ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
laser-hair-removal-treatment-side-effects-on-skin-in-marathi

लेझर हेअर रिमूव्हलचा करताय विचार, तर त्याआधी हे नक्की वाचा

मागच्या काही वर्षांमध्ये लेझर हेअर रिमूव्हल (Laser Hair Removal) खूपच प्रसिद्ध झाले आहे. ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिला अथवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना हा उपाय अधिक सोपा वाटतो आहे. तुमच्या शरीरावरील नको असणारे केस काढून टाकण्यासाठी लेझर हेअर रिमूव्हलचा सध्या जास्त वापर होतो आहे. तसंच यामध्ये जास्त त्रास होत नसल्याने आणि बराच काळ केस पुन्हा येत नसल्यामुळे महिलांना हा उपाय अधिक जवळचा आणि सोपा वाटत आहे. पण लेझर हेअर रिमूव्हलचे काही दुष्परिणामही आहेत याबाबत तुम्हाला माहीत आहे का? केस काढून टाकण्यासाठी महिला वॅक्स (Wax), रेझर, लेझर हेअर रिमूव्हल (Laser Hair Removal) याचा आधार घेतात. तर सध्या लेझर हेअर रिमूव्हल (Laser Hair Removal) चा ट्रेंड अधिक दिसून येत आहे. शिवाय ही ट्रीटमेंट घ्यायला जास्त वेळ लागत नाही आणि त्वचा अधिक मुलायम आणि स्वच्छ राहाते. शिवाय केसांची वाढही कमी होते. पण याचे काही दुष्परिणामही आहेत, याबाबत तुम्हाला आम्ही या लेखातून अधिक माहिती देत आहोत. 

स्किन इन्फेक्शन (Skin Infection)

बऱ्याचदा काही महिलांना लेझर हेअर रिमूव्हल (Laser Hair Removal) मुळे स्किन इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अलर्जी असेल तर तुम्ही लेझर हेअर रिमूव्हल करण्यापूर्वी आपल्या त्वचा रोग तज्ज्ञाकडून योग्य सल्ला घ्यायला विसरू नका. डॉक्टरांशी सल्लामसलत केल्याशिवाय स्वतःच्या मनाने तुम्ही ही ट्रीटमेंट अजिबात घेऊ नका. 

स्किन पिगमेंटेशन (Skin Pigmentation)

लेझर हेअर रिमूव्हल (Laser Hair Removal)

लेझर हेअर रिमूव्हल (Laser Hair Removal) केल्यानंतर त्वचेचा रंग थोडा लाईट होतो आणि त्यामुळे चेहऱ्यावरील गडद स्पॉट्स अधिक उठून दिसतात. त्यामुळे ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर चेहऱ्यावरील पिगमेंटेशन अधिक दिसून येतात. कारण लेझर ट्रीटमेंटमुळे नको असलेल्या केसांसह डेड स्किन सेल्सही निघून जातात आणि त्यामुळे चेहऱ्यावरील पिगमेंटेशन आणि काळे डाग अधिक उठून दिसतात. त्यामुळे याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते. 

त्वचेची जळजळ आणि रेडनेस (Skin Burn and Redness)

लेझर हेअर रिमूव्हल (Laser Hair Removal) नंतर त्वचेवर जळजळ होणे अथवा खाज येणे, लालसर होणे अर्थात रेडनेस होणे हे अत्यंत कॉमन दुष्परिणाम आहेत. बऱ्याचदा लेझर ट्रीटमेंटनंतर त्वचेवर जळजळ आणि लालपणा येतोच. पण ही समस्या एक – दोन दिवसात कमी होते. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांनी दिलेल्या मलमांचा वापर करू शकता. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही क्रिम तुम्ही त्वचेला लाऊ नका. 

ADVERTISEMENT

त्वचेवर कोरडी त्वचा येणे 

लेझर हेअर रिमूव्हल (Laser Hair Removal) नंतर बऱ्याचदा त्वचेवर कोरडी त्वचा येते ज्याला पपडी असेही म्हटले जाते. यामुळे त्वचेवर खाजही येते. हे ऐकताना फार लहान समस्या आहे असं वाटतं पण त्यामुळे तुमच्या त्वचेचे सौंदर्य बिघडते. अशी त्वचा झाली असेल तर तुम्ही नियमित मॉईस्चराईजरचा वापर करून आपली त्वचा योग्य करायला हवी. त्वचा कोरडी राहू देऊ नका आणि नियमित पाणी प्या, त्वचा मॉईस्चराईज करा. 

लेझर हेअर रिमूव्हलचा तुमचा विचार असेल तर तुम्ही नक्की या गोष्टींचाही विचार करा. कारण हा सर्वस्वी तुमच्या त्वचेचा आणि सौंदर्याचा प्रश्न आहे. त्यामुळे योग्य पाऊल उचला!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

17 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT