ADVERTISEMENT
home / मनोरंजन
कुलदीप सिंहने ‘या’ कारणासाठी सोडली विघ्नहर्ता गणेश मालिका

कुलदीप सिंहने ‘या’ कारणासाठी सोडली विघ्नहर्ता गणेश मालिका

अभिनेता कुलदीप सिंह विघ्नहर्ता गणेश या पौराणिक मालिकेमध्ये भगवान विष्णूची भूमिका साकारत होता. मात्र अचानक त्याने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव जवळ आला असताना त्याने ही मालिका सोडणं हे चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. मात्र कुलदीपने बाप्पाची माफी मागत या कारणासाठी या मालिकेतून काढता पाय घेतला आहे. ही मालिका सोडण्यामागे दडले आहे हे कारण…

कुलदीपने चाहत्यांचीही मागितली माफी

कुलदीप सिंहने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्याने शेअर केलं आहे की, “सर्वात आधी मी माझ्या सर्व प्रेक्षकांची माफी मागतो, कारण मी अचानक हा शो सोडत आहे, जीवन म्हणजे सतत पुढे चालत राहणं, मला माहीत आहे की माझे चाहते मला या मालिकेत नक्कीच मिस करतील, माझ्यासाठीदेखील ही मालिका सोडणं नक्कीच सोपं नव्हतं, कारण तुम्ही मला जवळजवळ तीन वर्ष या मालिकेतून भरपूर प्रेम दिलं आहे, मी आशा करतो की नव्या विष्णूवरही तुम्ही तितकंच प्रेम कराल, कारण कुणालाही कधीच पटकन जज करू नये”

या कारणासाठी कुलदीपने सोडली मालिका

कुलदीप सिंह सध्या अनेक मालिकांमध्ये एकाच वेळी काम करत आहे. विक्रम और बेताल, कैसी ये यारियां, सीआयडी अशा अनेक मालिकांचा तो हिस्सा राहिलेला आहे. मात्र तो लवकरच बिग बॉस 14 मध्ये दिसण्याची बातमी समोर आलेली आहे. कुलदीपने तो या रिअॅलिटी शोचा हिस्सा असेल याबाबत कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शोमध्ये भाग घेण्यासाठीच त्याने विघ्नहर्ता गणेशमधून काढता पाय घेतला आहे.

ADVERTISEMENT

Instagram

कुलदीपने बिग बॉसमध्ये जाण्यासही दिला आहे नकार

कुलदीपने मात्र बिग बॉसमध्ये जाण्यास तो तयार नाही अशी माहिती पुढे केली आहे. या शोमध्ये सहभागी न होण्याचे कारण त्याने या घरात निर्माण होणारा ताणतणाव असे सांगितले आहे. मात्र बिग बॉस हा शो एक चांगला रिअॅलिटी शो आहे असंही त्याचं म्हणणं आहे. त्याने आधी या शोमध्ये जाण्यासाठी स्वतःहून अप्रोच केलं होतं. मात्र आता या घरातील ताणतणावाला सामोरं जाणं त्याला शक्य नाही असं त्याने मीडियाला सांगितलं आहे. त्याच्या मते तो असा माणूस नाही जो उगाचच भांडेल आणि रोज लोकांशी वाद घालत बसेल. त्यामुळे या शोमध्ये जाण्यास तो सध्या तरी तयार नाही. लवकरच सुरू होणाऱ्या बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी वास्तविक अनेक कलाकार उत्सुक असतात. कारण या शोमधून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळत असते. त्यामुळे हा कुलदीपचा एक प्रसिद्धी मिळवण्याचा स्टंटही असू शकतो. सध्या तरी त्याने विघ्नहर्ता गणेश ही मालिका सोडण्यामागचे नेमके कारण सांगितले नाही. पण जर तो काही दिवसांमध्ये सुरू झालेल्या बिग बॉसमध्ये सहभागी झाला तर ही मालिका सोडण्यामागचे नेमके कारण आपोआपच जगासमोर येईल. ही मालिका सोडण्यासाठी त्याने त्याचे चाहते आणि गणपतीत बाप्पाची जाहीर माफी मागितली आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

जेव्हा दिलीपकुमार यांच्या कौतुकाने भावुक झाले होते धर्मेंद्र

आरोग्य कर्मचारी म्हणजे देवदूत, बिग बीने व्यक्त केली कृतज्ञता

सध्याच्या परिस्थितीत ज्येष्ठ कलाकारांनाही काम करण्याची संधी मिळावी,पण- धर्मेंद्र

03 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT