ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
know-more-details-about-angarki-chaturthi-in-2022-in-marathi

अंगारक संकष्ट चतुर्थी योग म्हणजे नेमके काय । जाणून घ्या अंगारक संकष्ट चतुर्थी बद्दल माहिती

विघ्नहर्ता श्रीगणेश आपल्या सर्व भक्तांचे संकट हरतो असा समज आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीचा अनेक जण उपवास करतात. खरं तर दर महिन्याला संकष्ट चतुर्थी येते. पण त्यातही अंगारकी संकष्टी चतुर्थीला (Angarki Sankashti Chaturthi) अधिक महत्त्व देण्यात आले आहे. महिन्यातून दोन चतुर्थी येतात. कृष्ण पक्षाची चतुर्थी म्हणजे संकष्टी आणि शुक्ल पक्षाची चतुर्थी म्हणजे विनायकी चतुर्थी असे सांगितले जाते. मात्र अंगारकीचे वेगळे असे महत्त्व काय असे विचारले तर जेव्हा कृष्ण पक्षाची चतुर्थी ही मंगळवारी अर्थात गणपतीच्या वाराच्या दिवशी येते तेव्हा त्या दिवसाला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते आणि गणपतीच्या वाराच्या दिवशी ही चतुर्थी आल्यामुळे हा दिवस अधिक महत्त्वाचा (Importance of Angaraki Chaturthi) ठरतो. मंगळवाराच्या दिवशी चतुर्थी आल्यास, गणेशाच्या पूजेमध्ये मंगळाचा प्रभाव वाढतो असे ज्योतिषशास्रात सांगितलं जातं. याशिवाय पुराणात सांगितल्याप्रमाणे या दिवशी जी व्यक्ती गणपती बाप्पाची पूजा करते अथवा उपवास करते, त्या व्यक्तीला गणेशाच्या कृपेसह योग्य आणि चांगली फलप्राप्ती होते. 

गणशेला पूजा समर्पित 

ज्यांना दर महिन्याला संकष्टीचा उपवास करता येत नाही ते या दिवसाला आपली गणेशाप्रती भक्ती समर्पित करतात. तसंच आपली कामे मार्गी लागण्यासाठी, आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठीदेखील काही व्यक्ती या दिवशी उपवास करतात. अर्थात या गोष्टी तुमच्या श्रद्धेनुसार अवलंबून असतात. असे म्हटले जाते की, ब्रम्हाडातील मंगळ ग्रहाच्या पुण्य लहरी अंगारकी संकष्टीच्या (Angaraki Chaturthi 2022) दिवशी अधिक सहस्र पटींने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे चंद्रदर्शन करून हा उपवास सोडल्यास, तुमच्या इच्छा पूर्ण होतात. 

काय आहे अंगारक संकष्ट चतुर्थी ची कथा – Angarak Chaturthi Katha Marathi

Angarki Sankashti Chaturthi 2022

जेव्हा मंगळवारी संकष्टी येते तेव्हा त्या दिवसाला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते. पण यामागेही पुराणकाळापासून एक कथा असल्याचे सांगितले जाते.  यामागची कथा तितकीच मनोरंजक आहे. कृतयुगामध्ये अवंती नगरीमध्ये वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज नावाचे एक महान गणेशभक्त होते. त्यांनी सदर युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. तर या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंकारक नामक, जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता असे सांगितले जाते. हा पुत्र सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्या मुलाने साधारण एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला अर्थात आपल्या आराध्य दैवताला प्रसन्न करून घेतले. ज्या दिवशी गणपती त्याला प्रसन्न झाला तो दिवस म्हणजे अंगारकी संकष्ट चतुर्थी. 

या पुत्राने स्वर्गात राहून अमृतप्राशन केले आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान प्रसन्न झालेल्या श्रीगणेशाकडे मागितले. तर प्रसन्न झालेल्या श्रीगणेशानेसुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की, यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवाराची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारीका या नावाने ओळखली जाईल आणि संबंधित उपासकाला 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल. तसंच तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्या उपसकांमध्येही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील. अशाप्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारका सारखा लाल आहेस म्हणून अंकाकर व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावे तुला ब्रम्हांडातल्या आकाशातील ग्रहांमध्ये स्थान मिळेल. याशिवाय तू सदैव अमृत प्राशन करशील. त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. 

ADVERTISEMENT

त्यामुळेच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत अथवा उपवास करणे जमत नसेल अशा व्यक्तींनी अंगारकी मात्र न विसरता आवर्जून करावी . याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेल्याचे सांगण्यात येते. 

Best Ganesh Chaturthi Wishes Hindi
Ganesh Chaturthi Shayari Hindi

कसे करावे अंगारकी चतुर्थीचे पूजन – Angarak Chaturthi Pujan Marathi

  • सकाळी उठून स्नान करावे आणि उपवास धरावा 
  • त्यानंतर गणेशाची पूजा करून नमस्कार करावा. जास्वंदाचे फूल वहावे
  • लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती विराजमान करावी 
  • धूप, दीप, नेवैद्य दाखवावा आणि फुले अर्पण करावी
  • संध्याकाळी घरी आल्यावर चंद्रोदय झाल्यानंतर बाप्पाला दुर्वा वाहाव्यात आणि बाप्पाच्या आवडत्या उकडीच्या मोदकाचा प्रसाद दाखवावा

विशेष सूचना – आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला पाठिंबा देत नाही. पूजा करणे अथवा उपवास करणे हा प्रत्येकाच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा भाग आहे हे लक्षात ठेवा. तुमची गणपतीवर श्रद्धा असल्यास अंगारकीचे महत्त्व जाणून घ्यायचे असल्यास या लेखाचा नक्की आधार घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
30 Aug 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT