मंगळवारी रात्री संगीतक्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले. मंगळवारी रात्री अशी एक बातमी आली, ज्याने केवळ इंडस्ट्रीतील लोकांचेच डोळे पाणावले नाहीत, तर संपूर्ण देशातील लोकांना धक्का बसला. प्रसिद्ध गायक केके हे जग सोडून गेले. लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ‘हम रहे या ना रहें कल’ हे गाणे गाताना हा गायक खरोखरच हे जग इतक्या लवकर सोडून जाईल, असे कुणालाही वाटले नव्हते. केके यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. आपला आवडता गायक आता आपल्यात नाही यावर लोकांचा विश्वास बसत नाहीये. केके यांच्या निधनाची माहिती रात्री उशिरा समोर येताच संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. कोलकाता येथील त्यांच्या शेवटच्या कॉन्सर्टचे व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान केकेने केलेले त्यांचे विनोद काही तासांनंतर दुर्दैवाने खरे ठरले.
स्वतःच्या मृत्यूबद्दल अजाणतेपणाने केलेला विनोद दुर्दैवाने खरा ठरला
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये केके शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अभिनीत ओम शांती ओम या सुपरहिट चित्रपटातील आंखे में तेरी हे प्रसिद्ध गाणे गाताना दिसत आहेत. गाणे म्हणत असताना, त्यांनी माईक प्रेक्षकांकडे वळवला आणि त्यांना गाण्यास सांगितले. यानंतर व्हिडीओमध्ये त्यांनी स्वतःच्या मृत्यूबद्दल एक साधा विनोद केला तो काहीच तासांत दुर्दैवाने खरा ठरला. व्हिडिओतील गाणे प्रेक्षकांना ऐकताच केके म्हणाले, ‘हाय मैं मर जाऊं यहीं’ . ही गंमत म्हणजे ही गोष्ट काही काळानंतर खरी ठरली.त्यांच्या तोंडून निघणारे हे शब्द काही तासांनी खरे ठरतील आणि हा गुणी गायक आपल्याला सोडून जाईल, हे कोणास ठाऊक होते? केके यांच्या जाण्यानंतर आता हा व्हिडिओ पाहून चाहते खूप भावूक झाले आहेत. त्याचवेळी, केकेने हे शब्द तोंडातून का काढले, असा आक्रोश अनेक चाहते करत आहेत.
कॉन्सर्ट दरम्यानच बिघडली तब्येत
कोलकात्याच्या गुरुदास कॉलेजच्या फेस्टमध्ये परफॉर्म करत असताना गायक कृष्णकुमार कुन्नाथ ऊर्फ केके यांची तब्येत अचानक बिघडू लागली. प्रेक्षकांचे मनोरंजन करताना, ते आपल्या सहकाऱ्यांना तब्येतीबद्दल वारंवार सांगत होते. पण प्रेक्षकांच्या मनोरंजन महत्वाचे मानून त्यांनी कॉन्सर्ट न थांबवता गाणे सुरुच ठेवले.स्टेजवर गात असताना खूप घाम आल्याने त्यांनी कधी टॉवेलने तोंड पुसले, कधी पाणी प्यायले, तर कधी स्टेजवर फेरफटका मारून आपला परफॉर्मन्स सुरू ठेवला. जेव्हा त्यांना जास्त त्रास झाला तेव्हा त्यांनी कॉन्सर्टच्या निर्मात्यांना स्पॉटलाइट बंद करण्यास सांगितले. रात्री 8:30 च्या सुमारास, केके लाइव्ह कॉन्सर्ट संपवून हॉटेलवर परतले. मात्र हॉटेलवर गेल्यावरही त्यांना बरे वाटले नाही. आणि ते अचानक कोसळले. त्यानंतर 10:30 च्या सुमारास त्यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (CMRI) नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. रात्री उशिरा ही बातमी समोर येताच सर्वांनाच धक्का बसला.
संगीतक्षेत्रातील हा चमकता तारा अकाली हे जग सोडून गेला. वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी संगीताची सेवा करतानाच या गायकाने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. केके यांनी स्वतःच्या मृत्यूबद्दल सहज केलेले वक्तव्य असे खरे ठरेल असे कुणाच्याही कल्पनेत देखील नव्हते. 90s किड्स आणि मिलेनियल्स यांचे बालपण आणि तरुणपण सुंदर करणाऱ्या केके उर्फ कृष्णकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक