोज ऑफिससाठी अनेक जण कम्फर्टेबल अशा ब्रा वापरत असतात. त्यामुळे तुमच्या डेली वेअरच्या लॉंजरेज नेहमी वेगळ्या ठेवा आणि ज्या तुमच्या काही खास कपड्यांवरील आहेत त्या कायम त्या ड्रेसेससोबत ठेऊन द्या.म्हणजे त्या इतरवेळी तुम्ही वापरु शकणार नाही.

panties

तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात या गोष्टी

ADVERTISEMENT

ज्वेलरी (Jewellery)

महिलांच्या कपाटातील आणखी एक महत्वाचा पसारा म्हणजे ज्वेलरी. ऑफिस, ट्रेडिशनलवेअर, कॅज्युअल, पार्टीवेअर अशा वेगवेगळ्या प्रकारातील ज्वेलरी तुमच्याकडे असतात. त्यातील तुम्ही सतत वापरत असलेल्या ज्वेलरी वेगळ्या करायच्या आहेत. कानातले, गळ्यातले त्यातही ऑक्साईड, मोत्यांचे असे अजून वेगवेगळे भाग केले तर तुम्हाला ते वापरताना किंवा इतरवेळी शोधताना त्रास होणार नाही.

 jewellery box

मेकअप (Makeup)

आणखी एक गोष्ट कपाटात सतत लुडबडत असते ते म्हणजे मेकअप किट.यातही तुमचा डेलीवेअर मेकअप तुम्हाला वेगळा करता आला तर उत्तम.

नेलपेंटच्या या १० शेड तुमच्याकडे हव्याच

ADVERTISEMENT

उदा.प्रत्येक मुलीकडे किमान ३ ते ४ लिपस्टीक शेड असतातच. पण या सगळ्याच शेड तुम्ही रोज वापरत नाही. त्यामुळे रोज न वापरत नसलेला मेकअप वेगळा काढा.

तर तुम्हाला सगळयात आधी हे या वस्तूंचे विभाजन करायचे आहे.

 **जुन्या वस्तू काढून टाका

कपाटातील सगळ्या वस्तू काढून झाल्यानंतर ज्या वस्तू. कपडे तुमच्या कोणत्याच विभाजनात बसत नसतील. त्या सगळ्या अर्थात जुन्या असतील. तुम्ही त्या खूप वर्षे साठवून ठेवलेल्या असतील. आता मन मोठं करुन तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या सगळ्या जुन्या वस्तू काढून टाकायच्या आहेत. त्यात एखादी जुनी एक्सपायर्ड झालेली लिपस्टिक, नेलपेंट असेल तरी ती तुम्हाला कितीही आवडत असली टाकायची.

कपड्यांची काळजी

कपड्यांच्या घड्या

कितीही कंटाळा आला तरी तुम्हाला तुमच्या कपड्यांच्या घड्या घालायच्याच आहेत. आपण जसे कपड्यांचे विभाजन केले. त्यानुसार तुम्हाला तुम्हाला तुमच्या कप्प्यात जागा करायची आहे. टिशर्टची घडी तुम्हाला अगदी लहान करता येऊ शकते. त्यामुळे तुम्ही जितक्या बारीक आणि चांगल्या घडी घालता येत असतील तितक्या बारीक घड्या घाला. आठवड्याचे कपडे बाजूला काढूनच ठेवा. म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. काही अनप्लान्ड कार्यक्रमांसाठीही कपडे बाजूला काढून ठेवा.

ADVERTISEMENT

मलमल

कपाटातील सिल्क आणि तत्सम नाजूक कपड्यांसाठी मलमलचा वापर करा असे कपडे मलमलच्या कपड्यात बांधून नीट ठेवा.

प्लास्टिक ऑरगनायर (Plastic Organier)

सध्या प्लास्टिक ऑरगनायझर हा चांगला पर्याय आहे. त्यात तुम्हाला तुमचे कपडे नीट ठेवता येतात. मुळात ते कपाटात नीट राहतात. दिसतातही एकदम छान. त्यामुळे तुमच्या इस्त्री केलेल्या कपड्यांसाठी, तुमच्या लाँजरेजसाठी असे प्लास्टिक ऑरगनायझर घेता आले तर उत्तम. ऑनलाईन असे चांगले ऑरगनायझर मिळतात. तुम्ही अशा ऑरगनायझरच्या शोधात असाल तर Trexee Foldable Storage Box Type Non-Smell Drawer Organizer for Socks Bra Tie Scarfs  असे ऑरगनायझर तुम्हाला आवडतात का पाहा

ज्वेलरीची काळजी

तुमच्या रोजच्या ज्या काही ज्वेलरी असतील त्यासाठी एक छान बॉक्स करा. पण हा बॉक्स शक्यतो आडवा आणि चपटा असू द्या. तुमचे कानातले एका थर्माकोलच्या तुकड्याला किंवा प्लास्टिक शीटला अडकून ठेवून द्या म्हणजे त्या तुम्हाला सापडताना त्रास होणार नाही. तुमच्या महागातल्या इमिटेशन ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवताना बॉक्सच्या तळाशी कापूस अंथरा. शक्य असल्यास लहानलहान झीप पाऊच ठेवा. त्यात त्यांना हवा लागत नाही. त्यामुळे ज्वेलरी काळवंडण्याची शक्यताही कमी होते.

Inditradition 36 Grid Cells Plastic Multipurpose Jewelry Organizer Storage Box – Transparent

ADVERTISEMENT

हँगरचे नियोजन

कपाटात असणाऱ्या हँगर सेक्शनमध्ये तुम्हाला काही कपडे लावायचे असतील. तर त्यात शक्यतो तुमच्या साड्या असून द्या शर्ट, जॅकेट ज्यांची घडी होऊ शकत नाही असे कपडे हँगरला लावा. हँगर स्टँडवरील इतरवेळी येणारा ताण कमी होईल.

 organised wardrobe

(फोटो सौजन्य- Instagram)

 

ADVERTISEMENT

 

 

 

12 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT