कुर्ता (कुरता) आणि कुर्ती (कुरती) हे खरं तर वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे आहेत. मात्र यातला फरक अनेक जणांना कळत नाही. फॅशन ट्रेंडप्रमाणे यामध्ये अनेक बदल झाले आहेत. कुरता असो वा कुरती दोन्ही घालणे अत्यंत आरामदायी असते. पण यातील फरक बऱ्याच जणांना कळत नाही. तुम्हाला वाटेल की, हे असं कसं होऊ शकतं. आतापर्यंत आपण सगळ्यालाच कुरता अथवा कुरती असं म्हणत आलो आहोत. पण कुर्ता आणि कुर्ती हे दोन्ही वेगळे आहेत. यातील फरक आम्ही या लेखातून तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही नक्की कुर्ता घालताय की कुर्ती हे तुम्हीही जाणून घ्या.
कुर्ता (Kurta)
तुम्ही कुर्ता तर नेहमी घातला असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, कुर्ता आणि कुर्ती या दोन वेगवेगळ्या स्टाईल आहेत आणि यातील वेगळेपणा नक्की कसा ओळखायचा? तर कुर्ता हा कॉलरशिवाय असतो आणि सैलसर असतो, जो तुमच्या गुडघ्याच्या वरपर्यंत असतो. कॅज्युअल, पारंपरिक आणि आरामदायी कपड्यांच्या स्वरूपात कुर्ता ही स्टाईल दिसून येते. अधिक प्रमाणात कुर्ते हे सिल्क अथवा कॉटनच्या कपड्यांमध्ये बनविण्यात येतात.
तुम्ही जर ऑफिसला जाण्यासाठी अथवा कोणत्याही पार्टीला जाण्यासाठी कपडे निवडत असाल तर तुम्हाला नक्की कुर्ता स्टाईल वापरता येते. जीन्स अथवा बेल बॉटम जीन्स आणि सलवार, पटियाला यासह तुम्ही कुर्ता स्टाईल करू शकता. ऑफिसमध्ये घालून जाण्यासाठी ही उत्तम स्टाईल आहे. त्याशिवाय तुम्हाला आज नक्की काय घालायचं असा प्रश्न पडला असेल तेव्हा तुम्ही पर्याय म्हणून कुर्ता निवडू शकता.
कुर्ती (Kurti)
कुर्ती म्हणजे स्लाईड स्लिटमध्ये असणाऱ्या आणि कंबरेच्या वरपर्यंत याची उंची असते. याशिवाय यामध्ये मिड्रिफ असते. सर्वात जास्त उत्तरेकडे प्रसिद्ध असणारी ही कुर्ती वेगवेगळ्या स्टाईलची असते. पंजाबी कुर्ती, बिहारी कुर्ती, उत्तर प्रदेश, सिंध, गुजरात आणि राजस्थान या ठिकाणीची विविधता घेऊन कुर्ती बनविण्यात येते. याशिवाय व्ही नेक, बोट नेक, मँडरिन कॉलर, किहोल आणि ऑफशोल्डर अशा वेगवेगळ्या स्टाईलच्या आणि कॉलर्सच्या कुर्ती आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत. लिनन, रेशम, कपास आणि शिफॉन या कपड्यांचा वापर करून कुर्तीची स्टाईल शिवण्यात येते.
कोणत्याही पारंपरिक कार्यक्रमाला अथवा पूजेमध्ये तुम्ही जाणार असाल, तर कुर्ती हा उत्तम पर्याय आहे. कुर्ती दिसण्यात अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते आणि याखाली सलवार पटियाला असा वेगवेगळा पर्याय घालण्यासाठी निवडू शकता.
कुर्ता आणि कुरतीमध्ये काय आहे समान
- कुर्ता आणि कुर्ती हे दोन्ही उत्तर भारतात अधिक प्रसिद्ध आहे
- भारतीय महिला या कुर्ता अथवा कुर्ती दोन्ही अन्य देशांपेक्षा अधिक प्रमाणात वापरतात
- दोन्ही अपर आऊटफिट म्हणून वापरण्यात येते
- बाहेर जाताना सहज घालता येते आणि कोणत्याही खास कार्यक्रमामध्येही याचा वापर करता येतो
कुर्ता आणि कुर्तीमधील फरक
- कुर्ता तुम्ही जीन्स, चुणीदार, पायजमा यासह घालू शकता तर कुर्तीच्या खाली तुम्हाला सलवार, लेगिंग, जीन्स, ट्राऊझर अथवा पलाझो असे विविध पर्याय निवडू शकता
- कुर्ते हे सुती अथवा रेशमसारख्या हलक्या कपड्यांपासून तयार होतात. तर कुर्ती या शिफॉन, लिनन, कॉटन अर्थात सुती आणि मऊ मुलायम कपड्यांपासून तयार होतात
- कुर्ते हे कॉलरलेस शर्टाप्रमाणे असतात, अर्थात ट्रेंड्सनुसार आता त्यामध्ये काही अनेक बदलही झाले आहेत. तर कुर्ती या विभिन्न प्रकारच्या स्टाईल आणि नेक स्टाईलमध्ये उपलब्ध असतात
- उंचीला कुर्ते हे कमी असतात. तर, कुर्तीची लांबी ही कुर्त्याच्या तुलनेत अधिक असते
स्टायलिंग टिप्स
- कुर्तीसह तुम्ही लेगिंग, शरारा, क्लासिक फिट पँट, स्कर्ट अथवा धोती पँट काहीही घालू शकता. त्याशिवाय कुर्तीसह तुम्ही रंगबेरंगी दुपट्टादेखील कॅरी करू शकता
- कुर्त्यासह जीन्स ही उत्तम स्टाईल आहे. तसंच बॉटम जीन्स, स्किन फिट जीन्स आणि अन्य स्टाईलची जीन्स ही तुम्हाला अधिक चांगली दिसू शकते
- कुर्तीसह आजकाल पँट पलाझो ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही साध्या कुर्तीसह पँट पलाझो आणि रंगबेरंगी दुपट्टेही स्टाईल करू शकता
- आपल्या आऊटफिटच्या हिशेबाने मेकअप आणि हेअरस्टाईलची तुम्ही काळजी घ्यायला हवी
- तुम्हाला हवं असेल तर कुर्त्यासह तुम्ही फ्लेअर्ड स्कर्टदेखील घालू शकता. फ्लेअर्ड स्कर्टमध्ये तुमचा लुक अधिक वेगळा दिसतो
- आजकाल श्रगदेखील ट्रेंडमध्ये आहेत आणि तुम्ही कुर्त्यासह श्रगची स्टाईल करू शकता. कुर्तीसह तुम्हाला श्रग हा इंडो-वेस्टर्न स्टाईल मिळवून देतो
- तुम्ही एखाद्या लग्नाला जात असाल आणि तुम्हाला साडी नेसायची नसेल तर तुम्ही कुर्ती अथवा कुर्त्यासह शरारा घालू शकता. मात्र तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला जात आहात त्यानुसार कुर्ता अथवा कुर्तीची स्टाईल तुम्ही मॅच करा
आम्ही सांगितलेला फरक आता तुमच्या लक्षात आला असेलच. तुम्हीही तुमच्या स्टाईलमध्ये आता कुर्ता आणि कुर्तीचा समावेश अशा पद्धतीने करून घ्या.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक