व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस. या दिवसाची प्रेमवीर अगदी मनापासून वाट पाहत असतात. अनेकांचे तर या खास दिवसांचे प्लॅन्स काही दिवस आधीपासूनच ठरत असतात. व्हॅलेंटाईन्स डेला प्रिय व्यक्तीला प्रपोज करण्याची मजाच काही वेगळी आहे. एकतर या दिवशी जगभर लोक प्रेमदिन साजरा करत असतात. त्यामुळे सर्व वातावरणच प्रेममय झालेलं असतं. अशा वातावरणात तुम्ही जिच्यावर प्रेम करता तिच्याकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता अधिक असते. जर तुम्हीही या खास दिवशी तिला प्रपोज करणार असाल तर ही माहिती तुमच्या नक्कीच फायद्याची ठरेल. मात्र प्रपोज करताना तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी ‘प्रपोज रिंग’ही तितकीच परफेक्ट असायला हवी. याआधी तुम्ही तिच्यासाठी असं गिफ्ट खरेदी न केल्यामुळे तुम्हाला थोडंसं दडपण येऊ शकतं. यासाठीच प्रपोज रिंग कशी खरेदी करायची हे नक्की जाणून घ्या. प्रपोज करण्यासाठी हिऱ्याची रिंग खरेदी करणं अगदी परफेक्ट ठरेल. मात्र हिऱ्याची अंगठी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर ती तुम्हाला हो म्हणाली तर ही अंगठी तिच्या बोटात आयुष्यभर असेल. शिवाय आयुष्यात जेव्हा जेव्हा तुमच्या प्रेमाचा विषय निघेल तेव्हा ही अंगठी त्या प्रेमाचं प्रतिक ठरेल.
प्रपोज करण्यासाठी हिऱ्याची अंगठी खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी
स्टोन –
हिऱ्याची अंगठी खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे अंगठीतील हिऱ्याची निवड. आजकाल सोन्यापेक्षा डायमंड आणि प्लॅटिनम या कॉंम्बिनेशनचा ट्रेंड आहे. मात्र तुम्ही तिच्यासाठी अंगठी खरेदी करताना तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार नक्की करा. कारण तिला जशी अंगठी आवडते तशी खरेदी केली तर ती तुमच्या प्रेमाचा स्वीकार नक्कीच करेल.
Shutterstock
डायमंड कट –
एकदा तुम्ही अंगठीसाठी कोणता हिरा घेणार हे ठरलं की नंतर त्याचे कट किती असावेत हे ठरवा. कारण तुम्ही निवडलेल्या हिऱ्याला किती कट आहेत यावरून तुमच्या प्रपोज रिंगची डिझाईन ठरवावी लागेल. असं म्हणतात की, एखाद्या हिऱ्याला जितके कट अथवा पैलू असतात तितकीच त्याची किंमत जास्त ठरते. म्हणूनच तुमचं बजेट पाहून हे कट ठरवा. आजकाल पिअर कट, राऊंड कट, हार्ट कट, प्रिसेंस कट, एमराल्ड कट ट्रेंडमध्ये आहेत.
Shutterstock
कॅरेट –
प्रपोज रिंगमध्ये तुम्ही कोणता मौल्यवान धातू वापरणार आहे त्यानुसार तुमच्या अंगठीचे कॅरेट ठरतात. जर तुम्ही व्हाईड गोल्ड, रोज गोल्ड रिंग करणार असाल तर सोनं 22, 24 अथवा 18 अशा कॅरेटमध्ये तुम्हाला विकत घ्यावं लागेल.
Shutterstock
स्टाईल –
प्रपोज रिंग घेताना शक्य असल्यास लेटेस्ट डिझाईन आणि स्टाईल असलेल्या रिंगची निवड करा. तुम्ही जिला ही रिंग घालणार आहात तिच्या आवडीनुसार रिंग असेल तर तुम्हाला प्रेमात नक्कीच होकार मिळेल. क्लासिक लुक, पारंपरिक लुक आणि मॉर्डन लुक अशा अनेक स्टाईलमध्ये रिंग तुम्हाला मिळू शकतात. यासाठी तिच्याशी बोलताना थोडं तिच्या आवडीनिवडी विषयी जाणून घ्या. ज्यामुळे तशा प्रकारची रिंग घेणं तुम्हाला सोपं जाईल.
Shutterstock
सेटिंग –
सेटिंगचा अर्थ तुम्ही अंगठीत मौल्यवान हिऱ्याला कसं बसवणार आहात. जर तुम्ही सोलटेअर हिरा विकत घेतला असेल तर तो अंगठीच्या मध्यावर आणि सर्वात उंचावर बसवला जाईल. हॉलो सॉलिटेअर सेटिंगमध्ये मात्र तुम्हाला छोटे छोटे हिरे मध्यभागी मोठा हिरा अशी सेटिंग करावी लागेल. शोल्डर सॉलिटेअर हिरा क्लासिक सॉलिटेअरपेक्षा जास्त उठून दिसतो.
Shutterstock
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
अधिक वाचा –
तुम्हालाही करायचं आहे का त्याला ‘प्रपोज’ (How To Propose A Boy In Marathi)
व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या प्रेयसीला द्या ‘हे’ स्पेशल गिफ्ट (Valentines Day Gift Ideas In Marathi)
20 हटके पद्धतींनी सेलिब्रेट करा व्हॅलेंटाईन डे (Valentines Day In Mumbai 2020)