ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
know-the-difference-between-black-tea-and-milk-tea-in-marathi

दुधाचा चहा आणि ब्लॅक टी मध्ये नक्की फरक काय आहे

चहा हे एक असे पेय आहे, ज्यामुळे अनेकांच्या घरी दिवसाची सुरूवात होते. चहाचे सेवन हे जगभरात सगळीकडेच करण्यात येते. पण भारतामध्ये सर्वाधिक चहाचा खप होतो अर्थात सर्वाधिक चहाची खरेदी होते आणि सर्वाधिक चहा (Tea) पिण्यात येतो. इतकंच नाही तर भारतात चहाचे सर्वाधिक उत्पादनही होते. भारतीय चहा बोर्डाच्या एका सर्वेक्षणानुसार, भारताचा चहा उत्पादनामध्ये जगभरात दुसरा क्रमांक लागतो. तर भारतामध्ये 80 टक्के घरांमध्ये चहाचे सेवन करण्यात येते असंही सिद्ध झाले आहे. असं असलं तरीही अनेक हेल्थ कॉन्शस असणाऱ्या व्यक्ती अर्थात साखरेचे सेवन नको अथवा आरोग्याची अधिक काळजी घेणाऱ्या व्यक्ती या ब्लॅक टी (Black Tea) पिण्याला प्राधान्य देतात. पण तुम्हाला माहीत आहे का? दुधाचा चहा आणि ब्लॅक टी यामध्ये नक्की फरक काय आहे. आज आम्ही तुम्हाला हाच फरक या लेखातून सांगणार आहोत. 

ब्लॅक टी चे आरोग्यदायी फायदे (Benefits of Black Tea For Health)

ब्लॅक टी अर्थात काळा चहा हा आरोग्यासाठी अत्यंत चांगला मानला जातो. यामुळे तुम्हाला खूपच चांगला फायदा मिळतो. कोरोनरी धमनी आजार बरा करण्यासाठी याचा उपयोग करून घेतला जातो. इतकंच नाही तर गॅस्ट्रोइंटेस्टायनल आजारावरही याचा चांगला प्रभाव दिसून येतो. कोणतीही व्यक्ती दम्याने आजारी असेल तर ब्लॅक टी पिण्यामुळे अशा व्यक्तींना फायदा मिळतो. कारण यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत नाही आणि याशिवाय आरामदेखील मिळतो. 

  • मासिक पाळीच्या दिवसात अथवा मेनोपॉज दरम्यान अनेक समस्यांपासून सुटका मिळवून देण्यास ब्लॅक टी ची मदत होते 
  • ब्लॅक टी मुळे पचनतंत्र सुधारते
  • ब्लॅक टी मुळे अधिक उर्जा मिळते 
  • याच्या सेवनामुळे त्वचा आणि केस अधिक चांगले होतात
  • ब्लॅक टी तुमच्या स्मरणशक्तीसाठी आणि तारूण्य राखण्यासाठीही अधिक उपयुक्त ठरतो 
  • तसंच तुमच्या डोक्यात तणाव असेल तर तुम्ही ब्लॅक टी चा आधार घेऊ शकता
  • हाडांची ठिसुळता कमी करण्यासाठीदेखील ब्लॅक टी चा उपयोग करून घेता येतो 

कोणत्या वेळी प्यावा ब्लॅक टी 

काळा चहा हा आरोग्यासाठी लाभदायक आहे हे खरं आहे, मात्र हा योग्य वेळी पिणेदेखील गरजेचे आहे. जेवल्यानंतर त्वरीत ब्लॅक टी पिऊ नका कारण यामध्ये फिनोल नावाचे एक रसायन असते, जे जेवणानंतर त्वरीत काळा चहा प्यायल्यास, शरीरात लोह मिळविण्यामध्ये बाधा घालू शकते. ज्या व्यक्तींच्या अंगात लोहाची कमतरता आहे त्यांनी अजिबात जेवणानंतर काळा चहा पिऊ नये. यापेक्षा तुम्ही दोन्ही जेवणाच्या मधल्या वेळात अथवा दिवसाच्या सुरूवातीला काळा चहा पिऊ शकता. यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. 

दुधाच्या चहाचे आरोग्यदायी फायदे (Milk Tea Benefits for Health)

काळ्या चहाप्रमाणे दुधाच्या चहाचेही लाभ आहेत. तसंच दुधाचा चहा तुमच्या जिभेला अधिक चांगला स्वाद मिळवून देतो. 

ADVERTISEMENT
  • दुधाच्या चहाचे फ्री रॅडिकल्स आणि अँटिऑक्सिडंट्स हे चहा पिण्याच्या लायक बनवते 
  • एक कप दुधाचा चहा शरीराला ऊर्जा मिळवून देते आणि दुधातील कॅल्शियम हाडांना मजबूत बनविण्यास मदत करते
  • दुधाचा चहा हे ऊर्जेचा मोठा स्रोत असून तणाव कमी करण्यासाठीही याची मदत होते. यामध्ये असणारे कॅफेन शरीराला अधिक ऊर्जा मिळवून देण्यास मदत करते 
  • दुधाच्या चहामध्ये एक अँटी-इन्फ्लेमेटरी एजंट असते, जे चहामध्ये अँटीऑक्सिडंट स्वरूपात काम करते
  • वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो
  • कार्बोहायड्रेट, खनिज आणि कॅल्शिमय असल्यामुळे दुधाचा चहा हे एक आरोग्यदायी पेय समजण्यात येते 

मात्र दुधाच्या चहाचे अधिक सेवन करण्याने नुकसान होते. अधिक दुधाचा चहा सतत सेवन करत असाल तर टाईप 2 मधुमेह, चिंता, अनिद्रा, तेलकट त्वचा आणि मुरूमं, बद्धकोष्ठता, डिहायड्रेशन, महत्त्वपूर्ण पोषक तत्वांची कमतरता आणि चहाचा एक प्रकारचा नशा अशा सर्व समस्यांना सामोरे जावे लागते. तर ब्लॅक टी च्या सेवनाने या आजारांना सामोरे जावे लागत नाही. कोणतीही गोष्ट प्रमाणात केल्यास, त्रास होत नाही. मात्र दुधाच्या चहाचा बरेचदा लोकांना एक प्रकारचा नशा असतो असंही दिसून आलं आहे. त्यामुळे सहसा दुधाच्या चहापेक्षा ब्लॅक टी पिणे योग्य ठरते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

13 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT