ADVERTISEMENT
home / मनोरंजन
KGF Chapter 2 trailer

KGF Chapter 2 चे ट्रेलर रिलीज, यशने दमदार ऍक्शनने जिंकली प्रेक्षकांची मने

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट KGF: Chapter 1 च्या घवघवीत यशानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाबद्दल असणारी प्रेक्षकांची उत्सुकता माहिती असल्याने निर्मात्यांनी याआधीच या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स रिलीज केले आहेत. चित्रपट कसा असेल याचा साधारण अंदाज आपल्याला ट्रेलर बघून येतो. त्यामुळे KGF Chapter 2 कसा असेल याचा अंदाज लावण्यासाठी प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत होते. निर्मात्यांनीही प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणून न धरता घोषित केले होते की 27 मार्च रोजी या चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी प्रेक्षकांना दिलेले प्रॉमिस पाळले आणि ठरल्याप्रमाणे काल 27 मार्च रोजी KGF Chapter 2 चे ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. रिलीज होताच या ट्रेलरला प्रेक्षकांनी लगेच भरभरून प्रतिसाद दिला. 

ट्रेलरमध्ये यशच्या दमदार ऍक्शनची झलक 

KGF Chapter 2 च्या ट्रेलरबद्दल माहिती देताना निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की KGF Chapter 2 चे ट्रेलर 27 मार्च रोजी संध्याकाळी 6.40 वाजता प्रदर्शित होईल. ठरल्याप्रमाणे काल एका कार्यक्रमात हे ट्रेलर प्रदर्शित झाले. दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा दमदार अभिनय व ऍक्शन या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. यासोबतच हिंदीतील दमदार अभिनेत्री रवीना टंडन आणि अभिनेता संजय दत्त हे देखील या चित्रपटात झळकले आहेत. त्यांनीही या ट्रेलरमधून शानदार पद्धतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. 

पुनीत राजकुमार यांच्या स्मृतींना उजाळा 

Puneet Rajkumar
Puneet Rajkumar

एका लाँच इव्हेंटमध्ये KGF Chapter 2 चे ट्रेलर रिलीज करण्यात आले. या कार्यक्रमाला हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरनेही उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात चित्रपटाबद्दल बोलताना त्याने कन्नड चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या स्मृतींना उजाळा दिला. मागच्या वर्षीच कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पुनीत राजकुमार यांचे अकाली निधन झाले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कन्नड चित्रपटसृष्टीला व कन्नडभाषिक जनतेला मोठा धक्का बसला होता. कन्नडमधील इतक्या मोठ्या चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीजप्रसंगी पुनीत राजकुमार यांची आठवण काढणे साहजिकच होते. सुपरस्टार यशने देखील पुनीत राजकुमार यांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमात संध्याकाळी 6:40 वाजता चित्रपटाचे आधी कन्नड भाषेतील ट्रेलर लाँच करण्यात आले. यानंतर हिंदी आणि नंतर इतर भाषांमधील ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आले. या ट्रेलरमधील  आपल्या जबरदस्त अ‍ॅक्शनने सुपरस्टार यशने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली. त्याचबरोबर अभिनेत्री रवीना टंडन आणि अभिनेता संजय दत्त हे देखील ट्रेलरमध्ये पूर्ण फॉर्ममध्ये दिसले.

14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार KGF 2

कन्नडभाषेत आलेल्या  KGF चा पहिला भाग 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट  हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्येही डब करण्यात आला होता. आता KGF 2 देखील हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल.. हा चित्रपट यावर्षी 14 एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. झी तमिळ, झी तेलुगू, झी केरलम आणि झी कन्नडने चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क विकत घेतले आहेत.

ADVERTISEMENT

KGF 1 प्रमाणेच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही यश आणि श्रीनिधी शेट्टी हे मुख्य भूमिकेत आहेत. तसेच रवीना टंडन आणि संजय दत्त यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात संजय खलनायक अधीराची भूमिका साकारणार आहे. KGF 2 चे प्रदर्शन कोरोनामुळे अनेकदा पुढे ढकलले गेले होते. पण आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

28 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT