टीव्ही आणि मनोरंजनाच्या जगात कोण कधी कोणाशी कसं वागेल काहीच अंदाज करता येत नाही. आता ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री तृप्ती शंखधरने आपल्या वडिलांवरच आरोप केला आहे. मूळची बरेली येथील असणाऱ्या तृप्तीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच याची चर्चा चालू झाली आहे. या व्हिडिओमध्ये तृप्तीने आपल्या वडिलांवर धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तसंच आपण आता आईला घेऊन सोडून निघालो असल्याचंही तिने यामध्ये म्हटलं आहे. जीवावर बेतलं असल्यामुळेच आपण हा निर्णय घेत असल्याचंही तिने म्हटलं आहे.
‘नागिन’फेम अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चा, व्हिडिओ व्हायरल
लग्न न केल्यास, बेदखल करण्याची धमकी
तृप्ती शंखधर ही केवळ 19 वर्षांची असून एकता कपूरच्या ‘कुमकुम भाग्य’मध्ये तिने भूमिका साकारली आहे. तृप्तीने आपल्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ पोस्ट केला असून आपले वडील राम रतरन शंखधर हे आपल्याला त्यांच्या ओळखीच्या मुलाशी जबरदस्ती लग्न करण्यास सांगत आहेत आणि तिच्या नकारानंतर तिला बेदखल करण्याची धमकीही त्यांनी दिली आहे असंही तिने म्हटलं आहे. तिने आपल्या आई आणि भावासह घर सोडलं असून आपले वडील आपल्याविरोधात कोणतीही तक्रार करू शकतात असंही तिने म्हटलं आहे. इतकंच नाही तर तिच्या भावानेही तिला पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय आपले वडील काहीही करू शकतात आणि आम्ही आमच्या मर्जीने घरातून निघालो आहोत असंही तिने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. तिचे वडील उद्योगपती असून त्यांची यावर कोणतीही प्रतिक्रिया अजून आलेली नाही. दरम्यान तृप्तीने याविषयी बरेलीच्या पोलीस स्टेशनमध्येही कोणतीही तक्रार नोंदविल्याचे सांगण्यात आलेले नाही. तर सोशल मीडियावरूनच याची बातमी समजल्याचे पोलिसांनीही सांगितले आहे. तसंच यावर तपास चालू असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशीरा तृप्तीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. तृप्तीने मालिकांमध्ये आणि काही दाक्षिणात्य चित्रपटातही काम केले आहे.
यशराज फिल्म्सचे सुवर्ण महोत्सवी वर्ष, नवीन लोगो होणार प्रदर्शित
वडिलांना घाबरून घरातून स्वतःहून पळाल्याची कबुली
घरात राहिल्यास, वडील जबरदस्तीने लग्न लावतील या भीतीने घरातून स्वतः पळून आल्याची कबुलीही तृप्तीने या व्हिडिओमध्ये दिली आहे. आपले वडील हे कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नसून आपल्याला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं आहे असंही तिने म्हटलं आहे. त्याशिवाय तिच्याबरोबर या व्हिडिओमध्ये तिचा भाऊ आणि तिची आई दोघेही असून भावानेही तिला पाठिंबा देत वडिलांबद्दल सांगितले आहे. त्यामुळे आता बरेली पोलीस तृप्तीच्या वडिलांवर काय कारवाई करणार आणि तृप्ती पुढे काय पाऊल उचलणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तृप्ती वयाने लहान असूनही तिने हे पाऊल उचलंलं आहे. त्यामुळे आता तृप्तीला झालेल्या त्रासामुळे तिच्या वडिलांना कोणती शिक्षा होणार का नाही अथवा तृप्ती पुढे काय करणार याबद्दलही आता चर्चा सुरू झाली आहे. सध्या सोशल मीडिया हे कोणत्याही गोष्टीसाठी उत्तम साधन झाल्यामुळे कोणत्याही घटनेबाबत सर्वात पहिले सोशल मीडियावर पोस्ट केल्यास, तिथून मार्ग निघू शकतो असा बऱ्याच जणांना समज आहे आणि तृप्तीनेदेखील हाच मार्ग अवलंबला आहे. पोलिसांकडून तिने व्हिडिओद्वारे मदत मागितली आहे.
करीना कपूरमुळे चर्चेत असलेल्या सैफ अली खानची येणार ऑटोबायोग्राफी
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा