मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर आई झालीय. तिने तीन डिसेंबरला जुळ्या मुलींना जन्म दिलाय. मुंबईतील सुर्या हॉस्पिटलमध्ये तिची प्रसूती झाली आहे. सहाजिकच या गोड बातमीमुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. सोशल मिडीयावरुन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावच होत आहे.
2017 साली क्रांती विवाहबंधनात अडकली
अभिनेत्री क्रांती रेडकर 29 मार्च 2017 मध्ये विवाहबंधनात अडकली. तिने आय.पी.एस. अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर लगेच तिच्या जीवनात दोन पऱ्याचं आगमन झाल्यानं घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
क्रांती मराठी इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री,दिग्दर्शिका आणि निर्माती
काही दिवसांपूर्वी क्रांती ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पण त्यानंतर ती कोणत्याच सिनेमात दिसली नाही. कदाचित या गोड बातमीसाठीच तिने सिनेमांमध्ये काम करणं टाळलं असेल.
‘जत्रा’ या सिनेमातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्यामुळे क्रांती रेडकर हे नाव लोकप्रिय झालं. क्रांतीनं आतापर्यंत ‘ऑन ड्युटी 24 तास’,’माझा नवरा तुझी बायको’ ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ ‘मर्डर मिस्ट्री’ ‘शिक्षणाच्या आयचा घो’ अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘गंगाजल’ सारख्या हिंदी सिनेमांमध्ये देखील क्रांतीने एक छोटी भूमिका निभावली आहे. क्रांतीने अभिनयासोबत दिग्दर्शिका व निर्माती म्हणून देखील काम केलं आहे. क्रांतीने 2015 मध्ये ‘काकण’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.
क्रांतीने अगदी साध्या पद्धतीने केलं होतं लग्न
क्रांतीचे पती समीर वानखेडे हे एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहेत. पती देशसेवेत असल्याने क्रांतीने 2017 साली अगदी साध्या पद्धतीने कोणताही गाजावाजा न करता लग्न केलं होतं. आता त्यांच्या कुटूंबात दोन चिमुकल्यांचं आगमन झाल्याने क्रांती अधिकच खूष झाली आहे.
फोटो सौजन्य- इन्टाग्राम