मुलं लहान असताना एखादी गोष्ट अगदी विनासयास शिकून जातात. आपल्या मुलांना सगळे काही यावे यासाठी जे पालक प्रयत्न करतात ते अगदी लहानपणापासून मुलांच्या मागे वेगवेगळे क्लास घेऊन लागतात.आपल्या मुलाने कशात करिअर करावे हे पालकांचे अगदी ठरलेले असते. त्यामुळेच लहान वयापासूनच पालक मुलाकडून त्याची तयारी करुन घेतात. पण वाढीच्या या वयात मुलांना भाषा शिकवणे हे अधिक गजेचे असते. कारण या वयात मुलांचा मेंदू हा पूर्णपणे विकसित झालेला नसतो. त्यामुळे त्यांच्याकडून कठीणात कठीण आणि जास्ती जास्त भाषांचा अभ्यास करुन घेणे सोपे जाते. तुमच्याही मुलाचे भाषांवर प्रभुत्व असावे असे वाटत असेल तर तुम्हाला या टिप्स कामी येतील .
भाषा शिकणे का महत्वाचे
भाषा हे तुमचे व्यक्तिमत्त्व दाखवत असते. तुम्ही कसे बोलता याचा फायदा तुम्हाला हा पुढे भविष्यात जाऊन होतो. कॉलेजमध्ये स्पर्धांमध्ये भाग घेताना, नोकरी मिळवताना किंवा एखादे छान प्रेझेंटेशन देताना भाषा किती कामी येते हे तुम्हाला सांगायलाच नको. कारण जितक्या जास्त भाषांचा वापर आणि जितकी शब्दसंपत्ती तितका त्याचा फायदा हा अधिकाधिक होत राहतो. मोठे झाल्यानंतर भाषा शिकणे हे तितके सोपे नसते. म्हणून भाषा शिकवण्याची सुरुवात ही लहान वयात करणे गरजेचे असते
मुलांना आवड असले तरी हे स्नॅक्स अजिबात देऊ नका
भाषांची करा निवड
तुमच्या लहान मुलाला कोणती भाषा तुम्हाला शिकवायची आहे हे निश्चित करा. भविष्यात कोणती भाषा अधिक फायद्याची ठरेल हे देखील तुम्हाला माहीत करुन घ्यायला हवे. पालक म्हणून तुम्ही तितका शोध लावायला हवा. तरच तुम्हाला त्याचा फायदा होण्यास मदत मिळेल. सर्वसाधारणपणे इंग्रजी भाषा ही प्रत्येकाला यायला हवी अशी आहे. त्यामुळे इंग्रजी आणि त्याच्यासोबत काही परदेशी भाषा यांची निवड करा. त्यासाठी योग्य शिक्षक निवडणे देखील फारच गरजेचे असते.
परदेशी भाषा शिकताना
मुल ज्यावेळी लहान असतात त्यावेळी त्यांना परदेशी भाषा शिकणे हे फार सोपे असते. त्यांना कितीही मोठे शब्द सांगितले तर त्याचा उच्चार करणे खूपच सोपे जाते. मोठे झाल्यानंतर पटकन एखादा शब्द आपल्याला उच्चारता येत नाही. पण लहान असताना जीभ पटकन वळते. त्यामुळे कोणतही शब्द असेल तर तो लक्षात राहतो. पण परदेशी भाषा कोणाकडून शिकतो हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. परदेशी भाषा शिकवणारी व्यक्ती ही तितकी शिकलेली आणि भाषेची जाण असलेली असायला हवी.त्यानुसार तुम्ही ट्युटर निवडायला हवा.
सराव करा
मुलांना भाषा शिकवताना ती टिकून राहावी यासाठी तुम्हाला ती सतत बोलणे गरजेचे असते. मुलांना ट्युटर लावून दिला म्हणजे काम संपले असे होत नाही तर तुम्हाला त्यांच्यासोबत मोडक्या तोडक्या भाषेत का असेना संवाद साधणे फारच जास्त गरजेचे असते. म्हणून तुम्ही शक्य असेल तेवढा मुलांसोबत सराव करा. त्यामुळे त्यांची शब्दसंपदा वाढत राहते. एखादा शब्द. त्याचा अर्थ आणि त्याचा वापर करा करावा इतक्या गोष्टी तर तुम्हाला माहीत असायला हव्यात
आता लहान मुलांकडून तुम्ही भाषांचा अभ्यास करायलाच हव्यात
लहान मुलांना अजिबात शिकवू नका असे चुकीचे शब्द