ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
नखरे नाही तर ‘या’मुळे कृतिनं सोडला अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’ सिनेमा

नखरे नाही तर ‘या’मुळे कृतिनं सोडला अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’ सिनेमा

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांचा बहुचर्चित-बहुप्रतीक्षित सिनेमा ‘चेहरे’मधून अभिनेत्री कृति खरबंदा हिला सिनेमातून काढण्यात आलं. या सिनेमासाठी तिनं केवळ दोन दिवसच शुटिंग केलं होतं, पण काही कारणास्तव तिला सिनेमातून एक्झिट घ्यावी लागली. नेमक्या कोणत्या कारणामुळे कृतिच्या हातातून थेट सिनेमाच हिसकावण्यात आला? यावर बी-टाऊनमध्ये सध्या  जोरदार चर्चा सुरू आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी कृतिला मिळाली होती. पण कृतिनं एखाद्या मोठ्या स्टारप्रमाणे नखरे दाखवण्यास सुरुवात केल्यानं ‘चेहरे’ सिनेमा गमावण्याची वेळ तिच्यावर आल्याचं म्हटलं जात होतं. आता या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली आहे.

या कारणामुळे कृति सोडला ‘चेहरे’ सिनेमा?

‘अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी’ स्टारर असणाऱ्या या  सिनेमासाठी कृतिला सर्वात पहिलं साइन करण्यात आलं होतं. सिनेमाचं चित्रिकरणदेखील सुरू करण्यात आलं होतं. पण स्टारप्रमाणे कृतिनं नखरे दाखवले आणि याच नखऱ्यांना कंटाळून तिला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. पण या वादाची आता धक्कादायक बाजूच समोर आली आहे. 

(वाचा : ‘Good Newwz’च्या टायटलमध्ये का वापरलं चुकीचं स्पेलिंग, करण जोहर म्हणाला…)

इंटिमेट सीनबाबत कृतिला दिली नव्हती माहिती

नखऱ्यामुळे कृतिला चेहरे सिनेमा सोडावा लागला नाही. तर एका मोठ्या इंटिमेट सीनमध्ये तिला लिपलॉक करायचं होतं, याच कारणामुळे तिनं सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये कृतिला एका अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन द्यायचा होता आणि दुसरीकडे इमरान हाश्मी दुसऱ्या रूममधून तिला पाहत असतो,असा सीन होता. एकतर कृतिला हा सीन शूट करण्यात अडचण होती किंवा हा एक लांबलचक इंटिमेट सीन असल्याचं तिला माहिती नव्हतं किंवा हा सीन तितका आवश्यक नाही,असं कृतिला वाटलं. कृतिनं सिनेमा सोडण्यामागील मुख्य कारण हाच लांबलचक इंटिमेट सीन असल्याचं म्हटलं जात आहे

ADVERTISEMENT

(वाचा : आयुष्मान खुरानाच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चा फर्स्ट लूक रिलीज)
यावर निर्मात्यांसोबत काही वेळ चर्चा वादविवाद झाल्यानं अखेर कृतिनं सिनेमाच सोडण्याचा निर्णय घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कृतिकडून इंटिमेट सीन शूट करून घ्यायचा होता तर तिला याबाबतची सर्व माहिती देणं गरजेचं होतं. हा हलगर्जीपणा दाखवल्याची जबाबदारी दिग्दर्शक रूमी जाफरीवर जात आहे.   
दुसरीकडे, कृति खरबंदाकडून या वृत्तावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. यादरम्यान,  सिनेमाचे निर्माते आनंद पंडित यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परस्पर संमतीनं कृतिनं सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला. भावी वाटचालीसाठी तिला शुभेच्छा, असं  ट्विट पंडित यांनी केलं आहे. 

(वाचा : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर साकारणार ‘ही’ मोठी ऐतिहासिक भूमिका)

कृतिऐवजी सिनेमात दिसणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री?

कृति खरवंदानं सिनेमा सोडल्यानंतर आता निर्माते नवीन चेहऱ्याच्या शोधात आहेत. निर्माते आनंद पंडित यांनी अंकिता लोखंडेची भेट घेऊन तिच्यासोबत भूमिकेसंदर्भात चर्चा केली. अंकितानं संबंधित भूमिकेसाठी होकार दिल्याची माहिती आहे. पण सिनेमा साइन केलेला नाही. अंकितानं कंगणा राणौतचा सिनेमा ‘मणिकर्णिका’मधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. आगामी ‘बागी 3’ सिनेमातही ती  झळकणार आहे. यामध्ये ती बॉलिवूडचा ‘लई भारी’ अभिनेता रितेश देशमुखच्या नायिकेची भूमिका पार पाडणार आहे. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT
20 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT