परसदारी पालेभाज्या, फळभाज्या लावणे, भोपळा, तोंडली, कारल्याचे वेल लावणे ही तर आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे. किचन गार्डन हा अनेक वर्षांपासून आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. पण आता कोरोना महामारीच्या काळात तर किचन गार्डनिंगला एक नवीन पुनरुत्थान सापडले आहे. अनेक लोक मनावरील ताणतणाव कमी करण्यासाठी व मन शांत करण्यासाठी बागकामाकडे वळू लागले आहेत. शिवाय, आपल्या अंगणात स्वतः लावलेल्या भाज्या व औषधी वनस्पती कोणाला आवडत नाहीत? सामान्य लोकांपासून ते जुही चावला, शिल्पा शेट्टी आणि ट्विंकल खन्ना यांसारख्या बॉलीवूड सेलिब्रिटींसह आणि ओप्रा विन्फ्रे सारख्या आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटी देखील किचन गार्डनिंग या छंदाकडे वळल्या आहेत.तुम्हालाही स्वतःचे किचन गार्डन तयार करायचे असेल तर पुढील टिप्स वाचा.
तुम्हाला जे खायला आवडते ते बागेत लावा
इन्स्टाग्रामवर तुम्ही पाहत असलेल्या ट्रेंडचे अनुसरण करणे सोपे असले तरी, तुम्ही तुमचा वेळ आणि शक्ती भाज्या, औषधी वनस्पती आणि फळे लावण्यात गुंतवणे महत्त्वाचे आहे जे खाण्यास तुम्हाला आनंद होईल.
बागेचा आकार लहान असला तरी हरकत नाही
तुमच्याकडे बाग तयार करण्यासाठी किती जागा आहे हे महत्वाचे नाही तर उपलब्ध जागेचा तुम्ही कसा वापर करताय हे महत्वाचे आहे. अनेक लोक छोट्याश्या बाल्कनीत देखील सुंदर बाग तयार करतात. हे सर्व तुम्ही जागेचे नियोजन कसे करता त्यावर अवलंबून आहे.
सहचर फुलांची लागवड करा
सहचर लागवड ही एकाच क्षेत्रात वेगवेगळ्या प्रजातींच्या वनस्पती वाढवण्याची क्रिया आहे ज्यामुळे त्यांचा एकमेकांना फायदा होईल. हे परागकणांना तुमच्या किचन गार्डनकडे आकर्षित करेल. तसेच, एका जागेत औषधी वनस्पती लावल्याने कीटकांचे सेंद्रिय व्यवस्थापन करण्यात मदत होते.
झाडे निवडताना सूर्यप्रकाश कसा आहे हे बघा
ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा की काही वनस्पतींना किमान सहा तास सूर्यप्रकाश लागतो. त्यामुळे, तुमच्या स्वयंपाकघरातील बागेत कसा व किती सूर्यप्रकाश येतो यावर लागवडीसाठी योग्य भाज्यांची निवड करा.
रंगीबेरंगी भाज्या आणि फळांनी तुमची बाग सजवा
तुमचे किचन गार्डन सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही गाजर, कोथिंबीर, स्ट्रॉबेरी, बीटरूट इत्यादी रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांची लागवड करू शकता. या झाडांच्या मदतीने तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहून तुमचे आरोग्य उत्तम ठेवू शकता, तसेच तुमच्या बागेचे सौंदर्यही वाढेल.
हँगिंग बास्केट आणि ग्रो बॅग
किचन गार्डनसाठी तुम्ही हँगिंग बास्केट आणि ग्रो बॅग वापरू शकता. त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या किचन गार्डनची देखभाल आणि व्यवस्था करू शकता. लहान जागेत, भांडी आणि कंटेनरमध्ये अनेक झाडे एकत्र लावता येतात. यामुळे तुमचे पैसेही वाचतील व जागा देखील व्यवस्थित वापरली जाईल.
प्रवेशद्वार खास बनवा
तुमच्या बागेचे मुख्य प्रवेशद्वारच आतील सौंदर्याची एक झलक दाखवू शकते. आपण प्रवेशद्वाराला नेहेमीपेक्षा थोडे वेगळे सजवू शकता.
कमी जागेत भरपूर भाज्या आणि फळे पिकवा
किचन गार्डनिंगमध्ये जर तुम्ही जागेचा योग्य वापर केला तर कमी जागेत तुम्ही अनेक फळे आणि भाज्या पिकवू शकता. जर तुमच्याकडे जमीन कमी असेल तर तुम्ही भाजीपाला आणि फळे वेगळ्या रो किंवा कॉलममध्ये लावू शकता. त्यामुळे बागही खूप छान दिसेल आणि झाडांची निगा राखणेही सोपे होईल.
किचन गार्डनिंगचे अनेक फायदे आहेत, यामुळे तुम्हाला सेंद्रिय भाज्या व फळे मिळतील आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील. तसेच, त्यासाठी फारसा खर्चही येत नाही. कमी पैशात आणि कमी कष्टात तुम्ही उत्तम गार्डन तयार करू शकता.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक