दरवर्षी आतुरतेने वाट पाहिला जाणारा शो म्हणजे ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi). रोहित शेट्टी (Rohit Shetty) निवेदक असणारा हा शो लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यापर्यंत सर्वांचाच आवडता शो आहे. नव्या सीझनची नुकतीच सुरूवात झाली आहे आणि पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांचे धमाके पाहायला मिळाले आहेत. मात्र बिग बॉस (Bigg Boss) फेम निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) मात्र चाहत्यांची नक्कीच निराशा केली आहे. पहिल्याच आठवड्यात शो मधून निक्की बाहेर पडली आहे. अत्यंत निराशाजनक कामगिरी निक्कीने केल्यामुळे तिचे चाहतेही नक्कीच नाराज आहेत. रोहित शेट्टीने अनेक वेळा प्रयत्न करायला सांगूनही निक्कीने चांगली कामगिरी न केल्यामुळे या आठवड्यात निक्कीला बाहेर जावं लागलं आहे. आता पुन्हा वाईल्ड कार्डमधून निक्की येणार की नाही हे पाहवे लागेल.
म्हणून करिश्मा कपूरने दिला होता दिला तो पागल है चित्रपटाला होकार
निक्कीचे अत्यंत वाईट प्रदर्शन
पहिल्या स्टंटपासूनच निक्कीने सतत आरडाओरडा करत अत्यंत वाईट प्रदर्शन केले आहे. यासाठी तिने रोहित शेट्टीकडून ओरडूनही घेतले आहे. भीती असणे साहजिक आहे आणि ती भीती काढण्यासाठीच हा शो आहे. याशिवाय स्पर्धकांच्या जीवाची सर्वात जास्त काळजी मला आणि माझ्या टीमला आहे अशा शब्दात निक्कीला रोहित शेट्टीने खडसावले. मात्र तरीही निक्कीने कोणत्याही स्टंटमध्ये चांगले प्रदर्शन न करता प्रत्येक स्टंट अबॉट केल्याचे दिसून आले. त्यामुळे स्पर्धकांमध्येही तिच्याविषयी नाराजी दिसून आली. तिला पुढे जाण्याची संधी द्यावी की नाही असं स्पर्धकांना विचारले असता अनेकांनी नकार दिल्यामुळे निक्कीला बाहेर पडावे लागले आहे. मात्र आता पुढे शो मध्ये ती पुन्हा दिसणार की नाही हे पुढे पाहावे लागेल. मात्र पुढच्या भागात नक्कीच तिच्या चाहत्यांना तिला सध्या तरी पाहता येणार नाही.
पुन्हा सुरू होणार ‘दी कपिल शर्मा शो’ या कलाकाराची होणार नव्याने एन्ट्री
राहुल, विशाल, दिव्यांकाचे अप्रतिम प्रदर्शन
या आठवड्यात सर्वच स्पर्धकांनी आपल्या भीतीवर मात करत चांगले प्रदर्शन केले आहेत. रोहित शेट्टी या सर्वांवर खूष असून विशेषतः दिव्यांका त्रिपाठी दहिया (Divyanka Tripathi Dahiya) हिचे कौतुक होत आहे. न घाबरता मगरीला उचलून तिने टास्क पूर्ण केल्याचे प्रेक्षकांनीही पाहिले आहे. सर्वच स्तरावर तिचे कौतुक होत आहे. तर सर्वांचा आवडता राहुल वैद्यही (Rahul Vaidya) देखील कुठेच मागे नाही. पाण्याची भीती असूनही राहुलने पाण्याची स्टंट पूर्ण केल्याने त्याचे चाहतेही नक्कीच आनंदी झाले आहेत. तर सरप्राईज पॅकेज विशाल आदित्य सिंह (Vishal Aditya Singh) देखील पाण्याला घाबरत असूनही तिन्ही स्टंटमध्ये अप्रतिम कामगिरी करत पुढे आला आहे. याशिवाय पिंजऱ्यातील चित्यासमोर जाऊन अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani), श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आणि लहानशी अनुष्का सेन (Anushaka Sen) यांनीही अप्रतिम कामगिरी केली आहे. यावेळी स्पर्धकांनी आपल्या मनाची चांगलीच तयारी केली असल्याचे दिसून येत आहे. आपल्या मनातील भीती बाजूला ठेऊन स्टंट पूर्ण करायचेच आहेत ही जिद्द प्रत्येकामध्ये दिसून येत आहे. पुढे पुढे अनेक स्टंट्स वाढतच जाणार आहे. त्यामुळे आता कोण जीवाची बाजी लावत पुढे जाईल याचीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.
तामिळ अभिनेता सिद्धार्थला केलं मृत घोषित,युट्युबकडे केली तक्रार
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक