ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
know-about-some-snacks-you-can-made-with-moong-dal-for-breakfast-in-marathi

मूगाच्या डाळीने बनवा हेल्दी नाश्ता, चवही जिभेवर रेंगाळेल

जेव्हा हेल्दी डाएटबाबत आपण विचार करतो तेव्हा त्यामध्ये आपण डाळींचा समावेश नक्कीच करून घेतो. पण त्यातही मूग डाळ ही आपल्या शरीरासाठी अधिक चांगली असते. डाळीमध्ये विविध विटामिन्स, लोह, मॅग्नेशियम आणि झिंक असतात. हे सर्व पोषक तत्व शरीराचे कार्य अधिक चांगले करण्यास प्रोत्साहित करतात. पण नुसती आमटी अथवा डाळीचे सेवन करायचे म्हटल्यानंतर अनेकांना कंटाळा येतो. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकांना आमटी खाणे आवडत नाही. पण अशावेळी डाळ पोटात जायला हवी असले तर आमटीपेक्षाही हेल्दी नाश्ता स्वरूपात तुम्ही डाळ पोटात घालवू शकता. यामध्येही मूगाची डाळ ही आरोग्याला लाभदायक ठरते. नाश्त्यासाठी तुम्हाला मूगाच्या डाळीची रेसिपी आम्ही देत आहोत. असे दोन पदार्थ जे तुम्हाला नक्की आवडतील. 

मूग डाळीचा डोसा (Moong Dal Dosa)

Moong Dosa – Instagram

तुम्हाला नाश्त्यासाठी काही हेल्दी आणि चांगले खायचे असेल तर तुमच्यासाठी मूगडाळीचा डोसा हा एक चांगला पर्याय आहे. सकाळचा नाश्ता काय करायचा असा प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून पाहू शकता. 

साहित्य 

  • अर्धा कप मूग डाळ
  • 2 मोठे चमचे तांदूळ – हवे असल्यास
  • भिजविण्यासाठी पाणी 
  • मिसळण्यासाठी पाणी 
  • एक लहान चमचा कापलेले आले 
  • एक लहान कापलेली हिरवी मिरची 
  • 2 मोठे चमचे कापलेली कोथिंबीर
  • एक चिमूटभर हिंग 
  • अर्धा चमचा जिरे 
  • आवश्यकतेनुसार मीठ 

टॉपिंगसाठी साहित्य 

ADVERTISEMENT
  • एक लहान कापलेली हिरवी मिरची 
  • अर्धा कप कापलेला कांदा 
  • 1-2 मोठे चमचे कापलेली कोथिंबीर
  • तेल अथवा तूप, आवश्यकतेनुसार

डोसा बनविण्याची पद्धत 

  • सर्वात पहिले मूगडाळ आणि तांदूळ धुऊन घ्या
  • त्यानंतर मूग आणि तांदूळ रात्री पाण्यात भिजत घाला आणि रात्रभर तसंच ठेवा 
  • सकाळी पाणी काढून टाका आणि त्यात आलं, हिरवी मिरची, हिंग, जिरे, कोथिंबीर, मीठ सर्व एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्या 
  • ही वाटलेली पेस्ट एका बाऊलमध्ये काढा आणि मग त्यात डोशाप्रमाणे योग्य बॅटर ठेऊन पाणी मिक्स करा 
  • एका बाजूला तवा तापत ठेवा आणि त्यावर तूप वा तेल घाला आणि त्यावरून डोशाप्रमाणे बॅटर पसरवा 
  • त्यात कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला आणि शिजू द्यावा. दोन्ही बाजूला व्यवस्थित शेकावा. तुम्हाला हवं असेल तर त्यावर तुम्ही बटरही घालू शकता 
  • मूगडाळीचा तयार डोसा हा नारळाच्या चटणीसह खायला द्यावा 

मूगडाळीचा ढोकळा (Moong Dal Dhokla)

Moong Dholkla – Instagram

मूगडाळीचा ढोकळा अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक असतो. मूग, हर्ब्स आणि काही मसाल्यांपासून हा ढोकळा तयार करण्यात येतो. 

साहित्य 

  • 1 कप मूग डाळ
  • 1 मोठा चमचा आलं-हिरव्या मिरचीची पेस्ट
  • पाणी 
  • 1 मोठा चमचा कापलेली कोथिंबीर
  • 1 मोठा चमचा तेल
  • 1 मोठा चमचा लिंबाचा रस 
  • चवीनुसार मीठ 
  • 1 चमचा फ्रूट सॉल्ट अथवा इनो 
  • फोडणीसाठी 1 चमचा तेल
  • अर्धा चमचा मोहरी 
  • अर्धा चमचा जिरे 
  • 1 चिमूटभर हिंग 
  • 1 चमचा भाजलेले तीळ 
  • 1 काडी कडिपत्ता 
  • 2 चमचा पाणी 
  • गार्निशिंगसाठी कापलेली कोथिंबीर 
  • खवलेला नारळ

मूगडाळ ढोकळा बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • मूगडाळ व्यवस्थित धुऊन घ्यावी 
  • त्यानंतर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा 
  • सकाळी उठल्यावर पाणी काढून टाका आणि त्यात हिरवी मिरची आणि अर्धा कप पाणी घालून पेस्ट करून घ्यावी. जास्त पातळ बनवू नका 
  • हे बॅटर ढोकळ्याला योग्य असेच बनवा 
  • वाटलेल्या पेस्टमध्ये आलं-हिरवी मिरची पेस्ट, तेल, लिंबाचा रस आणि मीठ घालून योग्य पद्धतीने मिक्स करा. त्यात फ्रूट सॉल्ट अथवा इनो मिक्स करा
  • आता एका मोठ्या पॅनमध्ये साधारण 2 ते 2.5 कप पाणी घ्या आणि कढईमध्ये एक लहान स्टँड ठेवा. पाणी उकळवा 
  • त्यानंतर पॅनमध्ये तेल लावा आणि त्यामध्ये वरील बॅटर घाला
  • पॅन साधारण 15 मिनिट्स झाकून ठेवा आणि वाफेने हे बॅटर तुम्ही शिजू द्या 
  • त्यानंतर थोडं थंड करून हे बाहेर काढा आणि त्याचे चौकोनी तुकडे कापा 
  • एका लहान पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता घाला आणि तडतडल्यावर त्यात 2 चमचे वरून पाणी घाला आणि हे मिश्रण ढोकळ्यावर घाला 
  • वरून कोथिंबीर आणि खोवलेला नारळ घाला आणि पुदिन्याच्या चटणीसह अथवा नारळाच्या चटणीसह खायला द्या

संध्याकाळी अथवा सकाळी नाश्ता काय करायचा असा प्रश्न असेल अथवा तुमच्या घरातील व्यक्ती आमटी खात नसतील तर हे दोन्ही पदार्थ तुम्हाला नक्कीच करून पाहता येतील. हे पदार्थ चविष्ट असून याची चवही बराच वेळ जिभेवर रेंगाळत राहाते. तुम्हीही नक्की या रेसिपी ट्राय करा आणि आम्हाला टॅग करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

19 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT