आपल्या शरीराचा प्रत्येक भाग आपल्याला प्रिय असतो. पण आपल्या शरीराच्या बाबतीत अनेक महिला खूपच विचार करताना दिसतात. विशेषतः आपल्या शरीराच्या आकारावरून. अनेक महिलांना बारीक असल्यास, आपल्यावर एखादा कपडा चांगला दिसणार नाही असं वाटतं अथवा एखादा कपडा घातल्यावर आपण अधिक जाडे दिसू अथवा आपली उंची कमी असेल तर ती अधिक कमी दिसेल आणि मग चिडवलं जाईल असे एक ना अनेक विचार असतात. कमी उंची असली की कपड्यांच्या उंचीचा नेहमीच त्रास होतो. कपड्यांची निवड करणं हे तसं तर नक्कीच कठीण काम आहे. उंची कमी असल्यास तुम्ही जेव्हा कुर्ती वापरणार असाल तेव्हा तुम्हाला नक्की कशा कुर्ती निवडायला हव्यात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आम्ही दिलेल्या टिप्स तुम्ही वापरून पाहा आणि दिसा उंच. फॅब्रिक, प्रिंट्स, स्टायलिंग अशा गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या शरीरावर एक आभास निर्माण करता येतो. अधिकांश कुर्ते हे उंच मुलींसाठी असतात. कमी उंची असणं काही वाईट नाही. पण तुम्ही कुर्तीची स्टाईल करून स्वतःला उंच दाखवू शकता. जाणून घ्या स्टायलिंगच्या खास टिप्स.
गडद रंग निवडा (Use Dark Colours)
कमी उंची असणाऱ्या मुलींना उंची जास्त असण्याचा आभास निर्माण करण्यासाठी गडद रंगांची निवड करणं योग्य आहे. गडद आणि सॉलिड रंग अर्थात काळा, नेव्ही ब्लू, मरून, गदड राखाडी, लाल असे रंग बारीक आणि कमी उंची असणाऱ्या मुलींना अधिक उंच दाखविण्यास चांगले ठरतात. सॉलिड, मोनोक्रोमॅटिक रंगांमध्ये लांब कुर्ती लहान उंची असणाऱ्या महिलांना अधिक उंच दाखविण्यास मदत करते.
स्कर्ट निवडताना फ्लेअरची काळजी घ्या (Use Flared Skirt)
लहान उंची असणाऱ्या मुलींना स्कर्ट घालणे सहसा आवडत नाही कारण त्यात अजून जास्त उंची कमी दिसून येते. पण स्कर्ट घालूनदेखील तुम्हाला उंच दिसता येते. लांब कुर्तीसह (Long Kurti) लाँग स्कर्ट (Long Skirt) घालणे अत्यंत चांगला पर्याय आहे. लांब स्ट्रेट एथनिक कुर्तीसह तुम्ही मीडियम फ्लेअर स्कर्ट (Medium Flared Skirt) पेअर करणे चांगले ठरते. असा स्कर्ट वापरा जो तुमच्या पायाच्या पोटरीपर्यंत असेल. जो तुम्हाला अधिक उंच दाखविण्यासाठी फायदेशीर ठरतो. अशी स्टाईल सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. तर कुर्तीसह स्कर्ट घालणेदेकील ट्रेंडी ठरते आणि अत्यंत आरामदायीदेखील असते.
म्यूट प्रिंट्स निवडा (Select Mute Prints)
लहान उंचीच्या मुलींना उंच दिसण्यासाठी एक महत्त्वाची स्टायलिंग टिप्स (Styling TIps) म्हणजे मोठे आणि लाऊड प्रिंट्स घालू नका. म्यूट प्रिंट्स कमी उंचीच्या मुलींच्या सौंदर्यात भर घालतात. तर उभ्या स्ट्रीप्सच्या कुर्ती मुलींना अधिक उंचीच्या दाखविण्यास फायदेशीर ठरतात. तुम्ही जर प्रिंट्स कुर्तीची निवड करत असाल तर तुम्ही लहान आणि डेंटी प्रिंट्स निवडा. लहान प्रिंट्सचे डिझाईन्स करण्यात आलेले एथनिक कुरते तुम्हाला अधिक उंच दाखविण्यास मदत करते.
लाँग कुरतेदेखील तुम्ही वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करा (Use Long Kurta)
तुमची उंची कमी आहे आणि तुम्ही बारीक असाल तर तुम्ही ढोपरापर्यंत उंचीचे कुर्ते घालू नका. असे कुरते तुम्हाला अधिक लहान दाखवितात. तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये लाँग कुरत्यांचा समावेश करून घ्यायला हवा. ढोपरापेक्षाही जास्त उंची असणारे कुरते तुम्ही वापरा. यामध्ये तुम्ही गडद रंग अथवा मिनिमल प्रिंट्सचे अथवा लांब तरीही साधे असेल कुर्ते घेतले तर तुमचे शरीर अधिक उंच दाखविण्यास मदत मिळते. याच्यासह तुम्ही पँट घातल्यास अधिक चांगले दिसता.
कुरतीसह तुम्ही नॅरो पँट्सचा करा वापर (Use Narrow Pants with Kurti)
कमी उंचीच्या महिलांना उंच दाखविण्यासाठी एक उत्तम कुर्ता स्टाईल टिप म्हणजे तुम्ही कुर्तीच्या खाली नॅरो पलाझो अथवा नॅरो पँट्सचा वापर करावा. नॅरो पलाझो अथवा पँट्स एक स्ट्रेट लाईन बनवते जे तुमची उंची अधिक दाखविण्यास मदत करते. मध्यम फ्लेअर पलाझो अथवा स्लिम पँट लांब कुरत्यांसह उंची अधिक दाखविण्याचा आभास निर्माण करते. आजकाल पँट्स आणि पलाजो स्टाईल खूपच ट्रेंडमध्ये आहे. इतकंच लक्षात ठेवा की, तुमच्या पलाझोला जास्त फ्लेअर नाही हे पाहून घ्या. तसंच स्लिम पलाजो आणि मिनिमलिस्टिक अक्सेसरीज एका लांब कुरतीसह पेअर करा.
तुमची उंची कमी असेल तर तुम्ही या टिप्सचा वापर करा. या टिप्स तुम्हाला उंच दाखविण्यास नक्की मदत करतील.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक