कमाल आर खान हा भोजपुरी चित्रपटातील कलाकार. पण त्याची ओळख आता त्याने चित्रपट समीक्षक अशी करुन टाकली आहे. स्वयंघोषित बाबाप्रमाणे कमाल आर खान हा इंडस्ट्रीमधील स्वयंघोषित सुपरस्टार आणि एक समीक्षक आहे. ज्याच्या तिरसट विधानांमुळेच तो कायम चर्चेचा विषय असतो. ट्विटवरुन काहीतरी टिवटिव करणे आणि त्यातून सगळ्यांचे लक्ष वेधून घेणे केआरकेसाठी आता काही नवं राहिलेलं नाही. आता पुन्हा एकदा केआरके असं काहीतरी बरळला आहे की, सगळ्या प्रेक्षकांच्या संताप झाला आहे. रणबीर कपूर- आलियाच्या लग्नावर त्याने एक अशी अजब गजब भविष्यवाणी केली आहे की, त्याच्यावर लोकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
अभिजीत खांडकेकर मराठीतला रणवीर सिंह, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
काय केली भविष्यवाणी
Prediction 08- Ranbir Kapoor and Alia Bhatt will get married max till end of 2022. But Ranbir Kapoor will divorce her within 15 years after marriage!
— KRK (@kamaalrkhan) July 13, 2021
केआरकेने एक ट्विट केले आहे. या ट्विटमघ्ये त्याने लिहिले आहे की, रणबीर-आलिया हे पुढच्यावर्षी 2022 ला लग्न करतील. वर्ष संपायच्या आधी त्यांचे लग्न होईल. पण हे लग्न 15 वर्षांनी तुटेल. रणबीर आलियाला घटस्फोट देईल. अशा स्वरुपाचे हे ट्विट केआरकेने केले आहे. त्याने हे ट्विट केल्यानंतर आलिया- रणबीरचे चाहते त्यावर तुटून पडले आहेत. अनेकांनी त्याला या भविष्यवाणीसाठी ट्रोल केले आहे. खूप जणांनी त्याला खासगी प्रश्न विचारुन भांडावून सोडले आहे. त्याला त्याचे लग्न तुझ्या बायकोने न पाहिल्यामुळेच झाले असावे.असे सांगितले आहे. खूप जणांनी केआरकेच्या या भविष्यवाणीवर संताप व्यक्त करत त्याला शिव्याही दिल्या आहेत.
बाई, बुब्स आणि ब्रा वर झाली हेमांगी कवी व्यक्त, ‘लोक काय म्हणतील’चं ओझं किती वहायचं
अशीच करतो भविष्यवाणी
कमाल आर खान हा नेहमीच अशी काहीतरी विचित्र भविष्यवाणी करत असतो. त्याने आपल्या या भविष्यवाणीची सुरुवात ही त्याने करीना आणि सैफच्या मुलांसंदर्भात केली आहे. त्याने यात म्हटले की, त्यांची ही दोन्ही मुलं कधीच प्रसिद्ध होणार नाहीत. या भविष्यवाणीमुळे देखील लोकांचा संताप झाला होता. पण त्याने तरीदेखील ही सीरीज सुरु ठेवली आहे. त्याने कंगना रणौत, तब्बू यांच्या लग्नाबद्दल भविष्यवाणी करत ते लग्न करणार नाहीत असे देखील सांगितले आहे. याशिवाय त्याने असिम रियाझ आणि हिमांशी खुरानाच्या लग्नाबद्दलही भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे त्याची ही भविष्यवाणी पाहता त्याची प्रसिद्धी मिळवण्याची ही ट्रिकक आहे.
चित्रपटावर करतो समीक्षा
My review of film #HaseenDillruba! Watch and RT for others also https://t.co/XskcGtkg0k via @YouTube
— KRK (@kamaalrkhan) July 13, 2021
केआरके हा खूप वेळा चित्रपटांवर आपली मतं व्यक्त करताना दिसतो. अनेक हिंदी चित्रपटांवर तो त्याची मतं मांडत असतो. बॉलिवूड चित्रपट हे किती खराब असतात ते तो कायम त्याच्या या व्हिडिओमधून दाखवत असतो. त्यामुळे आधीच त्याच्यावर लोकं वैतागत असतात. कमाल आर खान हा स्वत: भोजपुरी चित्रपटात काम करत असतो. त्याचे चित्रपट हे देखील कोणत्याही ढोकताळ्यावर अवलंबून नसतात. त्याच्या या चित्रपटांना कोणताही अर्थ नसतो. तो काय करतो ते अनेकांना काहीच कळत नाही. त्यामुळे खूप जणं त्याच्याच चित्रपटावर टीका करत असतात. त्याचा कमाल आर खानवर कोणताही आणि काहीही परिणाम होत नाही. पण दुसऱ्यांना नाव ठेवण्यात कमाल आर खान हा पुढे असतो.
आता त्याच्या या नव्या भविषयवाणीमुळे काय परिणाम होतो ते पाहावे लागेल आणि आता त्याची पुढील भविष्यवाणी काय असेल त्यामुळे कोणता वाद होईल हे देखील पाहावे लागेल.
शाहिदमुळे बदललं करिअर आणि सैफमुळे बदललं आयुष्य, करिना कपूरचा खुलासा