ADVERTISEMENT
home / Fitness
know-the-right-way-of-having-body-detox-water-in-marathi

बॉडी डिटॉक्स वॉटरचा वापर करण्याची योग्य पद्धत

ज्याप्रकारे आपण आपल्या शरीराची बाहेरून स्वच्छता राखतो, तसंच शरीराच्या आतील स्वच्छता राखणेही तितकेच गरजेचे आहे. बरेचदा शरीरातील घाण बाहेर काढण्यासाठी बॉडी डिटॉक्स वॉटरचा (Body Detox Water) वापर करण्यात येतो. बऱ्याच जणांना वाटते की, डिटॉक्स वॉटर केवळ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र असं अजिबात नाही. हे मेटाबॉलिजम बूस्ट करण्यासह शरीरातील साठलेली घाण अर्थात टॉक्झिक्स बाहेर करण्यासाठी मदत करते. शरीरासाठी याचा चांगला फायदा होतो. आजकाल वेगवेगळ्या घटकांच्या मदतीने डिटॉक्स वॉटर बनविण्यात येते. पण यामुळे योग्य फायदा मिळतोच असं नाही. तुम्ही योग्य पद्धतीने डिटॉक्स वॉटर न तयार केल्याने आणि न प्यायल्याने त्याचा फायदा मिळत नाही. या लेखातून आम्ही तुम्हाला डिटॉक्स वॉटर बनविण्याची योग्य पद्धत आणि फायदा देत आहोत. वाचा आणि उपयोग करून घ्या. 

बॉडी डिटॉक्स वॉटरमुळे मिळतात हे फायदे 

बॉडी डिटॉक्स वॉटर पिण्याची पद्धत जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला याचे फायदे माहीत असायला हवेत जे पुढीलप्रमाणे आहेत – 

  • बॉडी डिटॉक्स वॉटर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते
  • तसंच तुमचे वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो 
  • तुम्हाला सतत इन्फेक्शन होत असेल तर ते कमी करण्यासाठीही बॉडी डिटॉक्स वॉटरचा फायदा होतो 
  • बॉडी डिटॉक्स वॉटर तुमचे मेटाबॉलिजम वाढविण्यासाठी मदत करते 
  • रक्तदाब आणि मधुमेहसारख्या समस्या असतील तर बॉडी डिटॉक्स वॉटरचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते 

रिकाम्या पोटी प्या डिटॉक्स वॉटर

तुम्हाला जर बॉडी डिटॉक्स वॉटरचा सर्वाधिक फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही दिवसाची सुरूवात रिकाम्या पोटी बॉडी डिटॉक्स वॉटर पिऊन नक्की करा. वास्तविक जेव्हा पोट रिकामे असते, तेव्हा पोट क्लिन असते आणि तुम्ही रात्रीचे जेवण जेऊन आठ तासापेक्षा अधिक काळ लोटलेला असतो. त्यामुळे बॉडी डिटॉक्स वॉटर तुम्ही जेव्हा पिता तेव्हा दिवसाची सुरूवात चांगली होते. डिटॉक्स वॉटरमध्ये पोटॅशियम आणि विटामिन सी अधिक प्रमाणात असते. हे असे दोन पोषक तत्व आहेत, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. 

जेवणासह डिटॉक्स वॉटर घेऊ नका 

काही जण दिवसभर बॉडी डिटॉक्स वॉटरचा उपयोग करून घेतात. तुमच्या डॉक्टरांनी तसा सल्ला दिला असेल तर नक्कीच काही हरकत नाही. मात्र याचा वापर करताना तुम्ही याकडे विशेष लक्ष द्यायला हवे की, जेवणासह तुम्ही याचे सेवन अजिबात करू नये. प्रयत्न करा की, तुमचे जेवण आणि बॉडी डिटॉक्स वॉटर सेवनाच्या वेळेत किमान अर्ध्या तासाचे अंतर असावे. कारण तुम्ही जेवणातून अनेक पोषक तत्व शरीराला देत असता, पण जर तुम्ही जेवणासह डिटॉक्स वॉटर घेतले तर पोषक तत्व पुरेसे मिळू शकत नाहीत. 

ADVERTISEMENT

कायम ताजे बॉडी डिटॉक्स वॉटरच प्यावे 

Detox Water

जेव्हा तुम्ही डिटॉक्स वॉटर पिता, तेव्हा ते नेहमी ताजेच असावे याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. बरेचदा काही लोक डिटॉक्स वॉटर एका जारमध्ये बनवून ठेवतात आणि त्यामध्ये काही घटक मिक्स करून त्याचे दोन ते तीन दिवस सेवन करत राहतात. पण असं अजिबात करू नका. यामुळे तुमच्या शरीराला लाभ मिळणार नाही. याशिवाय डिटॉक्स वॉटरचे तापमान योग्य आहे की नाही याचीही तुम्ही शहानिशा करून घ्या. डिटॉक्स वॉटरसाठी गरम अथवा कोमट पाण्याचा वापर करणे अधिक लाभदायक मानले जाते. पण तुम्ही बाहेरील वातावरण कसे आहे याप्रमाणे याचा वापर करून घ्यावा. पण थंड पाण्याचा वापर करणे टाळाच. तसंच डिटॉक्स वॉटरचा वापर करताना नियमित पाणी अर्थात साध्या पाण्याचा वापर करणे थांबवू नका. तुमच्या शरीराला साधे पाणीही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे याचाही तुम्ही योग्य वापर करायलाच हवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

04 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT