ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
क्रिती सनॉनच्या बहिणीचे बॉलिवूड पदार्पण, अक्षय कुमारसोबत केले होते काम

क्रिती सनॉनच्या बहिणीचे बॉलिवूड पदार्पण, अक्षय कुमारसोबत केले होते काम

बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचे वारे वाहत असताना आता सेलिब्रिटींच्या बहिणीसुद्धा आपले नशीब आजमावण्यासाठी येऊ लागल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात अक्षय कुमारचा एक म्युझिक अल्बम आला होता. या अल्बममध्ये असलेली अभिनेत्री ही कोणीही आऊटसायडर नसून अभिनेत्री क्रिती सनॉनची सख्खी बहीण नुपूर सनॉन होती. आता जर तो चेहरा तुम्हाला आठवला असेल तर हाच चेहरा येत्या काही काळात तुम्हाला चित्रपटात देखील दिसणार आहे. कारण मिळालेल्या माहितीनुसार नुपूर सनॉन ही बॉलिवूड पदार्पणासाठी तयार झाली असून तिला आता अनेक ऑफर्स येऊ लागल्या आहेत. पहिलाच अल्बम खिलाडी अक्षय कुमारसोबत केल्यानंतर आता चित्रपटात ती कोणासोबत झळकणार अशी उत्सुकता सगळ्यांना आहे.

प्रेगनन्सीमध्ये अनुष्का करतेय शिर्षासन, विराटची घेत आहे मदत

जॅकी भगनानीच्या चित्रपटात काम

नुपूरच्या रोमँटीक म्युझिक व्हिडिओमुळे तिचे काम घराघरात जाऊन पोहोचले. ‘फिल्हाल’ नावाचं तिचं गाणं या काळात खूपच गाजलं होतं. अल्बममधील अक्षयसोबतचा तिचा आत्मविश्वास आणि स्क्रिनवरील वावरणे पाहिल्यानंतर निर्माता जॅकी भगनानी यांना देखील तिने भारावून टाकले.  तिला आपल्या चित्रपटातून लाँच करण्याचा निर्णय त्यांनी त्याचवेळी घेऊन टाकला. त्यामुळे आता नुपूरच्या लाँचसाठी एका चांगल्या चित्रपटाची प्रतिक्षा आहे. मध्यंतरीच्या काळात टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट ‘गणपत’साठी तिला हिरोईन म्हणून साईन करण्यात आल्याची चर्चा होती. कारण हा चित्रपट जॅकी भगनानी निर्मित आहे. पण या अफवांवरुन लवकरच पडदा उठवण्यात आला. नुपूरसाठी एक खास चित्रपट करणार असल्याची इच्छा जॅकी भगनानी यांनी बोलून दाखवली आहे. लवकरच तिच्यासाठी बनत असलेल्या चित्रपटाची घोषणा केली जाणार आहे. 

म्युझिक व्हिडिओमधून आली प्रकाशझोतात

नुपूर सनॉन इतरवेळी तिच्या बहिणीसोबत तिचे फोटो पोस्ट करत असते. पण फिलहाल या व्हिडिओ अल्बमनंतर तिची वेगळी ओळख तयार झाली आहे. या अल्बममधील तिच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले आहे. या अल्बमनंतर तिचा असा एक फॅनफॉलोवर्सचा ग्रुप तयार झाला आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावरही हिट आहे. आता पुन्हा एकदा चित्रपटातून पदार्पण करणार म्हटल्यावर तिचा चाहता वर्ग वाढेल यात काहीही शंका नाही. दरम्यान,  क्रिती सनॉन हिने तिच्या करिअरची सुरुवात तेलुगु चित्रपटातून केली आहे.  त्यानंतर तिचा बॉलिवूड डेब्यू हा ‘हिरोपंती’ या चित्रपटातून करण्यात आला. तिच्याही पहिल्या प्रोजेक्टची आणि अभिनयाची तारीफ करण्यात आली. तिला त्या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला.

ADVERTISEMENT

आदित्य नारायण आणि श्वेता अगरवाल लग्नबंधनात, फोटो व्हायरल

बॉलिवूड सिस्टर्सचे या पूर्वीही पदार्पण

बॉलिवूडमधील कपूर कुटुंबाचे एकमेकांशी फार आत खोलवर नाते जुळलेले आहे. जान्हवी कपूरच्या नात्यात येणारी  शनाया कपूर ही महीप आणि संजय कपूरची मुलगी असून वयाच्या अवघ्या 20 वर्षातच बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. या शिवाय अनेकांची नाव यामध्ये घेतली जात आहे. 

पण सध्या तरी क्रिती सनॉनच्या बहिणीची सगळीकडे चर्चा केली जात आहे आणि लवकरच ती चित्रपटाच्या माध्यमातून येणार आहे.

Casting couch: लग्नाचे आमिष देत अभिनेत्रीवर दोन वर्ष अन्याय, पोलिसात घेतली धाव

ADVERTISEMENT
01 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT