ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
know-how-to-use-saffron-right-way-in-cooking-in-marathi

केशर वापरण्याची योग्य पद्धत घ्या जाणून, वापरणे होईल सोपे

स्वयंपाकघरातील सर्वात जास्त महाग पदार्थ कोणता असं विचारलं तर नक्कीच सर्वांच्या तोंडी केशर हेच नाव असणार. गोड पदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी आणि सुगंधी करण्यासाठी केशरचा उपयोग केला जातो. कितीही महाग असले तरीही काही पदार्थांमध्ये केशरचा वापर हा करण्यात येतोच. बिर्याणी असो वा खीर अनेक पदार्थांमध्ये केशरचा उपयोग करण्यात येतो. केशर एक सुगंधित मसाला म्हणून ओळखण्यात येते. मात्र केशर हे अत्यंत डेलिकेट आहे. उदाहरणार्थ स्वयंपाकघरात पदार्थामध्ये केशराचा चुकीचा वापर करण्यात आल्यास, केशराचा सुगंध कमी होतो. तसंच चुकीचा वापर केल्यास, पोषक तत्वाचे यामुळे नुकसान होते. त्यामुळे जेव्हा तुम्ही केशरचा वापर करणार असाल तेव्हा ते योग्य रितीने वापरण्यात येणे गरजेचे आहे. आपण केशराचा वापर करताना योग्य तऱ्हेने कसा करावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

केशरामुळे होतात हे फायदे 

Kesar

केशरमध्ये औषधीय गुण असतात. केवळ आपल्या देशातच नाही तर जगभरात सर्वात महाग मसाल्यांमध्ये केशराचे नाव घेण्यात येते. एखाद्या बारीक दोऱ्याप्रमाणे दिसते. असं म्हणतात की, केशराची उत्पत्ती ही ग्रीसमध्ये झाली आहे. पण हे मुख्य स्वरूपात ईराण, मोरोक्को आणि भारतामध्ये तयार होते. केशरामध्ये अँटीऑक्सिडंट असून विटामिन्स आणि मिनरल्सदेखील आढळतात. आयुर्वेदामध्येही केशराचा वापर लाभदायक मानला गेला आहे. असं म्हटलं जातं की, केशर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरण्यात आले तर प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून ते हंगामी आजार बरे करण्यापर्यंत याचा उपयोग करून घेता येतो. तसंच केशरमध्ये पोटॅशियम अधिक असल्यामुळे रक्तदाबाची समस्या कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

भिजवून करा वापर 

केशर वापरण्याचा एक सोपा उपाय म्हणजे तुम्ही केशर भिजवा आणि मग त्याचा वापर करा. वास्तविक जर तुम्ही केशर शिजवून आपल्या पदार्थांमध्ये समाविष्ट करत असाल तर उष्णतेने याचा स्वाद खराब होतो. त्यामुळे भिजवूनच तुम्ही केशर वापरा. तुम्ही केशर दूध अथवा पाण्यात भिजवून ठेवा. काही वेळानंतर तुम्ही त्याचा वापर करा. केशर रात्रभर मात्र भिजवून मग त्याचा वापर करू नका. साधारण 10 मिनिट्साठी भिजवा आणि मगच त्याचा वापर करा. रात्रभर भिजवल्यास, याचा सुगंध नष्ट होतो आणि स्वादही येत नाही. 

पावडर बनवा 

केशर वाटूनदेखील तुम्ही वापरू शकता. लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये केशराचे धागे वाटा आणि त्यात चिमूटभर साखर मिक्स करा. केशर या साखरेलाही त्याच्या रंगात रंगवते. केशर तुम्ही दोन चमचे गरम पाण्यात मिक्स करा. आता हे मिश्रण तुम्ही तुमच्या तयार केलेल्या पदार्थांमध्ये तुम्ही मिक्स करू शकता. विशेषतः बिर्याणीमध्ये असे केशर तुम्ही वापरून पाहा. तुम्हाला याचा वेगळाच स्वाद मिळतो. 

ADVERTISEMENT

डायरेक्टदेखील वापरू शकता

तुम्ही जर असा एखादा पदार्थ बनवत असाल, ज्यामध्ये अधिक लिक्विडचा वापर करण्यात येतो तर असा पदार्थ तयार करण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही अशा पदार्थांमध्ये केशराचा डायरेक्ट वापरही करू शकता. मात्र हे केशर सुरूवातीलाच मिक्स करू नये. तर पदार्थ तयार होण्यासाठी साधारण 10-15 मिनिट्स असतील तेव्हाच मिक्स करा. जेणेकरून केशराचा योग्य सुगंध पदार्थाला लागेल आणि तुम्ही खाण्याचा स्वादही व्यवस्थितपणे घेऊ शकाल. 

तुम्हीही तुमच्या पदार्थांसाठी अशाच प्रकारे केशर वापरले तर पदार्थांचा स्वाद कधीही बिघडणार नाही आणि केशराचा स्वाद आणि सुगंध दोन्ही व्यवस्थित पदार्थांना लागेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

22 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT