सध्या अनेक मालिकांमध्ये सण-समारंभ अगदी जल्लोषात साजरे केले जातात. मकरसंक्रात हा सण संपूर्ण भारतात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात तर या सणाला विशेष महत्व आहे. त्यामुळे सध्या अनेक मालिकांमध्ये या सणाचं सेलिब्रेशन सुरू आहे. स्टार प्रवाहावरील ‘ललित २०५’ या मालिकेत 15 जानेवारीच्या विशेष भागात मकरसंक्रांत सेलिब्रेट करण्यात येणार आहे. या मालिकेतील राजाध्यक्ष कुंटूंबात ‘भैरवीची’ ही पहिलीच मकरसंक्रांत आहे. त्यामुळे या मालिकेत मकरसंक्रातीनिमित्त भैरवीने खास काळ्या रंगाची पैठणी आणि हलव्याचे पांरंपरिक दागिने घातले आहेत. या पेहरावात भैरवीचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. तिळगुळाचे महत्व, पंतग उडविण्याची स्पर्धा आणि खास गुळपोळीचा बेत अशा अनेक गोष्टी या मालिकेत दाखविण्यात येणार आहेत. मकरसंक्रातीच्या या खास कार्यक्रमाचे काही व्हिडिओ या निमित्त कलाकारांनी इन्स्टावर शेअर केले. या मालिकेत भैरवीची भूमिका अभिनेत्री अमृता पवार साकारत आहे. टेलिव्हिजन मालिकांना प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान असतं. विशेषतः महिला वर्गासाठी या मालिका फारच महत्वाच्या असतात. या मालिकांमधील पात्र त्यांच्या जवळच्या लोकांपैकीच एक असतात. त्यामुळे यंदा भैरवीची मकरसंक्रांत नेमकी कशी साजरी होणार याकडेच सर्वजणींचं लक्ष लागलं आहे.
भैरवी हळदी कुंकूच्या समारंभात देणार एक अनोखं वाण
भारतीय संस्कृतीमध्ये सण-समारंभांना विशेष महत्व आहे. मकरसंक्रात हा तर महिलांचा अगदी जिव्हाळाचा सण आहे. या सणाला त्यांना काळी साडी, हलव्याचे दागिने घालून नटण्याची जणू संधीच मिळत असते. महाराष्ट्रात मकर संक्राती ते रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू आणि वाण लुटण्याची प्रथा आहे. त्यामुळे महिला हा सण अधिकच उत्साहाने साजरा करतात. सहाजिकच ‘ललित २०५’ मध्ये भैरवीची ही पहिलीच मकरसंक्रात असल्यामुळे हा भाग विशेष असणार आहे. भैरवी तिच्या पहिल्या हळदीकुंकू समारंभानिमित्त एक आगळं वेगळं ‘वाण’ महिलांना देणार आहे. हळदी कुंकूसमारंभात स्त्रीयांना अनेक उपयुक्त वस्तू भेट स्वरुपात देण्यात येतात. अगदी टिकली पासून साड्यांपर्यत कोणत्याही गोष्टी त्यामध्ये असू शकतात. भैरवी मात्र या सर्व गोष्टींना छेद देत तुळशीचं रोप हळदी कुंकू समारंभात वाटणार आहे. तुळस हे आरोग्य आणि मांगल्यांचं प्रतिक आहे. तुळशीच्या रोपाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. शिवाय यामुळे पर्यावरणपूरक सामाजिक संदेश देखील प्रेक्षकांपर्यंत पोहचवला जाणार आहे. मालिकामधील नायिकांचं अनूकरण अनेक महिला प्रेक्षक करत असतात. त्यामुळे यामुळे यंदा अनेक महिला हळदीकुंकू समारंभात तुळशीचं रोप वाटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोहम प्रॉडक्शन निर्मित ‘ललित २०५’
ललित २०५ ही मालिका आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रॉडक्शन निर्मित आहे. या मालिकेचा निर्माता आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर आहे. या मालिकेत सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, अमृता पवार,अनिकेत केळकर, कीर्ती मेंहेंदळे,मानसी नाईक प्रमुख भूमिकेत आहेत. शिरीष लाटकर या मालिकेचे लेखक आहेत. सध्या ही मालिका एका रंजक वळणावर आली आहे. त्यामुळे आता या मालिकेत काय आणखी वेगळं असणार हे पाहणं उंत्कठा वाढवणारं आहे.
फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम