ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
कियारा आडवाणीची बॉलीवूडमध्ये आठ वर्ष, चाहत्यांनी असा व्यक्त केला आनंद

कियारा आडवाणीची बॉलीवूडमध्ये आठ वर्ष, चाहत्यांनी असा व्यक्त केला आनंद

कियारा आडवाणी सध्या बॉलीवूडच्या टॉप स्टार्सपैकी एक आहे. नुकताच तिचा ‘भुलभुलैया 2’ प्रदर्शित झाला आहे तर लवकरच ‘जुग जुग जियो’ प्रदर्शित होणार आहे.  एवढंच नाही तर तिच्या बॉलीवूड करिअरलाही यंदा आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. या आठ वर्षांमध्ये तिने जवळजवळ पंधरा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या अनेक आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असून तिच्याकडे चित्रपटांची सध्या लाईन लागली आहे. सोशल मीडियावरही कियाराचे अनेक चाहते आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर कियाराच्या नावे जवळजवळ चाळीस फॅन क्लब सुरू आहेत. कियाराने ‘फगली’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. फगली 13 जून 2014 साली प्रदर्शित झाला होता. ज्यामुळे तिच्या बॉलीवूड करिअरला आता आठ वर्ष पूर्ण झाली आहेत.  कियाराचं खरं नाव ‘कियारा’ नसून ‘आलिया’ आहे. मात्र तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण करताना सलमान खानच्या सांगण्यावरून स्वतःचं नाव बदलून घेतलं होतं अशी चर्चा आहे.  

किरायावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

कियाराचा ‘भुलभुलैया 2’ प्रदर्शित झाल्यामुळे ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. काहींना तिचा अभिनय खूप आवडला आहे तर काहींनी याबाबत तिची खिल्ली उडवली आहे. मात्र कियाराच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातच आता कियाराला बॉलीवूडमध्ये आठ वर्ष पूर्ण झाल्यामुळे पुन्हा कियारावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. कियारा काही दिवसांपासून खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे. बॉलीवूडमध्ये ती आठवर्षांपासून पाय रोवून घट्ट उभी आहे.  आजवर तिने केलेल्या चित्रपटातील सर्वच चित्रपट हिट ठरले असं नाही. मात्र चाहत्यांकडून तिला नेहमीच चांगल्या प्रतिक्रिया मिळत आल्या आहेत. नुकतंच बॉलीवूडमध्ये आठ वर्ष पूर्ण केल्याबद्दल तिने एका व्हर्चुअल मुलाखतीतून चाहत्यांसोबत संवाद साधला. या दरम्यान चाहत्यांनी तिला काही मजेशीर प्रश्न विचारले. या मुलाखतीत चाहत्यांनी कियाराच्या आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’मधील ‘नच पंजाबन’ या गाण्याची हुक स्टेप चॅलेंजही स्वीकारलं. जगभरातील चाहत्यांनी या मुलाखतीत कियारावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 

कियाराचे आगामी चित्रपट

कियाराने आजवर फगली, एम एस धोनी, कबीर सिंह, गूड न्यूज, शेरशाह अशा हिट चित्रपटांमध्ये स्वतःची स्वतंत्र छाप सोडली आहे. तिचा भुलभुलैया 2 नुकताच प्रदर्शित झालेला असून आता चाहत्यांना ‘जुग जुग जियो’चे वेध लागले आहेत. सध्या कियारा जुग जुग जियोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासोबतच कियारा लवकरच गोविंदा नाम मेरा आणि एस शंकरच्या एका चित्रपटात झळकणार आहे ज्यामध्ये तिच्यासोबत राम चरण असणार आहे. कार्तिक आर्यनसोबत पुन्हा एकदा ती ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटात काम करणार आहे. ज्यामुळे कियाराकडे सध्या चित्रपटांची लाइनच लागलेली दिसत आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
13 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT