ADVERTISEMENT
home / मनोरंजन
kranti-redkar's-rainbow-shoot-starts-in-london-in-marathi

क्रांती रेडकरच्या ‘रेनबो’च्या चित्रीकरणाचा लंडनमध्ये श्रीगणेशा

काही महिन्यांपूर्वी  ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘हाय आयक्यू’ यांच्या सहयोगाने ‘मँगोरेंज प्रॉडक्शन’ निर्मित ‘रेनबो’ (Rainbow) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नुकतेच या चित्रपटाचे लंडनमध्ये (London) चित्रीकरण सुरु झाले असून लवकरच हा चित्रपट रंगांची उधळण घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात प्रसाद ओक (Prasad Oak), शरद केळकर (Sharad Kulkarni), सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), उर्मिला कोठारे (Urmila Kothare) आणि ऋषी सक्सेना (Rishi Saxena) यांच्या प्रमुख भूमिका आहते. ‘रेनबो’ म्हणजे अनेक रंगांचे प्रतीक आणि त्यामुळेच या चित्रपटात देखील आपल्याला विविध रंग पाहायला मिळणार आहेत. आजच्या काळात नात्यांमध्ये येणाऱ्या विविध रंगांचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांचा मिळून हा  ‘रेनबो’ तयार होत असल्याने हे सर्व रंग एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. 

सप्तरंगी प्रवास प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्दर्शिका क्रांती रेडकर म्हणाली की, ” ‘रेनबो’ हे नावच कलरफुल आहे. या नावातच सारे रंग भरलेले आहेत. नात्यातील हाच सप्तरंगी प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने अक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट मराठी’ चा भाग होण्याची संधी मला मिळाली. इतक्या दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली असून आता चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे.”  या चित्रपटाविषयी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) यांनी सांगितले की, “क्रांती रेडकर (Kranti Redkar) ही अतिशय उत्तम अभिनेत्री तर आहेच याशिवाय तिचे दिग्दर्शन देखील कमाल आहे. ‘रेनबो’ हा असा चित्रपट आहे, जो नात्यातील काही संवेदनशील गोष्टी समोर आणणार आहे. या चित्रपटाची कथा मनाला भावणारी आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.” 

तगडे कलाकार दिसणार

तर याबाबत क्रांतीने पुढे म्हटले की, “ मनोरंजनात्मक, संवेदनशील व समाजप्रबोधन करणारे विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आम्ही येत आहोत. ‘रेनबो’च्या निमित्ताने आपण या प्लॅनेट मराठी या प्लॅटफॉर्मचा एक भाग होणार आहोत या गोष्टीचा फार आनंद होतोय. माझ्यावर विश्वास ठेऊन मला संधी दिल्याबद्दल ‘प्लॅनेट मराठी’ व अक्षय बर्दापूरकर यांचे आभार. ‘काकण’ या सिनेमानंतर प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा फार उंचावलेल्या आहेत त्यामुळे एक उत्तम गोष्ट असणारा सिनेमा मला बनवायचा होता . सर्वात आधी मी या चित्रपटाची गोष्ट लिहिली आणि नंतर याला साजेसे कलाकार मला मिळाले. हे सगळेच कलाकार माझे चांगले मित्र असून ते अतिशय उत्तम कलाकारदेखील आहेत. म्हणूनच मी त्यांच्यासोबत काम करायला फार उत्सुक आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल अशी मला खात्री आहे.” दरम्यान गेले काही महिने या चित्रपटाची तयारी चालू होती आणि क्रांती अनेकदा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याचे रिल्सदेखील शेअर करत होती. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाविषयी उत्सुकता दिसून येत आहे. त्याशिवाय या चित्रपटामध्ये मराठीतील अनेक तगडे कलाकारही दिसणार आहेत. म्हणून नक्की या चित्रपटाची कथा काय असणार याविषयीही सगळ्यांमध्ये आता उत्सुकता दिसू लागली आहे. तर लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
21 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT