home / बॉलीवूड
koffee with karan season 7

कॉफी विथ करणचा सिझन सातवा लवकरच येणार ऑन एअर 

जेव्हापासून प्रेक्षकांना हे समजले आहे की कॉफी विथ करण त्याच्या सातव्या सीझनसह परत येत आहे, तेव्हापासून लोक या शोशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या बातम्यांवर बारीक नजर ठेवून आहेत. कॉफी विथ करणची वाट पाहणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ही अशी चांगली बातमी आहे जी तुमचे मन आनंदित करेल.कॉफी विथ करण आता लवकरच ऑन एअर जाणार आहे. करण जोहरचा हा लोकप्रिय चॅट शो डिस्ने + हॉटस्टारवर 7 जुलैपासून प्रसारित होणार आहे. यावेळी हा सिझन टीव्हीवर नाही तर हल्ली लोकप्रियता वाढलेल्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. म्हणजेच आता फक्त काहीच दिवसांची प्रतीक्षा आणि मग तुम्ही कॉफी विथ करणमधील सेलेब्सच्या गप्पांचा आनंद घेऊ शकाल. 

करणने यापूर्वीही घेतली आहे प्रेक्षकांची फिरकी 

करण जोहरने यापूर्वीही कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनच्या संदर्भात प्रेक्षकांची फिरकी घेतली आहे. त्यामुळेच हा शो प्रत्यक्षात 7 जुलैपासून खरंच सुरू होईल का यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण यावेळी टेन्शन घेऊ नका, कारण यावेळी करणने शोचा प्रोमो शेअर केला आहे. त्यामुळे आता काहीही झाले तरी कॉफी विथ करण स्ट्रीम होणारच आहे. करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’ चा सीझन 7 हा 7 जुलैपासून चाहत्यांना थक्क करण्यासाठी सज्ज आहे. या शोच्या माध्यमातून सिनेविश्वातील कलाकार एकाच छताखाली येतात, ज्यांच्याबरोबर करण जोहर फनी गॉसिप करताना दिसतो आणि आता शोच्या सातव्या सीझनमध्येही असेच काहीसे पाहायला मिळणार आहे. करण जोहरने या शोचा एक मजेदार प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच या पोस्टमध्ये त्याने शोची ऑन एअर डेटही सांगितली आहे.

प्रोमोचा मजेशीर व्हिडीओ पाहिलात का 

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला प्रोमोचा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे. जुन्या सिझनमध्ये दिसलेल्या सेलिब्रिटींच्या व्हिडिओ क्लिपवरून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान, बिपाशा बसू, सैफ अली खान, करीना कपूर, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग असे सर्व स्टार्स दिसत आहेत आणि यानंतर आणखी काही सेलेब्सचे व्हिडिओ आहेत, जे ‘करण… करण… करण’ म्हणताना दिसत आहेत. यानंतर करण जोहरचा प्रवेश होतो आणि तो म्हणतो की ‘कॉफी विथ करण सीझन 7’ पुन्हा येत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये करण जोहरने शोची तारीख ऑन एअर दिली आहे. तो म्हणाला, ‘यावेळी कोण येणार आहे याचा अंदाज घ्या. आणि यावेळी पाइपलाइनमध्ये मोठे मोठे तारे आहेत. हॉटस्टारवर 7 जुलैपासून कॉफी विथ करण सीझन 7 सुरू होत आहे.’ 

 करण जोहरच्या या व्हिडिओला अल्पावधीतच 2 लाख 60 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर यूजर्स कमेंटमध्ये हे देखील सांगत आहेत की त्यांना या शोमध्ये कोणत्या स्टारला पाहायचे आहे. यावेळी करण जोहरनेही आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला शो परत आणण्याची घोषणा केली होती. याआधी, त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून, त्याने माहिती दिली होती की हा शो टीव्हीवर परत येणार नाही. या घोषणेनंतर सर्व चाहत्यांची निराशा झाली होती, मात्र त्यानंतर लगेचच करणने आणखी एक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे सर्वांना आनंद झाला. करणने सांगितले की हा शो आता टीव्हीवर नव्हे तर डिस्ने प्लस हॉटस्टारवर परत येईल.

चाहत्यांची मागणी पूर्ण होणार का

कॉफी विथ करणचा प्रोमो समोर आल्यानंतर शोबद्दल चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित झाली आहे. करण जोहरने व्हिडिओ शेअर करताच प्रेक्षकांनी त्याच्यावर कमेंट्सचा वर्षाव सुरू केला. कोणाला कियारा अडवाणी आणि शाहिद कपूरची जोडी शोमध्ये पाहायची आहे तर कोणी म्हणतंय की शोमध्ये रणबीर कपूरची गरज आहे. आता प्रत्येकजण आपल्या आवडत्या स्टार्सबद्दल सांगू लागला आहे. बघूया कोणाची इच्छा करण जोहर पूर्ण करतो. 

तुम्हीही सांगा की तुम्हाला ‘कॉफी विथ करण’मध्ये कोणाला बघायचे आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

20 Jun 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text