कृष्णा अभिषेकने एक कॉमेडिअन म्हणून आजवर चांगलं नाव कमावलं आहे. मात्र त्याच्या करिअरपेक्षा तो जास्त चर्चेत असतो ते त्याच्या गोविंदासोबत असलेल्या नात्यामुळे आणि वादविवादांमुळे. बऱ्याचदा मामाभाच्याचा हा वाद सोशल मीडियावर रंगलेला आहे. दोघांनाही या वादाबाबत मीडियासमोर उघड चर्चा केलेली आहे. त्यामुळे या मामाभाच्यामध्ये असलेला दूरावा चाहत्यांना आधीच माहीत आहे. मात्र आता अनेक वर्षांनंतर कृष्णा अभिषेकला पुन्हा त्याच्या चीची मामाची म्हणजेच गोविंदाची आठवण येताना दिसत आहे. कृष्णाने गोविंदासोबत असलेल्या लहाणपणीच्या आठवणी आणि मनातील भावना जुन्या फोटोंसोबत शेअर केल्या आहेत.
काय आहेत कृष्णाच्या मामासोबत आठवणी
कृष्णा अभिषेकने नुकताच सोशस मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आणि त्याची बहीण आरती एकत्र डान्स करताना दिसत आहेत. कृष्णाने त्याची बहीण आरतीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबत हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये या भावंडांसोबत गोविंदा आणि त्याची दोन मुलं टीना आणि यशवर्धनदेखील दिसत आहेत. कृष्णाने फोटोसोबत शेअर केलं आहे की, आम्ही अशा प्रकारे चीची मामासोबत पार्टी करत होतो. मामाम आम्हाला लंच आणि डिनरसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जात असे. जिथे आम्ही खूप धमाल मस्ती करायचो. या फोटोच कोपऱ्यात माझी बहीण आरती आहे. जी एक क्यूट लबाड चोराप्रमाणे दिसत आहे. ग्रीन शर्टात मी दिसत आहे मी अजूनही बदललेलो नाही तसाच दिसतो. कृष्णाच्या या जुन्या फोटोवर चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस पडत आहे. कृष्णाची पत्नी कश्मीरा शाहने या फोटोला लाईक आणि हाहाहा असे स्माईल करणाऱ्या इमोजीची कंमेट दिलेली आहे. एका चाहत्याने या फोटोवर कंमेट केली आहे की, यालाच कुटुंब असं म्हणतात. प्लीज तुम्ही तुमच्या मामाच्या असंच सोबत राहा. तुम्ही खूप भाग्यवान आहात की इतका चांगला माणूस तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप प्रेम आणि शुभेच्छा
गोविंदा आणि कृष्णाचा वाद
गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेकचा वाद लोकांना चांगलाच माहीत आहे. या वादामुळे जेव्हा गोविंदा कपिल शर्माच्या शोमध्ये आला होता तेव्हा कृष्णाने त्याच्यासमोर परफॉर्मन्स करण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांच्यातील वाद सोशल मीडियावर चांगलाच चिघळला होता. कृष्णाच्या मते गोविंदाची पत्नी सुनिता काही वर्षांपूर्वी शोमध्ये आली होती तेव्हा कृष्णाने त्यांच्यासमोर परफॉर्मन्स करू नये अशी मागणी केली होती. त्या रागामुळेच आता कृष्णा ज्या शोमध्ये गोविंदा असेल त्या शोमध्ये काम करण्यास तयार होत नाही. मात्र गोविंदाच्या मते कृष्णा एक चांगला माणूस आहे मात्र तो जे काही करतो त्यामागे कोणाचातरी हात असतो असं मीडियासमोर खुलं केलं होतं. ज्यामुळे या दोघांमधील नातं बिघडलं आणि मीडियासमोर त्या दोघांची इमेजही खराब झाली होती. मात्र आता कृष्णाने शेअर केलेल्या फोटोमधून पुन्हा मामाभाच्याचं नातं पूर्वीसारखं झाल्याचं वाटत आहे. कारण काहीही असो त्यांनी एकत्र यावं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करावं हीच त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
वीस वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणार गोविंदा आणि नीलमची जोडी
अभिनेत्री अश्विनी भावे यांचे व्हिडिओ चाहत्यांना सुखावणारे
रणबीर आणि आलियाच्या ‘ब्रम्हास्त्र’चा आता निर्माता झाला अयान मुखर्जी