ADVERTISEMENT
home / मनोरंजन
krk

केआरके पुन्हा चर्चेत, आता या दिग्गज कलाकारांना केले टार्गेट

 कमाल आर खान म्हणजेच केआरके त्याच्या अभिनयासाठी कमी आणि त्याच्या विचित्र स्टेटमेंटसाठीच प्रसिद्ध आहे. तो कधी काय बरळेल याचा नेम नसतो. बॉलिवूड चित्रपटांबद्दल कायम बोलण्यात त्याचा हातखंडा आहे. कोणत्याही मोठ्या कलाकारांना टोमणे मारणे तो काही सो़डत नाही. वेगवेगळ्या अभिनेत्यांना ट्रोल करणे हे त्याचे काम आहे. आता त्याने एक वेगळाच मुद्दा काढून सेलिब्रिटींना ट्रोल करण्याचे ठरवले आहे. आता त्याने कलाकारांच्या शिक्षणावर वेगळाच अभ्यास केला आहे. त्याच्या माहितीनुसार अमिताभ आणि शाहरुख वगळता इतर कोणत्याही कलाकारांनी 10 वी पास केलेली नाही. आता त्याच्या या विधानांमुळे अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

केआरकेला केला अनेकांनी सवाल

केआरकेने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने असे म्हटले आहे की, बॉलिवूडमध्ये असे दोनच स्टार्स आहेत जे दहावी पास आहेत. त्यात अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांचा समावेश आहे. पण या व्यतिरिक्त या इंडस्ट्रीमध्ये अशी एकही सेलिब्रिटी नाही जी इतकी शिकलेली आहे.  केआरकेने अशी पोस्ट केल्यानंतर लगेचच अनेकांनी त्यावर उडी मारायला घेतली आहे. कारण अनेकांना शिक्षणाचा हा मुद्दा पटलेलाच नाही. शिवाय उर्वरित सगळे कलाकार हे त्यांच्याशी बरोबरी करायला बघतात. पण असे होणार नाही. असे त्याचे म्हणणे आहे. तेही अनेकांना पटले नाही असेच दिसत आहे. त्यामुळे केआरकेला अनेकांनी सवाल करत काही उच्चशिक्षित कलाकारांची यादीच दिली आहे. अनेक कलाकारांनी आपले शिक्षण पूर्ण करुन मगच हा अभिनयाचा मार्ग स्विकारला आहे.  त्यामुळे अनेकांनी त्याला चांगलेच झोडले आहे.

चर्चेत राहण्यासाठी कायपण

कमाल आर खानचे चित्रपट हे असेच कमाल असतात. त्याचे कोणतेही चित्रपट चालले नाहीत तरी देखील त्याला त्यामुळे प्रसिद्धी मात्र बरीच मिळाली आहे. आधीच स्वत:चे चित्रपट चालत नाही. पण दुसऱ्या चित्रपटांना नावं ठेवण्याचे तो काही केल्या सोडत नाही. त्यामुळे होते असे की, प्रत्येकवेळी तो काही ना काही चर्चा करत राहतो आणि त्याची चर्चा होत राहते. कोणतेही मोठे चित्रपट आले तर तो त्या चित्रपटाची समीक्षाही करतो.त्यामुळे त्याचे अनेकदा हसू झाले तरी देखील त्याला त्याचा काहीही परिणाम होत नाही. उलट त्याला यामुळे अधिक प्रसिद्धी मिळते असेच दिसते. 

आता त्याच्या या नव्या ट्विटमुळे कोणता वाद उद्धवतो ते पाहणे महतत्वाचे ठरणार आहे

ADVERTISEMENT
19 Jul 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT